जुल महिन्याच्या अतिथी विश्लेषक श्रेया मुझुमदार या सनदी लेखापाल असून समभाग संशोधनाचा त्यांचा आठ वर्षांचा अनुभव आहे. सध्या त्या ‘ब्ल्यू हेवन कॅपिटल’ या दलाल पेढीत ‘मिड-कॅप’ विश्लेषक आहेत. गुरुवारी सादर झालेल्या अर्थसंकल्पातील लाभार्थी कंपन्या त्या या महिन्यात सुचवीत आहेत.
आज देशात १५ हजार किलोमीटर इतके वायू-वाहिन्यांचे जाळे फैलावले आहे. संपूर्ण देशस्तरावर वायूवहन शक्य व्हावे यासाठी आणखी १५ हजार किलोमीटरच्या वाहिन्या रचण्याची गरज आहे. या वाहिन्या सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर टाकल्या जाणे आम्ही प्रस्तावित करीत आहोत. यातून देशांतर्गत उत्पादित तसेच आयातीत वायूचा वापर वाढण्यास चालना मिळेल व एकाच ऊर्जा स्रोतावरील आपले अवलंबित्व कमी होईल..
मागील आठवड्यात या सदरात २७६च्या भावात शिफारस केलेल्या टीमकेन इंडियाच्या समभागाने ३३३ रु. असे ५२ आठवडय़ातील उच्चांकी भावाचे शिखर गाठले. या आठवडय़ात तेल व नसíगक वायू क्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी कच्च्या मालाचा पुरवठादार असलेल्या ‘वेलस्पन कॉर्प’विषयी जाणून घेऊ.
वेलस्पन कॉर्प या कंपनीची स्थापना १९९५ मध्ये झाली. ही कंपनी सबमज्र्ड आर्क वेल्डेड (सॉ) पाईपचे उत्पादन करते. कंपनी आपल्या उपकंपन्यांमार्फत हॉट रोल्ड पोलादी पत्रे, उच्च प्रतीचे सबमज्र्ड आर्क वेल्डेड पाईप्स, तेल व वायू उत्खनन या क्षेत्रात वापरल्या सबमज्र्ड आर्क वेल्डेड पाईपची जगातील दुसऱ्या क्रमांकाची क्षमता असलेली कंपनी म्हणून ख्यातकीर्त आहे. तर भारतातील एका अर्थविषयक वर्तमानपत्राने २००८ची आश्वासक कंपनी म्हणून तिला गौरवान्वित केले आहे. कंपनीने जगातील अनेक महत्त्वाचे कच्चे तेल व नसíगक वायू वाहून नेणाऱ्या पाईपलाइनसाठी पाईप्सचा पुरवठा केला आहे. कॅनडा ते अमेरिका या जगातील सर्वात लांबीच्या व समुद्रातील सर्वात खोल असलेल्या पाईपलाइनसाठी पाईप्सची ही कंपनी पुरवठादार आहे. तसेच पेरू ते मॅक्सिको या (पेरू एलएनजीच्या मालकीच्या) सर्वात जास्त दाबाच्या नसíगक वायूच्या पाईपलाइनसाठी या कंपनीने पाईप्स पुराविले आहेत. पíशयाच्या आखातातील अनेक तेल विहिरीतून तेल काढणाऱ्या पाईपलाइनसाठी (आयजीएटी-४) या कंपनीने पाईप्सचा पुरवठा केला आहे. कंपनी आपला व्यवसाय विविध उपकंपन्याच्या मार्फत करत आहे. कंपनीचे पाईप तयार करणारे कारखाने गुजरात राज्यात दहेज व अंजार, तर कर्नाटकात मांडय़ा या ठिकाणी तर सौदी अरेबियात धमाम येथे आहेत. प्लेट व कॉईल विभागाकडे ४.५ मीटर रुंदीच्या प्लेट व २.० मीटर रुंदीच्या कॉईल रोिलग करण्याची क्षमता आहे. कंपनी या प्लेट कॉईल्स स्वत:च्या वापरासाठी तर वापरतेच परंतु अन्य सबमज्र्ड आर्क वेल्डेड पाईप उत्पादक या कंपनीचे ग्राहक आहेत. वेलस्पन टबलर एलसीसी, यूएसए ही कंपनी अमेरिकेतील प्रकल्पांसाठी अमेरिकेच्या आर्कान्सा राज्यात पाइपचे उत्पादन करते. वेलस्पन नॅचरल रिसोस्रेस लिमिटेड ही कंपनी अदानी समूहाबरोबरचा संयुक्त प्रकल्प असून या कंपनीने अदानी वेलस्पन एक्सप्लोरेशन लिमिटेड ही कंपनी प्रवर्तित केली असून या कंपनीत ‘वेलस्पन’चा ३५ टक्के सहभाग आहे. या कंपनीच्या भारताबरोबरच इजिप्त व थायलंड येथे तेल विहिरी आहेत.  
