प्रत्येक गुंतवणुकीत जोखीम असतेच. एक ना अनेक स्वप्नं मनाशी बाळगून मोठय़ा अपेक्षेने गुंतवणूक करणाऱ्यांना मग धास्ती वाटणे स्वाभाविकच. भीती असेल तरच आपण काळजी घेतो. आणि भीती दूर व्हायची तर आपल्याला जोखीम समजायला हवी..
गुंतवणूक आणि जोखीम हे दोन शब्द एकत्र आले की आपल्याला शेअर बाजार नजरेसमोर येतो. बाकीच्या सर्व प्रकारच्या गुंतवणुका आपल्याला सुरक्षित वाटतात. बाकीच्या योजना समजण्यास सोप्या असतात म्हणून आपल्याला सुरक्षित भासतात.
आपल्या प्रत्येक गुंतवणुकीत जोखीम असतेच. एक वेगळे उदाहरण सांगायचे झाल्यास प्रवासाला निघाल्यावर कोणत्या मार्गाने जायचे याचे पर्याय असतात. चालत, रिक्षा, बस, गाडी, रेल्वे किंवा विमान. मग आपण अंतरानुसार पर्याय ठरवतो. आपल्याला विमानातून जाण्याची भीती वाटत असल्यास किंवा खर्च परवडत नसल्यास रेल्वेने जातो. परंतु वैमानिकास ही भीती नसते. गाडीने जाताना धोक्याचे वळण दाखवणारा बोर्ड पाहून चालक गाडीचा वेग थोडा कमी करतो. म्हणजे जोखीम म्हणजे काय? त्याचे स्वरूप काय? जोखमीचे नियोजन कसे करावे?
आपल्या अपेक्षेपेक्षा वेगळे घडणे म्हणजे जोखीम. गुंतवणुकीच्या संदर्भात ही जोखीम खालीलप्रमाणे असते-
१) व्याजदर कमी किंवा जास्त होण्याची जोखीम
२) व्याज वेळेवर न मिळण्याची जोखीम
३) मुद्दल कमी होण्याची किंवा बुडण्याची जोखीम
४) पुनर्गुतवणूक जोखीम
५) पत नामांकन कमी होण्याची जोखीम
६) तरलता जोखीम (छ्र०४्र्िर३८ फ्र२‘) परदेशात गुंतवणूक असल्यास
७) चलन विनिमय दर जोखीम,
८) देशाची सार्वभौमत्व जोखीम (र५ी१ी्रॠल्ल फ्र२‘) आणि गृहीत धरलेली जोखीम
९) महागाई व आयकर.
आपल्या प्रत्येक गुंतवणुकीत वरीलपैकी चार किंवा पाच जोखमी आपण घेत असतो. खूपदा या जोखमींची आपल्याला जाणीव नसते म्हणून त्याची भीती वाटत नाही. किंवा ती जोखीम आपण नकळत मान्य केलेली असते. उदा. आपण गुंतवणूक केल्यावर व्याजदर चढण्याची शक्यता आपण गृहीत धरतो.
आपल्या गुंतवणुका तीन प्रकारांत मोडतात- (१) तरल गुंतवणूक (२) रोखे गुंतवणूक आणि (३) सोने, चांदी, दुर्मीळ वस्तू, स्थावर मालमत्ता, शेअर्स म्युच्युअल फंड इ.

तरल गुंतवणूक
जिचे ४८ तासांत मोडून रोखीत रूपांतर करता येईल अशी ही गुंतवणूक. यात म्युच्युअल फंडांचे लिक्वीड फंड, बँकांची अल्प मुदतीची ठेव योजना यांचा अंतर्भाव होतो. या गुंतवणुकांवर व्याजदर कमी असतो.
बँकेतील ठेवीची मुदत संपल्यावर पुन्हा मुदतवाढीच्या सुमारास व्याजदर कमी होण्याची शक्यता असते.

Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
Blood Pressure drug
रक्तदाबाची औषधे मधेच बंद केल्याने तुम्हाला अधिक नुकसान होऊ शकते? काय सांगतात डाॅक्टर… 
woman works ten time then men
‘बायकांना काय काम असतं?’ हे वाक्य पुन्हा कुणी बोलणार नाही! पुरुषांपेक्षा ‘इतके पट’ अधिक काम करतात महिला

रोखे गुंतवणूक
यामध्ये जास्त मुदतीच्या गुंतवणुकांचा समावेश होतो. पी. पी. एफ., पोष्टाच्या योजना, बँकेच्या ठेवी, ९ टक्के व्याजाची ज्येष्ठ नागरिक योजना, कंपन्यांच्या ठेवी, कंपन्यांचे रोखे, सरकारी आस्थापने, राज्य सरकार व केंद्र सरकारचे रोखे यांचा समावेश होतो.
‘रोज मरे त्याला कोण रडे’ या न्यायाने महागाई व आयकर हे आपल्या कायमचे डोक्यावर बसल्याने त्या जोखमी आपल्या अंगवळणी पडल्या आहेत. पूर्वी पोस्टाच्या योजना, बँक ठेवी यातील व्याज काही प्रमाणात करमुक्त होते आता ही सवलत नाही. पोस्टाच्या मासिक योजनेत ८.६% व्याज, बँकाचे ९% व्याज, त्यावर २०% करवजा जाता हातात उरणारी रक्कम महागाई दरापेक्षा कमी असते. म्हणजे दरवर्षी आपले मुद्दल कमी होत जाते, पण आपल्याला हे लक्षात येत नाही. आपल्या चालू उत्पन्नातून आपण त्यात भर घालत असतो म्हणून आपली रु. ५००००/- ठेव मुदत संपल्यावर भर घालून रु. ७००००/- करतो. पण त्या रकमेची क्रयशक्ती कमी झालेली असते.
गरज नसताना आपण दरमहा व्याजाच्या योजनेत रक्कम गुंतवतो. दरमहा खात्यांत जमा होणारे व्याज पडून राहाते. किंवा पुनर्गुतवणूक करायचे ठरवल्यास चालू दराने रक्कम गुंतवावी लागते. रिझर्व बँकेच्या कडक धोरणांमुळे बँक बुडाली असे सहसा होत नाही, परंतु बँक बुडाल्यास फक्त एक लाख रुपयांपर्यंत इन्शुरन्सचे पैसे मिळतात. वरची ठेव रक्कम बुडते. व्याजासाठी इन्शुरन्स नसतो, म्हणजे आपला क्लेम मान्य होण्यास तीन वर्षे गेली तर त्या मुदतीचे व्याज बुडते. असे फार क्वचित होते. बहुतेक वेळा दुसरी बँक अशा आजारी बँकेस ताब्यात घेते म्हणून ही जोखीम आपण विचारातच घेत नाही. सर्व बँका कमी मुदतीसाठी जास्त व्याज देतात. म्हणजे १५ महिने किंवा ५५५ दिवसांसाठी जास्त व्याज आणि ३ वर्षांपेक्षा जास्त मुदतीसाठी कमी व्याज. बहुतेक सर्व बँकाची आपोआप मुदतवाढ योजना असते. (अ४३ १ील्ली६ं’) म्हणजे १५ महिन्यांनी पुन्हा १५ महिन्यांसाठी सगळ्यात कमीत कमी व्याज ठेवतात. म्हणून बँकेत ठेव ठेवतानाच दीर्घ मुदतीसाठी (५ वर्षे) कमी व्याजाने ठेव ठेवणे परवडते.
दीर्घ मुदतीच्या योजनांमध्ये मुदतीआधी पैसे काढून घेण्याची सोय नसते. काढल्यास व्याज बुडते. (तरलता जोखीम).
याव्यतिरिक्त कंपन्यांचे रोखे व ठेवी यावर पतनामांकन कमी होण्याची जोखीम, व्याज वेळेवर न मिळण्याची किंवा मुद्दल बुडण्याची जोखीम असते. काही वर्षांपूर्वी लॉइड फायनान्स कंपनीत ठेव ठेवताना ‘अअअ’ सर्वोच्च पतनामांकन होते. एका वर्षांच्या आत ते ‘ऊ’ म्हणजे धोकादायक झाले व लोकांचे व्याज बुडालेच, पण मुद्दलसुद्धा पूर्णपणे परत मिळालेली नाही. अशा संस्थांमध्ये गुंतवणूक करताना पैसे स्वीकारणारी संस्था कोण, त्याचा वापर ती संस्था कशाप्रकारे, कुठे करणार आहे हे तपासणे महत्त्वाचे असते. महागाईचा दर जास्त असेल, बाहेरून कर्ज उभारणे कठीण असेल तर आकर्षक व्याजदर दिले जातात. सर्वच कंपन्यांच्या ठेवी किंवा रोखे उच्च जोखीमयुक्त असतात असे नाही. टाटा किंवा एच.डी.एफ.सी. ही नावेच त्यांची पत दर्शवतात. त्यासाठी वेगळ्या पतनामांकनाची (उ१ी्िर३ १ं३्रल्लॠ) गरज नसते.

