भक्ती रसाळ
विक्रमी विक्री करणाऱ्या विमा एजंटला पुरस्कार-सन्मान आणि त्याचे ग्राहक म्हणून आपल्यावरही गारूड असल्याने, त्याच्या प्रशिक्षण व सेवेचा दर्जाचे मूल्यमापन करणे हे जास्त महत्त्वाचे असते हेच आपल्याकडून दुर्लक्षित झाले आहे.

विमा क्षेत्रातील ‘विमा एजंट’ची भूमिका नवीन विमा काढून देणे, बाजारातील नवनवीन विमा पर्यायांची ग्राहकांना माहिती पुरवणे इतपत मर्यादित नाही. विमा कराराची मुदतपूर्ण होइपर्यंत विमा एजंटची सेवा अपेक्षित आहे. विमा ग्राहकांनी तसेच विमा एजंटनेही विमा योजनेतील अटी-शर्तीनुसार नूतनीकरण करताना दरवर्षी जमा होणारे लाभांश, विमा योजनेतील उपलब्ध मुभा, विमा हप्तय़ांमध्ये बचत करण्यासाठी उपलब्ध पर्याय यासंबंधाने नियमितपणे फेरआढावा घेणे आवश्यक आहे.

LinkedIn, top companies, india
वित्तीय, तंत्रज्ञान क्षेत्राची आघाडी; लिंक्डइनकडून देशातील मोठ्या २५ कंपन्यांची यादी जाहीर
धूळ नियंत्रण वाहनांमुळे नागरिकांबरोबरच झाडांचाही मोकळा श्वास
cashew farmer marathi news, konkan farmer marathi news
काजू वायदे : कोकणातील उत्पादकांना वरदान
irdai retains existing insurance policy surrender value rule
विमा नियामकांकडून पारदर्शकतेचा आग्रह धरणारी १ एप्रिलपासून नवीन नियमावली

करोनाकाळात नोंदवले गेलेले विमा दावे आणि त्यांचे निराकरण लक्षात घेतले असता आणीबाणीच्या प्रसंगात ‘विमा एजंट’ची व्यापक भूमिका लक्षात येते. टाळेबंदीच्या काळातदेखील ‘विमा एजंट’ ग्राहकांना सेवा पुरवू शकत होते. विमा योजनांचे वितरण करताना अर्ज भरण्याच्या टप्प्यापासून मुदतपूर्ततेपर्यंत महत्त्वाच्या सेवा ‘विमा एजंट’द्वारे अपेक्षित आहेत. विमा योजनांचा अर्ज सादर करताना विमा एजंट स्वत: जोखीम मूल्यमापकाची भूमिका बजावत असतो. विमा कंपन्यांना ग्राहकांची अचूक वस्तुस्थिती पुरवणारा एकमेव दुवा म्हणजे ‘विमा एजंट’! अर्जाद्वारे वैद्यकीय, आर्थिक, व्यावसायिक, जीवनशैलीविषयक जोखिमांचे तपशील विमा अंडररायटरला करण्याची महत्त्वाची भूमिका बजावत असतो. स्वत:च्या निरीक्षणातून आणि अनुभवातून ग्राहकांच्या जोखिमांचे प्राथमिक स्तरावर मूल्यमापन करून गोपनीय निरीक्षणे विमा कंपनीला पुरवण्याचे कामदेखील ‘विमा एजंट’मार्फत होत असते. ग्राहकांना विमा करारातील अटी-शर्ती, लाभ आणि मर्यादांची ओळख करून देत समुपदेशनाद्वारे आश्वस्त करण्याचे कर्तव्य देखील तोच बजावत असतो. त्याच्या साहाय्यनुरूपच ग्राहकांची आर्थिक- वैद्यकीय जोखीम लक्षात घेऊनच विमा लाभ मान्य केला जातो. सारांश ‘विमा एजंट’ केवळ विमा विक्रेता नसून तो एक महत्त्वाचा दुवा आहे.