वेलस्पन एनर्जी लिमिटेड ही कंपनी औष्णिक ऊर्जा प्रकल्पांची उभारणी करीत असून, सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचीही तिची योजना आहे. वेलस्पन इन्फ्राटेक लिमिटेड या कंपनीने एमकेएस प्रोजेक्ट्स लिमिटेडचे अधिग्रहण केले असून ही कंपनी आता वेलस्पन प्रोजेक्ट्स लिमिटेड या नावाने ओळखली जाते. ही कंपनी जमिनीवरच्या तेल व नसर्गिक वायूच्या पाईपलाइन्स व पाण्याच्या पाईपलाइन्स टाकण्याचे काम करते. वेलस्पन मिडल-इस्ट पाईप एलसीसी ही कंपनी स्पायरल पाईपचे गल्फच्या आखातात उत्पादन करते. या कंपनीची वार्षकि क्षमत ३,५०,००० मेट्रिक टन इतकी आहे. या व्यतिरिक्त वेलस्पन पाईप कोटिंग एलसीसी ही कंपनी पर्शियाच्या आखातातील एक प्रमुख अभियांत्रिकी कंत्राटदार आहे.        
अमेरिकेतील तेल व वायू वाहून नेणाऱ्या ३७ टक्के पाईपलाईन्स १९४० पूर्वी घातल्या गेल्या आहेत. ७ टक्के पाईपलाइन्स १०० वष्रे जुन्या आहेत तर उर्वरित पाईपलाइन्स १९७०च्या आधीच्या आहेत. या पाईपलाइन्सचे आयुष्य येत्या तीन वर्षांत संपुष्टात येईल. या सर्व पाईपलाइन बदलल्या जाण्याचे काम सुरू होणार आहे. तसेच इराकमध्येही मोठय़ा प्रमाणावर पाईपलाइन्सचे आधुनिकीकरण होऊ घातले आहे. उत्तर अमेरिका हे जगातील तेल व वायू क्षेत्राची सर्वात मोठी बाजारपेठ समजली जाते. अमेरिकेतील या क्षेत्रातील यंत्रसामग्रीच्या एकूण मागणीपकी ३० टक्के मागणी या भागातील आहे. व जागतिक मागणीच्या २४ टक्के मागणी ही अमेरिकेतील आहे. तर कॅनडा, मेक्सिको ही बाजारपेठ जागतिक बाजारपेठांपकी पहिल्या पाच बाजारपेठांपकी आहे. (स्त्रोत: वर्ल्ड ऑईल रिसोर्स) मध्य व दक्षिण अमेरिकेतील तेल उत्खनन क्षेत्रातील यंत्रसामग्रीची मागणी वाढत आहे.
अरुण जेटली यांनी अर्थसंकल्पात उल्लेख केल्याप्रमाणे भारतात पूर्व किनारपट्टीवर बंगालच्या उपसागरात कृष्णा-गोदावरी खोरे, आसाम, बॉम्बे हाय, गुजराथ येथे तेल व वायू उत्खनन होते. तर रासायनिक खत कारखाने, नसíगक वायूवर ऊर्जानिर्मिती करणारे कारखाने, तेल शुद्धीकरण कारखाने येथे हे कच्चे तेल व वायू वाहून नेण्यासाठी मोठय़ा लांबीच्या पाईपलाइनची मागणी वाढत आहे. सरकारकडे मर्यादित भांडवल असल्याने तेल व वायू क्षेत्रात ‘पीपीपी’ मॉडेल अनिवार्य आहे. वेलस्पन कॉर्प ही कंपनी तेल विहिरींतून तेल बाहेर काढण्यासाठी, तसेच तेल व नसíगक वायू वाहून नेण्यासाठी पाईपची निर्मिती करणारी व या पाईपलाइनचे कंत्राट घेणारी प्रमुख कंपनी आहे.
’ अर्थमंत्री अरुण जेटली
लोकसभेतील अर्थसंकल्पीय भाषणातून