सोने-चांदी, दुर्मीळ वस्तू, स्थावर मालमत्ता
या सर्व गुंतवणुकांमध्ये किमती खाली जाऊ शकतात. भारतात स्थावर मालमत्तेच्या किमती प्रमाणाबाहेर वर जाण्याची व वरच्या स्थितीत राहण्याची कारणे वेगळी आहेत. परंतु हे असेच कायम राहील असे नाही. काही दिवसांपूर्वी एका उद्योगपतीने लेख लिहून चांदी येत्या दहा वर्षांत पृथ्वीतलावरून कशी संपून जाईल असे दाखवले होते. त्या सुमारास चांदीचे भाव रु. ७०,०००/-च्या वर गेले. आज चांदी रु. ६०,०००/- च्या जवळपास आहे. दुर्मीळ वस्तूंसाठी योग्य पारखी नसेल तर किंमत कमी येऊ शकते. दुर्मीळ वस्तू, चित्रकलाकृती विकून रक्कम त्वरित मोकळी करता येत नाही. बाजार जोखीम जास्त असते.
काही म्युच्युअल फंडांनी परदेशी गुंतवणूक करण्याच्या योजना चालू केल्या आहेत. अशा योजनांमध्ये परकीय चलन विनिमय दर बदलण्याचा धोका असतो. ही गुंतवणूक डॉलरच्या तुलनेत असते. समजा, गुंतवणूक ब्राझीलमध्ये असेल तर भारतीय रुपया, डॉलर व ब्राझील रिअल यांच्या विनिमयातील चढ-उताराची जोखीम असते. ब्राझील गुंतवणुकीतील फायदा डॉलरवर गेल्यामुळे नाहीसा होऊ शकतो. तसेच काही देशांतील गुंतवणुकांबाबत त्या देशाची सार्वभौम जोखीम घ्यावी लागते. १९९७ साली अतिपूर्वेकडील काही देशांत (इंडोनेशिया, थायलंडमध्ये) अशी परिस्थिती निर्माण झाली होती.    

जोखीम नियोजन
१) विमा उतरवणे
दुर्मीळ वस्तू, चित्रकलाकृती, सोने-चांदी यांचा  विमा उतरवता येतो. परंतु हा चोरी, वस्तू- चित्रे खराब होणे यासाठी असतो. किंमत कमी झाल्यास नुकसानभरपाई मिळत नाही.

२) समतोल गुंतवणूक
तरल गुंतवणूक, रोखे गुंतवणूक व जोखीमयुक्त गुंतवणूक (स्थावर मालमत्ता/ शेअर्स) याचा योग्य समतोल साधल्यास काही जोखीम कमी होतात. उदा. स्थावर मालमत्तेमधील तरलता जोखीम तरल गुंतवणुकीद्वारे कमी करता येते. व्याजदर चढे असताना दीर्घ मुदतीची गुंतवणूक रोख्यांत करून व्याजदर कमी होण्याची जोखीम सांभाळता येते.

३) जोखीम नियंत्रण/ सांभाळणे (फ्र२‘ ेल्ल्र३१्रल्लॠ)
म्युच्युअल फंड योजना किंवा एखाद्या शेअरबाबत जोखीम मोजण्यासाठी बिटा किंवा स्टॅण्डर्ड डेव्हिएशन यांसारख्या संकल्पनांचा वापर करून जोखमीचा अंदाज घेता येतो. त्यानुसार जास्त बिटा म्हणजे जास्त जोखीम, अशी गुंतवणूक परिस्थितीनुसार मोडणे.

४) जोखीम बाळगणे
आपल्या जबाबदाऱ्या, आर्थिक परिस्थिती, उत्पन्न याचा विचार करून काही जोखमी घेता येतात. अशा वेळेस जास्त जोखीम जास्त परतावा हा नियम लागू होतो.