scorecardresearch

‘ते’ विष नाही.!

उत्पन्न अधिक असूनही मोठे विमा छत्र नाही प्राप्तीकर वाचविण्यासाठी योग्य नियोजन नाही अधिकाधिक, ९५ टक्के गुंतवणूक ही स्थिर पर्यायात रत्नागिरीच्या मधल्या आळीत लोकोत्तर माणसे राहतात

niyojan2उत्पन्न अधिक असूनही मोठे विमा छत्र नाही प्राप्तीकर वाचविण्यासाठी योग्य नियोजन नाही अधिकाधिक, ९५ टक्के गुंतवणूक ही स्थिर पर्यायात रत्नागिरीच्या मधल्या आळीत लोकोत्तर माणसे राहतात असे ‘पुलंनी त्यांचे निरीक्षण नोंदले आहे. ज्यांचे बालपण अशा लोकोत्तर आजच्या माणसांच्या सानिध्यात गेले त्यांचे आज नियोजन जाणून घेणार आहोत.
जागुष्टे कुटुंबातील संदीप व मीनल हे दोघेही मुळचे रत्नागिरीचे. संदीप हे मधल्या आळीतील तर मीनल यांचे माहेर वरच्या आळीत. सध्या जागुष्टे कुटुंबाचे वास्तव्य पुण्यातील कर्वेनगर भागात असते. जागुष्टे कुटुंबात संदीप (३८) मीनल (३८) ओवी (१२) व आर्या (७) असे चारजण आहेत.
संदीप हे कॉलेज ऑफ इंजीनीअिरग, पुणे या संस्थेचे धातूशास्त्र विषयातील पदवीधारक असून आयआयटी दिल्लीचे पदव्युत्तर पदवीधारक आहेत. ते लघुउद्योजक आहेत व  वाहन उत्पादकांना गंज विरोधक लेपन केलेले सुटे भाग पुरविण्याचा त्यांचा व्यवसाय आहे. घरची उद्योगाची पाश्र्वभूमी नसताना देखील कष्टाने ज्यांनी या उद्योगाचा जम बसविला आहे. मीनल या गृहिणी आहेत व ओवी  व आर्या शिक्षण घेत आहेत. संदीप यांचा व्यवसाय भागीदारीत असून भविष्यात त्यांना सध्याच्या भागीदारी व्यवसायाचे येत्या दोन वर्षांत प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत रुपांतर करण्याची योजना आहे.
जागुष्टे कुटुंबाच्या सध्याच्या आíथक ढाच्यात अनेक त्रुटी जाणवल्या. या त्रुटी केवळ जागुष्टे कुटुंबाच्या नियोजनात दिसल्या नाहीत तर अनेक व्यावसायिकांच्या बाबतीत दिसतात. या पकी पहिली त्रुटी म्हणजे संदीप यांच्याकडे मोठे विमा छत्र नसणे. संदीप हे स्वत:चे वेतन स्वत:चा ठरवत असल्याने व आयकर वाचविण्यासाठी अकार्यक्षम का होईना पण नोकरीपेशातील मंडळी जशी नियोजन करतात तसे संदीप यांनी