नियोजनकाराशी चर्चा करेपर्यंत आपल्या कुटुंबाची आíथक उद्दिष्टय़े काय? कोणती असावीत? हा विचार डोक्यात मागच्या बाजूस कुठे तरी असतो खरा, पण ते लिखित स्वरूपात उतरलेला नसतो. उद्दिष्टय़े, इच्छा आणि अपेक्षा यांची सरमिसळ झालेली असते. आधी काय साध्य करायचे हा पक्का विचार हवा. मग पुढे हेच का? आणि कसे? ही प्रश्न आणि त्यांची उत्तरे येतीलच..
आíथक नियोजन करताना नियोजनकार आपल्या ग्राहकाची संपूर्ण माहिती विचारतो. त्यात वैयक्तिक माहिती, कौटुंबिक (आíथक) जबाबदाऱ्या, उत्पन्न-खर्च, आयकर, गुंतवणुका वगैरे बरोबरीनेच आíथक उद्दिष्टय़े विचारतो.
ही उद्दिष्टय़े काळानुरूप तीन प्रकारची असतात.
* छोटय़ा अवधीत पूर्ण करण्याची (तीन वर्षांपर्यंतच्या कालावधीत पूर्ण करावयाची) उदा. दोन वर्षांत नवीन गाडी खरेदी करणे; घराचे नूतनीकरण करणे, परदेश सफर..
* मध्यम पल्ल्याची (चार ते सात वर्षांपर्यंत पूर्ण करावयाची) उदा. नवीन घर खरेदी, मुलांचे उच्च शिक्षण..  
* दीर्घ मुदतीत पूर्ण करावयाची (सात वर्षांपेक्षा जास्त कालावधीत पूर्ण करावयाची) उदा. निवृत्तीपश्चात जीवनाचे नियोजन..
हा कालावधी वयानुसार बदलत असतो. ५७ वष्रे वयाच्या माणसाचे नियोजन करताना निवृत्ती नियोजन हे छोटय़ा अवधीत पूर्ण करावयाचे उद्दिष्ट असते. तर ४५ ते ५० वयोगटात, मुलांचे उच्च शिक्षण हे छोटय़ा अवधीत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असते. हेच उद्दिष्ट ३० वर्षांच्या ग्राहकासाठी दीर्घ मुदतीत साध्य करावयाचे असते.
या व्यतिरिक्त काही उद्दिष्टय़े आपल्या अशीलाने नमूद केलेली नसतात. आपली ही उद्दिष्टय़े आहेत याची जाणीवच त्यांना नसते. उदा. घरासाठी घेतलेले कर्ज समजा ३५ लाख रुपये असेल तर कमीत कमी आयुर्वमिा ३५ लाखांचा हवा तर तो २० लाखाचाच असतो. या जास्तीच्या आयुर्वम्यिाची गरज लक्षात आलेली नसते. तसेच  इच्छापत्र हे निवृत्तीनंतरच बनवायचे असे गृहीत धरून बनवलेले नसते. या गरजा नियोजनकार नजरेस आणून देतो.

नियोजनकाराशी चर्चा करेपर्यंत आपल्या कुटुंबाची आíथक उद्दिष्टय़े काय? कोणती असावीत? हा विचार डोक्यात मागच्या बाजूस कुठे तरी असतो खरा, पण ते लिखीत स्वरूपात उतरलेला नसतो. यासाठी आíथक नियोजनकार एक क्लृप्ती सांगतो. तुमच्या कुटुंबाचा फोटो काढून त्यावर लिहून ठेवा. मुलांचे शिक्षण.. नवीन ड्रीम होम.. आपल्या कल्पनेतील नवीन गाडी..  आणि हा फोटो तुमच्या आरशावर चिकटवून ठेवा म्हणजे ती उद्दिष्टय़े रोज तुमच्या नजरेसमोर राहतील व निश्चित पूर्ण होतील.