ग्राहक आणि कंपनी यांच्यात समन्वय साधणारा व्यावसायिक आहे. विमा योजनेच्या नूतनीकरणाच्या टप्प्यांवर ग्राहकांची वैद्यकीय स्थित्यंतरे, आर्थिक परिस्थितील बदल यांचे अवलोकन करून सुयोग्य पर्याय सुचवता येतात. ग्राहकांशी पुन्हा संवाद साधताना आरोग्यविषयक महत्त्वाच्या नोंदी विमा कंपनीला आवर्जून कळवता येतात. आरोग्यविमा कंपन्यांच्या नोंदीत ग्राहकांकडून आलेली नवीन माहिती भर घालते. ज्याचा विमा दावा दाखल करताना उपयोग होतो. करोना काळात आरोग्यविमा नूतनीकरण करताना बहुअंशी विमा कंपन्यांनी करोना संसर्गविषयक माहिती ग्राहकांना प्रश्नावलीमार्फत विचारून, लशीकरणाविषयक नोंदी देखील नमूद केल्या आहेत. करोनाकाळात लसीच्या दोन्ही मात्रा घेण्यासाठी ‘विमा एजंट’ देखील समुपदेशन करताना आढळले आहेत. विमा योजनांवरील जीएसटीचा अधिभार, सेवाकर अशा बदलांसाठी ग्राहकांची अनुकूलता नसताना विमा संरक्षणाविषयी तत्पर राहणे जास्त महत्त्वाचे आहे. हे ग्राहकांना पटवून देण्याचे कर्तव्य बजावताना एजंटच उपयोगी ठरला. जीवनविम्यासारख्या दीर्घ मुदतीच्या विमा करारांना सातत्याने विमा विक्रीव्यतिरिक्त सेवा पुरवणे क्रमप्राप्त ठरते. व्यवस्थापकीय सेवा, हप्ते थकल्यावर पर्यायी व्यवस्था, योजनांवरील कर्ज, सरेंडर, पेड-अप, नॉन फोरफीचर अशा ग्राहकास अनभिज्ञ संकल्पनांसंबंधाने सुविधा पुरवणे गरजेचे असते.

आयुर्विमा सेवेचे महत्त्व मृत्युदाव्यांच्या टप्प्यांवर जास्त प्रकर्षांने जाणवते. कागदपत्रांची जुळवणी, अर्ज भरतानाची मदत, दावेदारांचे समुपदेशन, प्रसंगी इस्पितळाशी देखील संवाद साधावा लागतो. दुर्दैवाने विमा क्षेत्रावर विक्रमी विक्री करणाऱ्या विमा एजंटचे गारुड असल्याने,त्याच्या प्रशिक्षण व सेवेचा दर्जाचे मूल्यमापन करणे हे जास्त महत्त्वाचे असते हेच आपल्याकडून दुर्लक्षित झाले आहे. ‘विमा एजंट’ने कंपनी सोडल्यावर गाहक स्वत:च कंपनीशी व्यवहार करताना हवालदिल झालेला दिसतो. विमाविषयक तक्रार यंत्रणा वेळकाढू वाटल्याने ग्राहक लहान-मोठय़ा तक्रारींची दादही मागू इच्छित नाहीत. चुकीच्या विमा योजनांद्वारे ग्राहकांची फसवणूक होणे यावर अंकुश ठेवतानाच ग्राहक सेवांचा दर्जा सुधारत विमा सेवा सोप्या, सुलभ, प्रशिक्षित कर्मचारी वर्गाद्वारे ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा विचार होणे गरजेचे आहे. ग्राहकांनी संकट उद्भवण्याच्या वेळेपर्यंत गाफील राहणे धोक्याचे ठरते. विमा योजनांविषयी कुटुंबाला माहिती देणे, दस्तऐवज सांभाळणे, नोंदी ठेवणे, विमा एजंटशी संपर्कात राहणे, विमा कराराचे वाचन करणे, वैद्यकीय इतिहास नोंदवणे अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांमध्ये दिरंगाई करू नये. विमा एजंटशी खरेदी आणि नूतनीकरण या व्यतिरिक्त देखील संपर्क राखणे आवश्यक आहे. विमा संरक्षण आर्थिक नियोजनातील पायाभूत गरज आहे. संपत्ती निर्माण आणि संवर्धन करताना विमा संरक्षण ही न टाळता येणारी पायरी आहे. त्यामुळे आवश्यक तितक्या विम्याचे व्यवस्थापन करणे आणि योग्य पात्रताधारक व्यावसायिकाकडून मार्गदर्शन मिळविणे कुटुंबाच्या आर्थिक आरोग्यास पोषक ठरते.

‘विमा एजंट’संबंधाने दक्षतेचे घटक

ग्राहकांनी आपल्या ‘विमा एजंट’च्या पात्रतेविषयक माहिती आवर्जून मिळवावी.

‘विमा विक्री’ हा त्याचा अर्धवेळ किंवा पूर्णवेळ व्यवसाय आहे हे तपासावे.

‘विमा एजंट’ विमाविषयक प्रासंगिक सुविधांविषयी प्रशिक्षित आहे का याची माहिती घ्यावी.

विमा एजंट’कडे विमा क्षेत्राचा एकूण अनुभव किती आहे याचा देखील विचार करावा.

ग्राहकांनी ‘विमा एजंट’ला उत्पन्न किती मिळते याचा विचार न करता प्रसंगी आपल्याला दर्जेदार सेवा मिळेल का याचा प्राधान्याने विचार करावा.
लेखिका पात्रताधारक वित्तीय नियोजनकार आणि व्यावसायिक विमा सल्लागार
bhakteerasal@gmail. Com