केलेले नाही. साहजिकच संदीप यांनी तातडीने आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेकडे लक्ष देणे जरुरीचे आहे. संदीप यांचे उत्पन्न नोकरीपेशातील व्यक्तीपेक्षा वेगाने वाढणार असल्याने स्थिर विमा हप्त्यात दरवर्षी वाढ होणारे विमाछत्र देणारी पॉलिसी (Increasing Risk Cover Policy) खरेदी करणे योग्य आहे. एसबीआय लाईफची ‘ई शिल्ड’ व बिर्ला सनलाईफची ‘प्रोटेक्टर प्लस’ या पकी एकाची निवड करावी. बिर्ला सनलाईफच्या पॉलिसीत दरवर्षी पाच टक्के व दहा टक्के विमाछत्र वाढू शकणारे पर्याय उपलब्ध आहेत तर एसबीआय लाईफच्या पॉलीसीत दर पाच वर्षांनी विमाछत्रात दहा टक्के वाढ होते. दोन्ही कंपनींच्या विमा प्रतिनिधींकडून पॉलिसीचे सादरीकरण मागवून ७५ लाख किंवा एक कोटी विमाछत्राने सुरवात होऊन मुदतपूर्तीवेळी पुढील २० वर्षांत अडीच कोटी विमा छत्र उपलब्ध असेल अशी विमा पॉलिसी खरेदी करावी. तसेच सध्या आपल्याकडे असलेले आरोग्य विमाछत्र अतिशय अपुरे आहे. आपले उत्पन्न पाहता (जागुष्टे कुटुंबाने मागील पाच वर्षांत तीन परदेश सहली केल्या.) आपल्याला कमीतकमी २० लाखाच्या विमा छत्राची जरुरी आहे. त्याचाही आपण विचार करावा.
जागुष्टे कुटुंबांकडे मोठी रोकड सुलभता आहे. त्यांची मीनल यांनी दिलेल्या तपशिलानुसार ९५ टक्के गुंतवणूक पीपीएफ, बँक व पोस्टाच्या मुदत ठेवी पोस्टाची मासिक उत्पन्न योजना व एलआयसीचे एन्डोंमेंट प्रकारच्या योजना यामध्ये आहे. केवळ पाच टक्के गुंतवणूक समभाग गुंतवणूक असलेल्या म्युच्युअल फंड योजनातून केली आहे. केवळ जागुष्टे कुटुंबच नव्हे तर अशी अनेक कुटुंबे पाहण्यात आहेत ज्यांना शेअर बाजाराशी संबंधित गुंतवणूक विषसमान वाटते. समभाग सदृश्य गुंतवणुकीचे महत्व अनेकांना कळत नाही. यासाठी सोबत एक कोष्टक देत आहे. तीन वष्रे पाच वष्रे दहा वष्रे व वीस वष्रे या कालावधीत म्युच्युअल फंडांच्या ‘सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान’ किंवा ‘सिप’ प्रकारे केलेल्या गुंतवणुकीवर मिळालेल्या परताव्याच्या दर दर्शविणारा हे कोष्टक आहे.
av-08