उद्दिष्टय़े निश्चित करणे हा आíथक नियोजनातील महत्त्वाचा टप्पा असतो. कदाचित एक बठक केवळ उद्दिष्टय़े निश्चित करण्यातच खर्च होते. म्हणजे उद्दिष्टय़े, इच्छा आणि अपेक्षा यांची सरमिसळ झालेली असते. जी उद्दिष्टय़े साध्य करणे शक्य वाटते तीच विचारांत घेऊन बाकीच्या ख्वाईश (इच्छा) बाजूला काढाव्या लागतात. उदाहरणार्थ, माझ्या मित्राचे कोकणात वडिलोपार्जति चिरेबंदी घर होते. काही कारणामुळे ते घर त्याच्या हातून गेले. याची ख्वाईश होती की, कोकणात समुद्राच्या जवळपास, कौलारू घर बांधायचे. दोघे नवरा-बायको नोकरी करणारे मध्यमवर्गीय व मुंबईत राहत्या घराचे कर्जाचे हप्ते भरत होते. कर्ज संपत आले होते. म्हणून दुसरे कर्ज घेण्याच्या विचारात होते. प्लॉटसाठी स्वत:चे दहा लाख रुपये खर्च झाले होते आणि आणखी १५ ते २० लाखांचे कर्ज घ्यावे, असा हिशेब होता. त्याला म्हटले घर बांधण्यासाठी तू रजा घेऊन कोकणात कधी जाणार?
‘तो जरा प्रश्नच आहे कारण माझ्या रजा मुलांच्या सहामाही परीक्षेत जातात व बायकोच्या रजा वार्षकि परीक्षांत जातात. एखादी सहल झाली की पुढल्या वर्षीसाठी शिल्लक रजा शून्य.’’
या संवादात पुढे, बँका चिरेबंदी, कौलारू घरासाठी कर्ज देत नाहीत म्हटल्यावर फुग्यातील अर्धी हवा निघून गेली. घरात वस्ती नसेल तर घराची कौलेसुद्धा चोरीस जातील म्हटल्यावर पूर्ण जमिनीवर उतरायला झाले. मी मित्राला सोपा उपाय सांगितला. स्वत: घर न बांधता त्याचा आनंद मिळविण्याचा. त्याला दरवर्षी कोकणात वेगवेगळ्या गावात उतरण्याची सोय होईल असे पत्ते सांगितले. तो खुश झाला. त्याचे २५ लाख रुपये वाचले होते. ते नंतर मुलांच्या उच्च शिक्षणासाठी उपयोगी पडले.
२५ ते ३० वयोगटात घरासाठी कर्ज काढलेले असते त्याचे दरमहा हप्ते जात असतात. मराठी माणूस डोक्यावरचे कर्ज लवकरात लवकर फेडून टाकण्याच्या मागे लागलेला असतो. म्हणून बचत खात्यात काहीही न ठेवता दरमहा जास्त रक्कम फेडून टाकण्याच्या मागे असतो. मग आपत्कालीन  परिस्थितीत हातात तरल गुंतवणूक काहीही नसते. आíथक नियोजन करताना तुमच्या मासिक उत्पन्नाच्या सहा पट रक्कम तरल गुंतवणूक स्वरूपात करणे आवश्यक ठरते. समजा कोणत्याही कारणाने नोकरी गेली किंवा अपघातामुळे सहा महिने घरी बसावे लागले तर सहा महिनेपर्यंत घरखर्च, कर्जाचे हप्ते, आयुर्वम्यिाचे हप्ते आणि एस.आय.पी.ची दरमहा रक्कम भरण्याची सहज सोय तरल गुंतवणूक मोडून करता येते.
खूपदा तरुण जोडपी गरज नसातान खूप मोठे घर खरेदी करतात. त्यांच्या कर्जाच्या हप्त्यांबरोबरच घरातील वस्तू खरेदीसाठी कर्ज घेतलेले असते. समजा दोघांपकी एकाची नोकरी गेली तर एकाच्या उत्पन्नातून भरमसाठ हप्ते भरताना नाकात दम येतो. म्हणून आíथक नियोजनकार तुमच्या उत्पन्नाच्या फक्त एक तृतीयांश रकमेपर्यंत हप्ते असावेत असे सुचवतात.
