समभाग गुंतवणुकीतून, भागधारक – शेअरहोल्डर बनण्याची गंमत अशी की, आपण कंपनीची आंशिक स्वरूपात मालकी मिळवितो. या मालकीसह आपण धनलाभही मिळवत असतो, त्याचा प्रमुख प्रकार अर्थात ‘लाभांशा’चा हा वेध..

समभाग गुंतवणूक म्हणजे कंपनीचे भागधारक / शेअरहोल्डर बनणे असते. या भूमिकेची गंमत अशी की, आपण कंपनीची आंशिक स्वरूपात मालकी मिळवितो. अर्थात कंपनीच्या व्यवसायातील बरकतीसह, तिची मिळकत आणि नफ्यातही आपली भागीदारी होते. या भागीदारीचे भागधारकांना थेट आर्थिक लाभही मिळतात आणि प्रसंगी ते त्या गुंतवणुकीतील परताव्याइतकेच सरसही असतात. भागधारकांना धनलाभ देणाऱ्या लाभांश (डिव्हिडंड), बक्षीस समभाग (बोनस) आणि समभाग पुनर्खरेदी (बायबॅक) या तीन प्रमुख घटकांचा प्रामुख्याने समावेश होतो, त्यापैकी लाभांशाचा सारांशात आढावा घेऊ या. 

Namo Maharojgar Melava
धक्कादायक : नमो महारोजगार मेळाव्याच्या नावाखाली ३० हजार ‘ट्रेनीं’ची पदे
There is a possibility of a code of conduct for the upcoming Lok Sabha elections
पिंपरी: आचारसंहितेच्या शक्यतेने राजकारण्यांप्रमाणेच प्रशासकांचीही धावपळ; तब्बल ‘इतक्या’ कोटींच्या कामांना मंजुरी
Home alone safety tips
मुलांना घरी एकटे ठेवण्याशिवाय पर्याय नाही? नोकरी करणाऱ्या पालकांनी मुलांना शिकव्यात ४ महत्त्वाच्या गोष्टी
parental anxiety parents concern about drug addict children
अधोविश्व : अमली पदार्थांमुळे पालकांमध्ये चिंता

लाभांश (डिव्हिडंड)

कंपनीचा व्यवसाय भरभराटीला असला आणि ती चांगला नफा कमावत असली तर तिच्या नफ्यातही आपण तिचे भागधारक म्हणून हिस्सेदार बनतो. ही नफ्यातील हिस्सेदारी कंपनी नियतकालाने लाभांश जाहीर करून अदा करीत असते. कंपनीच्या नफ्यातून काही भाग शेअरधारकांमध्ये वाटला जातो. शेअर बाजारात दीर्घकाळासाठी गुंतवणूक करीत भांडवल सुरक्षित ठेऊन नियमित उत्पन्न मिळवू पाहणाऱ्यांना अशा चांगला लाभांश देणाऱ्या कंपन्या नेहमीच उपयुक्त ठरतात.

लाभांश देणाऱ्या कंपन्यांचा शोध कसा घ्यावा?

अशा भरघोस लाभांश देणाऱ्या चांगल्या कंपन्या शोधण्याचा एक साधा निकष, त्यांची एक तर लाभांश देण्याची पूर्वकामगिरी पाहणे आणि दुसरे म्हणजे कंपनीच्या भागभांडवलात प्रवर्तकांचा हिस्सा किती आहे ते पाहणे होय. ज्या कंपनीच्या भागभांडवलात प्रवर्तकांचा हिस्सा हा जास्त (७०-८० टक्क्यांपेक्षा जास्त असणाऱ्या सार्वजनिक उपक्रमातील कंपन्या, सरकारी बँका) त्या कंपनीकडून नेहमीच जास्तीत जास्त लाभांश दिला जातो. कारण शेवटी लाभांशाचा मोठा हिस्सा हा सर्वात मोठे भागधारक या नात्याने प्रवर्तक/ संस्थापकांच्या पदरी पडत असतो. गेल्या काही वर्षांत सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमातील कंपन्यांनी चमक गमावली आहे. त्यांच्या बाजार भांडवली मूल्यातही तीव्र स्वरूपाची घसरण झाली आहे. मात्र सरकारच्या तिजोरीवरील ताण पाहता, त्यांनी केवळ सरकारचा फायदा लक्षात घेत भरघोस लाभांशाचे वाटप केले आहे. अर्थात याचा लाभ सामान्य भागधारकांनाही झालाच आहे.

चांगल्या परताव्यासह गुंतवणूकदारांना नियमित उत्पन्न हवे असल्यास, त्यांना खालील कंपन्यांचा पोर्टफोलियो निश्चितच बनविता येऊ शकेल. ८० टक्के लार्ज कॅप आणि प्रत्येकी १० टक्के स्मॉल आणि मिड़ कॅप श्रेणीतील कंपन्यांचा यात समावेश आहे.

अलिकडच्या वर्षांत लाभांश देणाऱ्या  दहा उत्तम कंपन्या

 १. एशियन पेंट्स

 २. कोल इंडिया लि.

 ३. एचडीएफसी लि. 

 ४. हिंदूस्तान युनिलिव्हर लि.

 ५. इन्फोसिस लिमिटेड

 ६. आयटीसी लिमिटेड

 ७. ला ओपाला आरजी लि.

 ८. परसिस्टंट सिस्टीम्स लि.

 ९. पिडिलाइट इंडस्ट्रीज लि.

 १०. रिलायन्स इंडस्ट्रीज लि.

लक्षात घ्यावयाच्या गोष्टी

भागधारक असले तरी लाभांश, बायबॅक आणि बोनस समभाग मिळविण्यासाठी पात्र ठरण्यासाठी त्यांचे वेळापत्रक आणि मुख्य म्हणजे कंपनीकडून जाहीर केली जाणारी ‘रेकॉर्ड तारीख’ लक्षात घ्यावी लागते. कंपनीने निश्चित केलेल्या ‘रेकॉर्ड तारखे’ला तुमच्याकडे त्या कंपनीचे समभाग असणे आवश्यक आहे. अर्थात तेव्हाच तुम्ही त्या कंपनीचे भागधारक समजले जाता. म्हणजे त्या विशिष्ट तारखेला कंपनीच्या खतावण्यात भागधारक म्हणून तुमची नोंद असायला हवी. असे पात्र भागधारक कंपनीच्या धनलाभामध्ये सहभागी होऊ शकतात. पात्र भागधारकांना कंपनीकडून ई-मेल संदेशाद्वारे तसे कळविलेही जाते.