वरील परताव्याच्या दरावरून हे लक्षात येईल की समभाग गुंतवणुकीचा दीर्घकालीन परतावा अव्वल असतो. सेबीच्या संकेतस्थळावरदेखील शंभर रुपये बचतीपकी किमान पन्नास रुपये समभाग सदृश्य गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. मागील आठवडय़ातील नियोजनात  सेवा निवृतीपश्चात समभाग सदृश्य गुंतवणूक करण्याचा सल्ला याच भूमिकेतून दिला होता.
बचतीची क्रयशक्ती टिकवणे हे सर्वात महत्वाचे आहे. मीनल यांनी पुरविलेल्या तपशिलानुसार त्यांच्या गुंतवणुकीवर परताव्याचा करपश्चात दर ६.२२ टक्के आहे. सद्यस्थितीत महागाईचा दर आठ टक्के गृहीत धरला तरी जागुष्टे कुटुंबाच्या बचतीची क्रयशक्ती १.७८ टक्क्याने कमी होत आहे.
दुसऱ्या बाजूला मुलांचे शिक्षण, आरोग्य निगा यांचा खर्च दरवर्षी सरासरी दहा टक्याहून अधिक दराने वाढत आहे. व्यवहारात अन्य काही खर्च याहून अधिक दराने वाढत आहेत. आपण असे समजत असाल की, बचत करीत आहोत; परंतु प्रत्यक्षात दरवर्षी तुमच्या पशाचे मोल १.७८ टक्क्याने कमी होत आहे.
समभाग सदृश्य गुंतवणूक :
संदीप जागुष्टे यांचे वय व कुटुंबाच्या वेगवेगळ्या गुंतवणूक साधनांतून केलेल्या गुंतवणुका पाहता एकूण ८० लाखाच्या गुंतवणुका समभाग सदृश्य असणे आवश्यक आहे. यापकी ५० लाख दोन ‘पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सíव्हस’ अर्थात ‘पीएमएस’ सेवा देणाऱ्या पकी दोघाच्या पीएमएसमध्ये गुंतवा. जागुष्टे यांना चार सुचविलेल्या नावांनी वार्षकि १८ ते ३४ टक्के परतावा मागील पाच वर्षांत दिला आहे. या पकी दोघांची किंवा किमान एकाची निवड जागुष्टे कुटुंबाने करायची आहे. उर्वरीत रक्कम म्युच्युअल फंडांच्या माध्यमातून करायची आहे.
प्रत्येकाचा कोणी तरी अनौपचारिक गुंतवणूक सल्लागार असतो. ‘वासरात लंगडी गाय शहाणी’ या म्हणीला अनुसरून या व्यक्तीला कुटुंबातील अन्य सदस्यांपेक्षा ‘जरा बरे’ ज्ञान असल्याने ही व्यक्ती जे सांगेल त्यावर या कुटुंबातील सदस्य विश्वास ठेवतात. अमक्याचा भाचा, तमक्याचा पुतण्या शेअर बाजारात बुडाला, तेव्हा शेअर बाजार म्हणजे सट्टा, असे मानणारी अनेक कुटुंबे आजही आजूबाजूला दिसतात. Market always reward for taking systematic risk हे वॉरेन बफे यांचे वाक्य लक्षात ठेवणे गरजेचे आहे. वरील आकडेवारी बफे यांच्या विधानाची पुष्टी करते.
मोठी रोकड सुलभता असलेल्यांनी समभाग गुंतवणूक करायची किंवा नाही हा निर्णय घेणे आवश्यक असते; परंतु हा मुख्य निर्णय न घेता बाकी सर्व निर्णय घेतले जातात. तेव्हा वरील आकडेवारीस अनुसरून जागुष्टे कुटुंबाने नियंत्रित धोका असलेली समभाग गुंतवणूक की बिनधोक स्थिर उत्पन्न देणाऱ्या गुंतवणुका करायचा याचा निर्णय शक्य तितक्या लवकर घ्यावा.
संपत्ती वाढविण्यास रोकड सुलभतेच्या जोडीला समभाग गुंतवणूक हवीच. समभाग गुंतवणुकीच्या दीर्घ कालीन पराताव्याशी अन्य कोणीही बरोबरी साधू शकत नाही. आजचा सल्ला केवळ जागुष्टे कुटुंबालाच नव्हे तर समभाग गुंतवणूक विषसमान समजणाऱ्या समस्त वाचकांना देता येईल.
shreeyachebaba@gmail.com

(‘मागील परताव्याचा दर हा भविष्यातील परताव्याची खात्री देत नाही’ व ‘समभाग गुंतवणुका या शेअर बाजाराच्या जोखमीशी निगडीत आहेत’ हे दोन सेबीचे इशारे लक्षात घेऊन गुंतवणूक ही आपल्या आíथक सल्ल्लागाराच्या सल्ल्यानुसार करावी.)
‘अर्थ वृत्तान्त’संबंधी अभिप्राय/प्रतिक्रिया कळवा:arthmanas@expressindia.com

कुटुंबाच्या सुरक्षिततेकडे लक्ष आवश्यक
स्थिर विमा हप्त्यात दरवर्षी वाढ होणारे विमाछत्र देणारी पॉलिसी हवी
विमा छत्राचा आकार वाढवायला हवा
बचतीची क्रयशक्ती टिकवणे गरजेचे
पीएमएस, म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक हवी

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त ( Arthvrutant ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Despite more income no major insurance cover

ताज्या बातम्या