portfolio4शेअर बाजाराची सध्याची स्थिती पाहता सध्याच्या दराला घेतलेले शेअर आपल्याला नक्की फायदा देतील का, असा प्रश्न कुणालाही पडणे साहजिक आहे. गेल्या दोन वर्षांत मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअरमधील गुंतवणुकीने गुंतवणूकदारांना जितके कमावून दिले तसे किंवा तितक्या दराने परतावा अजून शक्य आहे का, असा प्रश्न स्वत:ला विचारून मगच गुंतवणुकीचा विचार करावा. यंदा म्हणूनच आपल्या पोर्टफोलियोसाठी मी जे शेअर निवडत आहे त्यात होणाऱ्या नफ्याचे प्रमाण कमी असेल कदाचित; परंतु धोकाही कमी आहे, हेही लक्षात घेतले पाहिजे.
१९७८ मध्ये आर्यलडच्या बायोकॉन बायोकेमिकल्स लिमिटेड या कंपनीच्या सहकार्याने डॉ. किरण मुजूमदार यांनी भारतातील बायोकॉनची स्थापना केली. गेल्या ३६ वर्षांत कंपनीने आरोग्यनिगा क्षेत्रात मुख्यत्त्वे निदान संशोधन (क्लिनिकल रिसर्च) आणि जैव तंत्रज्ञान (बायो टेक्नॉलॉजी) क्षेत्रात भरीव कामगिरी करून दाखवली आहे. २००१ मध्ये लोवस्तेतीन या क्लोरोस्टोल मॉलिक्यूलच्या उत्पादनाला अमेरिकी अन्न व औषध प्रशासनाचे प्रमाणपत्र मिळवणारी बायोकॉन ही पहिली भारतीय जैव तंत्रज्ञान कंपनी आहे. गेल्या दोन दशकात ७५ देशांतील कंपन्यांना आपली सेवा पुरवणारी बायोकॉन ही खऱ्या अर्थाने एक यशस्वी जागतिक दर्जाची कंपनी आहे. २००४ मध्ये प्रारंभिक खुल्या भागविक्री प्रक्रियेद्वारे (आयपीओ) शेअर बाजारात यशस्वी पदार्पण केल्यावरही कंपनीचे बाजार भांडवल मात्र केवळ १.५ पटच झाले. यांचे मुख्य कारण म्हणजे गुंतवणूकदारांच्या अपेक्षा कंपनी पूर्ण करू शकली नाही. मात्र तरीही कंपनीने आपल्या संशोधनाच्या जोरावर चांगली प्रगती केली आहे. कंपनीचा मुख्य व्यवसाय पाच भागात विभागला गेला आहे. यात लहान मोलेक्यूल्स, नॉव्हेल मोलेक्यूल्स,, संशोधन सेवा, ब्रॅण्डेड फॉम्र्युलेशन्स आणि बायोसिमीलर्स यांचा समावेश होतो.
कंपनीचे गेल्या तिमाहीचे आíथक निष्कर्ष तितकेसे आकर्षक नाहीत आणि अजून वार्षकि निकाल जाहीर व्हायचे असले तरीही आशिया खंडातील सर्वात मोठी इन्सुलिन उत्पादक असलेली ही कंपनी तुम्हाला वर्षभरात २०% परतावा देऊ शकेल. तसेच बायोकॉनची उपकंपनी सिन्जेन इंटरनॅशनलचही प्रारंभिक खुली भागविक्री लवकरच येऊ घातली आहे. त्याचे शेअरदेखील भागधारकांना प्राधान्याने मिळतील.
av-09