भालचंद्र जोशी

ज्याप्रमाणे ‘थेंबे थेंबे तळे साचे’ असे म्हणतात, त्याचप्रमाणे अल्प परंतु नियमित गुंतवणूक केल्यास कालांतराने मोठय़ा प्रमाणात संपत्ती संचय होऊ शकतो. ‘एसआयपी’ ही म्युच्युअल फंडात नियमितपणे निश्चित रक्कम गुंतविण्याची पद्धत आहे. ‘एसआयपी’मुळे गुंतवणूकदाराला महिन्यातील ठरावीक तारखेला नियमितपणे युनिट्सची खरेदी करता येते. यामुळे दीर्घ कालावधीत संपत्ती संचय करण्यास मदत होते.

Vasai, Solar power, subsidy scheme,
वसई : सौर उर्जा अनुदानाची योजना कागदावरच, ६ वर्षांपासून एकालाही अनुदान नाही
Big updated for admissions under RTE Online application registration will start
आरटीईअंतर्गत प्रवेशांसाठी मोठी अपटेड… ऑनलाइन अर्ज नोंदणी होणार सुरू…
public sector enterprises disinvestment in fy 24
निर्गुंतवणूक लक्ष्याची सरकारला पुन्हा हुलकावणी! सरकारी मालकीच्या कंपन्यांमधील हिस्सा विक्रीतून १६,५०७ कोटींचा लाभ
Eligibility in Zopu Yojana without human intervention
झोपु योजनेत यापुढे पात्रता मानवी हस्तक्षेपाशिवाय!

‘एसआयपी’ ही एक अशी गुंतवणूक सुविधा आहे, ज्यामध्ये तुम्ही म्युच्युअल फंड योजनेत दर महिन्याला नियमितपणे त्यावेळी असलेल्या एनएव्हीने (नेट अ‍ॅसेट व्हॅल्यू – निव्वळ मालमत्ता मूल्य) कमीत कमी ५०० रुपये इतकी गुंतवणूक करू शकता. त्याचप्रमाणे तुमच्या आर्थिक नियोजनानुसार जास्त रकमेची गुंतवणूक तुम्ही करू शकता.

गेल्या काही वर्षांमध्ये ‘एसआयपी’ची लोकप्रियता खूप वाढली आहे. परंतु,ज्यांनी म्युच्युअल फंडांमध्ये ‘एसआयपी’द्वारे गुंतवणूक केली आहे अशांसह अनेक गुंतवणूकदार ‘एसआयपी’विषयी संभ्रमित असतात. त्यामुळे या लेखाद्वारे ‘एसआयपी’मध्ये गुंतवणूक करून तुमची दीर्घमुदतीची आर्थिक उद्दिष्टे कशा प्रकारे साध्य करता येतील याचे मार्गदर्शन  करण्यात आले आहे.

 * ‘एसआयपीम्हणजे काय?

एसआयपी अर्थात पद्धतशीर गुंतवणूक योजनेद्वारे तुम्ही म्युच्युअल फंड योजनेत, खासकरून इक्विटी म्युच्युअल फंड योजनेत नियमितपणे निश्चित रकमेची गुंतवणूक करू शकता.

* ‘एसआयपी’चे फायदे

शेअर बाजारामध्ये गुंतवणुकीची वेळ साधण्याची गरज नाही. सर्वसामान्य गुंतवणूकदाराला शेअर बाजारात गुंतवणूक करणे शक्य नसते. म्हणूनच, शिस्तबद्ध आणि नियमित गुंतवणुकीद्वारे तुम्ही केव्हा आणि कशी गुंतवणूक करायची याची चिंता करणे बंद करू शकता. थोडक्यात, यामुळे सक्रिय पद्धतीने शेअर बाजाराची वेळ साधण्याची गरज राहात नाही.

* ‘रूपी कॉस्ट अ‍ॅव्हरेजिंगचा लाभ

तुमची गुंतवणूक नियमितपणे दीर्घकाळात निरंतर केली गेल्यामुळे चढय़ा बाजारात कमी युनिट्स खरेदी करणे आणि उतरत्या बाजारात जास्त युनिट्स खरेदी करण्यामुळे तुमच्या गुंतवणुकीचा प्रति युनिट सरासरी खर्च कमी होतो. या प्रणालीला रूपी कॉस्ट अ‍ॅव्हरेजिंग म्हणतात. एसआयपीमुळे नेमका हाच फायदा गुंतवणूकदाराला मिळतो.

* एसआयपीमध्ये गुंतवणूक का करावी?

१) त्यामुळे तुमच्या जीवनाला आर्थिक शिस्त लागते. २) तुम्हाला बाजारपेठेची मानसिकता, निर्देशांकाची पातळी वगैरेबरोबर घालमेल करावी न लागता, नियमितपणे गुंतवणूक करण्यास मदत होते. उदाहरणार्थ, तुम्ही म्युच्युअल फंड योजनेत दर महिन्याला निश्चित रक्कम गुंतवत असल्यास, तुम्हाला तसे करण्यासाठी वेळ काढावा लागेल. तुमच्यापाशी जेव्हा वेळ असेल तेव्हा कदाचित तुम्हाला बाजारातील परिस्थितीची चिंता असू शकते आणि तुम्ही गुंतवणूक पुढे ढकलण्याचा विचार करू शकता किंवा सकारात्मक परिस्थितीत तुम्ही अधिक गुंतवणूक करण्याचा विचार करू शकता. ‘एसआयपी’ या सर्व अनिश्चित परिस्थितीला पूर्ण विराम देते. तुम्ही एकदा ‘एसआयपी’ चालू करण्याचा निर्णय घेतल्याने तुम्हाला काही कष्ट करावे न लागता योजनेत पैसे नियमितपणे आपोआप गुंतविले जातात.

* एसआयपीची वारंवारिता (फ्रिक्वेन्सी) गुंतवणूकदार निश्चित करू शकेल काय?

होय, तुम्ही तसे करू शकता. म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूकदारांना त्यांच्या सोयीनुसार, दर पंधरा दिवसाला, महिन्याला, तिमाही आणि वार्षिक गुंतवणूक करण्याची सुविधा देतात.

*  कायमस्वरूपी एसआयपी (एसआयपी पर्पेच्युअल) – नूतनीकरणाच्या त्रासातून मुक्ती

आता तुम्ही कायम स्वरूपी एसआयपी (एसआयपी पर्पेच्युअल) सुरू करू शकता आणि नूतनीकरणाच्या त्रासातून मुक्ती मिळवू शकता. ही अगदी योग्य सुविधा आहे जी तुम्ही बंद करण्याची सूचना देईपर्यंत तुमची ‘एसआयपी’ सुरू ठेवते. आता शांत बसा आणि आराम करा, आणि तुमची एसआयपी कोणत्याही खंडाशिवाय कायम सुरू राहते. तुम्ही फक्त एसआयपी नोंदणी प्रपत्रात ‘पर्पेच्युअल’ पर्यायावर खूण करायची आहे.

‘पर्पेच्युअल एसआयपी’मध्ये गुंतवणूकदाराला एसआयपीची अंतिम तारीख निवडावी लागत नाही. गुंतवणुकीचे उद्दिष्ट पूर्ण झाले की गुंतवणूकदार फंड हाऊसला कळवून एसआयपी थांबवू शकता.