तरुण जोडप्यांचे आíथक नियोजन करताना त्यांच्या लहान मुलांच्या शिक्षणाची सोय कशी ठरवायची हा प्रश्न असतो. आईला वाटते मुलाने डॉक्टर व्हावे, वडिलांना वाटत असते की इंजिनीयर व्हावे आणि कदाचित मोठेपणी मुलगा आíकटेक्ट होतो. मग आíथक तरतूद किती करायची? आपण आíथक तरतूद आपल्या आíथक स्तरानुसार, आपल्या परिस्थितीनुसार जास्तीत जास्त करावी. रक्कम कमी लागली किंवा मुलाला गुणवत्तेनुसार लागलीच नाही तर ही रक्कम दुसऱ्या उद्दिष्टांसाठी वापरता येते.
आज सर्व आस्थापनांमध्ये कामाचे तास वाढलेले आहेत. एक नोकरी सोडून दुसरीकडे गेल्यास परिस्थिती तीच असते. सर्व मित्रमंडळी एकमेकांजवळ किती वेळ काम करावे लागते हेच रडगाणे गात असतात. प्रत्येकास असे वाटते की ४५-५० वयादरम्यान स्वेच्छानिवृत्ती  घेऊन मनाप्रमाणे (अर्थात कमी वेळ!)  व आवडेल ते काम करावे ही ख्वाईश असते. वस्तुस्थिती फार निराळी असते. निवृत्तीनंतर फक्त आíथक नियोजनच नव्हे तर वेळेचे नियोजन व इतर सामाजिक जबाबदाऱ्यांचे नियोजन तितकेच महत्त्वाचे असते.
निवृत्तीपूर्वी बारा तास काम करणारी माणसे निवृत्तीच्या दिवशी आरामाचा आनंद उपभोगतात आणि एका आठवडय़ानंतर  वेळ कसा काढायचा या चिंतेत असतात. या वयात नातवंडे नसतात. त्यामुळे दुसऱ्या कामात मन गुंतवावे लागते. त्यातच पत्नी सरकारी नोकरीत आनंदी असेल तर घरात आपण एकटे असतो व कदाचित (होय कदाचित!) आपले अचानक उद्भवलेले कायम अस्तित्त्व मुलांना नकोसे होते.आíथक बाबतीत नवीन उपक्रम चालू करायचा तर काय करायचा? त्याचे नियोजन केलेले नसते. मग मी माझ्या ग्राहकास निवृत्ती न घेता डेल कान्रेजीचे सुप्रसिद्ध पुस्तक ‘‘हाऊ टू एन्जॉय युअर लाईफ अ‍ॅण्ड युअर जॉब’’ वाचावयास दिले.
उद्दिष्टय़े निश्चित करताना काय? का? कसे? (व्हॉट, व्हाय, हाऊ) हे प्रश्न महत्त्वाचे असतात. काय साध्य करायचे हा विचार करताना, हेच का? (पर्याय काय) याचे उत्तर महत्त्वाचे असते, मग कसे हा प्रश्न आíथक नियोजनकार चुटकीसरशी सोडवू शकतो.
(लेखक ‘सेबी’कडे नोंदणीकृत  व्यावसायिक गुंतवणूक सल्लागार आहेत)
या नियमांशी स्वत:ला जुळवून घेता येते का ते पाहा, काही निश्चित उद्दिष्टय़े नक्कीच ठरविता येतील..
०     तुमच्या मासिक उत्पन्नाच्या सहा पट रक्कम रोकडसुलभ तरल गुंतवणूक असणे आवश्यक ठरते.
०     घरासाठी घेतलेले कर्ज जितके असेल कमीत कमी तितके तरी आयुर्वम्यिाचे छत्र असायला हवे.
०     कर्जाचा हप्ता मासिक वेतनाच्या एक तृतीयांश रकमेच्या मर्यादेपर्यंत राहील, इतकेच कर्ज घेतलेले असावे.