अजय वाळिंबे

काही कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करताना फारसा विचार करावा लागत नाही. मंदीमध्ये आकर्षक भावात उपलब्ध झाले की या कंपन्यांचे शेअर्स लगेच घेऊन ठेवायचे असतात, बजाज होिल्डग्स  ही त्यापैकीच एक.

mutual fund, market, investment, Assets, small cap
स्मॉल कॅप फंडांमधील मालमत्ता २.४३ लाख कोटींवर
Adani Group, gautam adani, investment, Ambuja Cement
अदानी समूहाची अंबुजा सिमेंटमध्ये ८,३३९ कोटींची गुंतवणूक
india demand of land marathi news
कार्यालयीन जागांच्या मागणीत ४३ टक्के वाढ, पहिल्या तिमाहीत १.६२ कोटी चौरस फुटांचे व्यवहार; बंगळूरुचा सर्वाधिक वाटा
india second highest gst collection at 1 78 lakh crore in march
मार्चमध्ये दुसरे सर्वाधिक १.७८ लाख कोटींचे जीएसटी संकलन; आर्थिक वर्षात एकूण संकलन उद्दिष्टापेक्षा सरस २०.१८ लाख कोटींवर

मुंबई उच्च न्यायालयाच्या १ डिसेंबर २००० च्या आदेशानुसार बजाज ऑटो लिमिटेडचे विघटन करण्यात आल्यानंतर, बजाज होल्डिंग्ज अँड इन्व्हेस्टमेंट लिमिटेड (बीएचआयएल) ही कंपनी स्थापन झाली. ‘डिमर्जर योजने’नुसार उत्पादन  बजाज ऑटो लिमिटेडकडे हस्तांतरित केले गेले, तर विंड फार्मिग व्यवसाय आणि वित्तीय सेवा व्यवसाय यांचा समावेश असलेला धोरणात्मक व्यावसायिक उपक्रम बजाज फिनसव्‍‌र्ह लिमिटेडकडे (बीएफएस) देण्यात आला. इतर सर्व मालमत्ता, गुंतवणूक आणि पूर्वीच्या बजाज ऑटो लिमिटेडची दायित्वे आता बीएचआयएलकडे आहेत.

विघटनानंतर, बीएचआयएलचे बजाज ऑटो आणि बजाज फिनसव्‍‌र्हमध्ये प्रत्येकी ३० टक्क्यांपेक्षा जास्त शेअर्स आहेत. नावाप्रमाणेच बीएचआयएल ही बजाज समूहाची होल्डिंग कंपनी असून तिचा प्रमुख व्यवसाय आणि उद्देश समूहातील शेअर होल्डिंग्स व्यतिरिक्त इतर गुंतवणूक, लाभांश तसेच गुंतवणूक वृद्धी आणि त्यायोगे नफा असा आहे. कंपनीकडे बजाज समूहातील प्रमुख कंपन्यांचे शेअरहोल्डिंग खालीलप्रमाणे आहे :

बजाज ऑटो लिमिटेड : ३५.७७ %

बजाज फिनसव्‍‌र्ह लिमिटेड : ४१.६३%

महाराष्ट्र स्कूटर्स लिमिटेड : ५१%

बजाज ऑटो होल्डिंग्स लिमिटेड : १००%

याखेरीज कंपनीची गुंतवणूक समूहातील इतर कंपन्या म्हणजे बजाज इलेक्ट्रिकल, मुकंद लिमिटेड, मुकंद इंजिनीयर्स, हक्र्यूलस हॉईस्ट इ. कंपन्यांत आहे. कंपनीच्या धोरणाप्रमाणे कंपनीची कमाल इक्विटी गुंतवणूक मर्यादा ६० टक्क्यांपर्यंत असून इतर गुंतवणूक म्युच्युअल फंड, अल्टरनेट इन्व्हेस्टमेंट फंड (एआयएफ), सरकारी बॉण्ड्स, रोखे इ. नियमित उत्पन्न देणाऱ्या सिक्युरिटीजमध्ये आहे.

कंपनीने मार्च २०२२ साठी संपलेल्या आर्थिक वर्षांचे निकाल जाहीर केले आहेत. कंपनीने या आर्थिक वर्षांत  ४८६.५ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले असून, ४,०५५.७० कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. यांत समूहातील इतर कंपन्यांचा नफा मिळवला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा ११ टक्क्यांनी अधिक आहे. मार्च २०२२ साठीच्या तिमाहीत देखील कंपनीने नक्त नफ्यात १६ टक्के वाढ नोंदवून तो १,१०५.४ कोटीवर गेला आहे. इतर क्षेत्रांप्रमाणे वाहन उद्योग आणि बजाज समूहातील कंपन्यांवर देखील कोविड १९ चा परिणाम झालेला असूनही कंपनीची कामगिरी चांगली आहे असे म्हणावे लागेल. यंदाच्या वर्षांत देखील देशांतर्गत आणि जागतिक आर्थिक मंदीचे सावट कायम राहील. मात्र येत्या दोन वर्षांत बँकेतर वित्तीय कंपन्यांच्या – एनबीएफसींच्या कामगिरीत सुधारणा अपेक्षित आहे. सध्या अनेक वित्तीय कंपन्या आकर्षक भावात उपलब्ध आहेत आणि बजाज होिल्डग त्याला अपवाद नाही. उत्तम प्रवर्तक, गुंतवणुकीचा आकर्षक पोर्टफोलियो आणि आगामी कालावधीत भरीव कामगिरीची अपेक्षा असलेला हा शेअर मध्यमकालीन गुंतवणुकीसाठी आकर्षक वाटतो.

सध्याची शेअर बाजारातील अनिश्चितता पाहता सुचविलेले समभाग कमी बाजार भावात मिळू शकतात, त्यामुळे प्रत्येक मंदीत तसेच टप्प्याटप्प्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे. 

बजाज होल्डिंग्स अँड इन्व्हेस्टमेंट लि

(बीएसई कोड ५००४९०)

शुक्रवारचा बंद भाव : रु. ४,४७८/-

वर्षभरातील उच्चांक/ नीचांक :

रु. ६,५९८ / ३,४५१

बाजार भांडवल :

रु. ४९,८४१ कोटी

भरणा झालेले भागभांडवल : रु. १११.२९ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक  ५१.०९   

परदेशी गुंतवणूकदार      १२.०६   

बँक/ म्यु. फंड/ सरकार   ५.१७   

इतर/ जनता     ३१.६८

संक्षिप्त विवरण

* शेअर गट          :      लार्ज कॅप

* प्रवर्तक         :          बजाज समूह

* व्यवसाय क्षेत्र :            एनबीएफसी

* पुस्तकी मूल्य :            रु. ३,८४९

* दर्शनी मूल्य         :      रु. १०/-

* गतवर्षीचा लाभांश :         १,१५० %

शेअर शिफारशीचे निकष

*  प्रति समभाग उत्पन्न :      रु. ३६४.४१

*  किंमत उत्पन्न गुणोत्तर :    १२.३

*  समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर : २५.१

*  डेट इक्विटी गुणोत्तर :       ०.००

*  इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर :    १,३४३

*  रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉइड : १०.५ 

*  बीटा :                  ०.८

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यापेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.