माझा पोर्टफोलियो : ‘पोर्टफोलियो’च्या दीर्घकालीन स्वास्थ्यासाठी..

गेल्या वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत कंपंनीने ५,९४२ कोटी रुपयांची उलाढाल केली असून त्यांत २.१ टक्के घट झाली आहे

अजय वाळिंबे

वर्ष १९८६ मध्ये सुरू झालेली, ऑरबिंदो फार्मा लिमिटेड ही अ‍ॅक्टिव्ह फार्मास्युटिकल इनग्रेडिएंट्स (एपीआय) आणि जेनेरिक फार्मास्युटिकल्सच्या उत्पादनात आहे. कंपनी सेमी-सिंथेटिक पेनिसिलिन उत्पादनाच्या बाजारपेठेत आघाडीवर असून आणि न्यूरोसायन्स (सीएनएस), हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी (सीव्हीएस), अँटी-रेट्रोव्हायरल, अँटी-मधुमेह आणि इतर अनेक प्रमुख उपचारात्मक क्षेत्रांमध्ये ऑरबिंदोचे योगदान महत्त्वाचे आहे. भारतामधील ही दुसरी सर्वात मोठी फार्मास्युटिकल कंपनी आहे तर अमेरिकेतील सर्वात मोठी जेनेरिक कंपनी आहे. ऑरबिंदो आघडीची निर्यातदार औषधी निर्माण कंपनी असून आपली उत्पादने १५० हून अधिक देशांत ती निर्यात करते. कंपनीचा सुमारे ९० टक्के महसूल तिच्या आंतरराष्ट्रीय कामकाजातून येतो.

यंदाच्या आर्थिक वर्षांतील पहिल्या तिमाहीत कंपनीने निराशाजनक कामगिरी केली आणि कंपनीच्या समभागाची किंमत घसरण्यास सुरुवात झाली. पहिल्या तिमाहीच्या कालावधीत कंपनीचा एकूण महसूल आणि अमेरिकेतील कंपनीच्या अँटीरेट्रोव्हायरल व्यवसायात वर्षभरात ३० टक्के घसरण झाल्यामुळे ऑरबिंदोचा समभाग केवळ एका महिन्यात २५ टक्कय़ांनी गडगडला. कंपनीचे सप्टेंबर २०२१ अखेर संपलेल्या तिमाहीचे आर्थिक निकाल मात्र अपेक्षेप्रमाणेच आहेत. गेल्या वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत कंपंनीने ५,९४२ कोटी रुपयांची उलाढाल केली असून त्यांत २.१ टक्के घट झाली आहे तर नक्त नफा देखील २.१ टक्कय़ांनी घटून तो ६९६.७ कोटीवर आला आहे. कंपनीने १५० टक्के (१.५० रुपये प्रति शेअर) अंतरिम लाभांश जाहीर केला आहे. 

परंतु कंपनी व्यवस्थापनाचा दृष्टिकोन सकारात्मक राहिला आहे. तसेच व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार कंपनीच्या अँटीरेट्रोव्हायरल व्यवसायातील अडचणी लवकरच दूर होतील आणि येत्या सहा महिन्यात व्यवसाय मार्गी लागेल. गेल्या तिमाहीत कंपनीने अमेरिकेची औषध नियंत्रक (यूएस-एफडीए) कडे २७ नवीन ड्रग अ‍ॅप्लिकेशन (एएनडीए) ना मान्यतेसाठी अर्ज केला असून त्यांत पाच इंजेक्टेबल्सचा समावेश आहे. कंपनीने नुकतेच पशुवैद्यकीय फार्मा जेनेरिक उत्पादनात असलेल्या हैदराबादमधील क्र ोनस फार्मा कंपनीचे अधिग्रहण केले आहे. तसेच अमेरिकेतील ओटीसी ब्रँड्सच्या संपादनामुळे देखील कंपनीच्या उलाढाल वाढीला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

सेमी-सिंथेटिक पेनिसिलिनमध्ये आघाडीवर असलेली ऑरबिंदो फार्मा आता पशु-वैद्यकीय उत्पादनात प्रवेश करत आहे. यंदाचे कंपनीचे आर्थिक निष्कर्ष चांगले नसले तरीही अनुभवी प्रवर्तक, उत्पादनाची मोठी श्रेणी, गुणवत्ता तसेच मोठी निर्यातदार असलेली ऑरबिंदो फार्मा एक दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून तुमच्या पोर्टफोलियोत जरूर ठेवा.

ऑरबिंदो फार्मा लिमिटेड

(बीएसई कोड – ५२४८०४)

शुक्रवारचा बंद भाव : रु. ६८८/-

वर्षभरातील उच्चांक/ नीचांक :

रु. १,०६४ / ६६०

बाजार भांडवल :

रु. ४०,३०७ कोटी

भरणा झालेले भागभांडवल :

रु. ५८.५९ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक             ५१.८३    

परदेशी गुंतवणूकदार      २१.७१    

बँक/ म्यु. फंड/ सरकार   १५.५२    

इतर/ जनता           १०.९४

संक्षिप्त विवरण

* शेअर गट    : लार्ज कॅप

* प्रवर्तक       :  पी व्ही रामप्रसाद रेड्डी

* व्यवसाय क्षेत्र  :   फार्मा / बल्क ड्रग्स

* पुस्तकी मूल्य : रु. ३७४

* दर्शनी मूल्य : रु. १/-

* गतवर्षीचा लाभांश : ४००%

शेअर शिफारसीचे निकष

*  प्रति समभाग उत्पन्न :      रु. ९०.८७

*  पी/ई गुणोत्तर :                  ७.७३

*  समग्र पी/ई गुणोत्तर :             २७

*  डेट इक्विटी गुणोत्तर :                   ०.२४

*  इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर     :      ६८.३

*  रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड :             १८.५

*  बीटा                   :      ०.७

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Aurobindo pharma ltd company profile zws

Next Story
‘अर्थ’पूर्ण : जेवढय़ा लवकर सुरू कराल तेवढे चांगले!
ताज्या बातम्या