अजय वाळिंबे

ज्युबिलंट फूडवर्क्‍स लिमिटेड (जेएफएल)  ही ज्युबिलंट भरतीया समूहाची एक प्रमुख कंपनी आहे तसेच भारतातील सर्वात मोठी खाद्य सेवा कंपनी आहे. कंपनीकडे डॉमिनोज पिझ्झा, डन्किन डोनट्स आणि पोपायेज हे तीन प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय ब्रॅण्ड असून कंपनीला या फूड मार्केट सेगमेंटसाठी मास्टर फ्रँचायझी अधिकार आहेत. कंपनीने चायनीज खाद्यपदार्थ विभागात आपला पहिला स्वदेशी ब्रॅण्ड – होंग्स किचन प्रस्तुत केला असून  ‘शेफबॉस’ या ब्रॅण्ड-मालकीच्या रेडी-टू-कूक श्रेणीचे सॉस, ग्रेव्हीज आणि पेस्ट ऑफर करण्यास सुरुवात केली आहे. तसेच कंपनीने ‘एकदम’ या आपल्या नवीन ब्रॅण्डद्वारे बिर्याणीच्या रोमांचक जगातही प्रवेश केला आहे. कंपनी कबाब, करी, ब्रेड, मिष्ठान्न आणि शीतपेयांसह भारताच्या विविध भागांमधून तयार केलेल्या बिर्याणीची विस्तृत श्रेणी प्रस्तुत करते. कंपनीची सध्या डॉमिनोज पिझ्झा,  डन्किन डोनट्स आणि होंग्स किचनसाठी १५०० हून अधिक दालने असून आज ज्युबिलंट पिझ्झा विभागातील मार्केट लीडर आहे.

jaguar land rover
लवकरच जग्वार लँड रोव्हरचे भारतात उत्पादन; टाटा मोटर्सचे नियोजन; तमिळनाडूमध्ये उभारणार १ अब्ज डॉलरचा प्रकल्प
pune ring road,
पुणे : रिंगरोडमध्ये परदेशी कंपन्यांना रस
8 point 85 percent interest rate on fixed deposits by Bajaj Finance
बजाज फायनान्सतर्फे मुदत ठेवींवर ८.८५ टक्के व्याजदर
Mega block on Central Harbour and Trans Harbour route
मुंबई : मध्य, हार्बर, ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

ज्युबिलंट फूडवर्क्‍स लिमिटेडकडे १९९६ पासून, भारतातील डॉमिनोज पिझ्झा रेस्टॉरंट विकसित करण्याचे आणि चालविण्याचे विशेष अधिकार आहेत. ही अमेरिकेबाहेर डॉमिनोज ब्रॅण्डची सर्वात मोठी फ्रँचायझी आहे. याला श्रीलंका, बांगलादेश आणि नेपाळसाठी डॉमिनोज ब्रॅण्डचे विशेषाधिकार देखील प्रदान करण्यात आले आहेत.

कंपनीकडे भारत आणि इतर जवळपासच्या देशांमध्ये स्टोअरचे मोठे नेटवर्क आहे. तिच्याकडे भारतातील ३२२ शहरांतून डॉमिनोजचे १५०० हून अधिक स्टोअर्स, डन्किन डोनट्सचे ३० स्टोअर्स आणि स्वत:च्या होंग्स किचन या ब्रॅण्डची १४ रेस्टॉरंट आहेत. या खेरीज श्रीलंकेत ३२ डॉमिनोज स्टोअर्स आणि बांगलादेशमध्ये ८ डॉमिनोज स्टोअर्स आहेत. सर्व स्टोअरची कच्च्या मालाची मागणी पूर्ण करण्यासाठी भारतभर एकूण आठ पुरवठा साखळी केंद्रे आणि चार वितरण केंद्रांची मालकी आहे. भारतातील लोकसंख्या आणि वाढती मागणी पाहता कंपनी लवकरच ३,००० स्टोअर्सचा टप्पा पार पाडेल.

गेल्या तिमाहीत १,२११ कोटी रुपयांच्या उलाढालीवर १३४ कोटीचा नक्त नफा कमावणाऱ्या या कंपनीचे मार्च २०२२ अखेर संपणाऱ्या आर्थिक वर्षांचे निकाल अजून जाहीर व्हायचे आहेत. मात्र हे निकाल चांगलेच असतील अशी अपेक्षा आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीने शेअरचे दर्शनी मूल्य घटवून ते दोन रुपयांवर आणले गेल्याने सध्या कंपनीचा शेअर ४९० रुपयांच्या आसपास उपलब्ध आहे. एक दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून प्रत्येक मंदीत ज्युबिलंट फूडवर्क्‍सची खरेदी तुमच्या पोर्टफोलियोसाठी फायद्याची ठरू शकते.

सध्याची शेअरबाजारातील अनिश्चितता पाहता प्रत्येक मंदीत तसेच टप्प्याटप्प्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे.

ज्युबिलंट फूडवर्क्‍स लिमिटेड

(बीएसई कोड -५३३१५५)

शुक्रवारचा बंद भाव :          रु. ४९७/-

वर्षभरातील उच्चांक/ नीचांक :     रु. ९१८ / ४६२

बाजार भांडवल :             रु. ३२,७६१ कोटी

भरणा झालेले भागभांडवल :      रु. १३१.९७ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक              ४१.९४   

परदेशी गुंतवणूकदार      ३१.८७   

बँक/ म्यु. फंड/ सरकार   १५.७२   

इतर/ जनता           १०.४७

संक्षिप्त विवरण

* शेअर गट           : लार्ज कॅप

* प्रवर्तक         :    ज्युबिलंट भरतीया समूह

* व्यवसाय क्षेत्र :      फास्ट फूड साखळी दालने

* पुस्तकी मूल्य :      रु. २५.९

* दर्शनी मूल्य         : रु. २/-

* गतवर्षीचा लाभांश :     ६० %

शेअर शिफारशीचे निकष

प्रति समभाग उत्पन्न :            रु. ६.५०

किंमत उत्पन्न गुणोत्तर :           ७६.४

समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर :      ६७.२

*  डेट इक्विटी गुणोत्तर :             १ 

इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर :          १६.८३

रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉइड :      २९.८

*  बीटा :                        १.२

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यापेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.