vitt-bhanउत्पन्नाच्या बाबतीत आपण जागरूक असतो. कोणती बँक व्याज जास्त देते; व्याजातून प्राप्तीकर कापला जाऊ नये म्हणून कोणत्या म्युच्युअल फंडाचा परतवा जास्त आह यावर आपली बारीक नजर असते. पण खर्च लिहीलेलाच नसतो तर तपशील देणार काय? आणि मागोवा काय घेणार? खर्च लिहून ठेवला तर त्याचे वर्गीकरण व विश्लेषण करता येते.
आíथक नियोजनात, आíथक शिस्त अभिप्रेत आहे. पहिला नियम उत्पन्न वजा खर्च बाकी शिल्लक गुंतवणूक; हे समीकरण बदलून उत्पन्न वजा सुनिश्चित बचत बरोबर खर्च असे करणे. यात सुनिश्चित बचत फार महत्त्वाची, म्हणजे खर्चाला पाय फुटत नाहीत.
यासाठी सोपा उपाय म्हणजे खात्यात पगाराचा चेक जमा झाला की लगेच त्यातून एसआयपीचा किवा आयुर्वम्यिाचा हप्ता, कर्जाचा हप्ता खात्यातून वजा होण्याची तरतूद करणे.
आíथक नियोजनकार, नियोजनासाठी आपल्या ग्राहकाकडून आपल्या गुंतवणूका, कर्ज, उद्द्ष्टिय़े या बरोबरच उत्पन्न व खर्चाचा तपशीला मागतो. गुंतवणूक, उत्पन्न, आयकर, कंपनी मार्फत मिळणाऱ्या सोयी-सुविधा (उदा. प्रवासभत्ता, आरोग्य विमा) सर्वाचा तपशील अतिशय विस्तृतपणे दिला जातो.
आपण आपल्या उत्पन्नाच्या बाबतीत अतिशय जागरूक असतो. कोणती बँक अर्धा टक्का, एक टक्का व्याज जास्त देते; व्याजातून आयकर कापला जाऊ नये म्हणून काय पळवाटा काढता येतील, कोणत्या म्युच्युअल फंडाचा परतवा जास्त आहे, (जोखिम विचारात न घेता) यावर आपली बारीक नजर असते.
पण खर्च लिहिलेलाच नसेल तर तपशील देणार काय? आणि मागोवा काय घेणार? खर्चाचा तपशील पाहून आíथक नियोजनकार काही बाबतीत मार्गदर्शन करतो. उदा. आपले राहणीमान, दूध फळे भाजीपाला यावरील खर्च आणि जिमचा खर्च पाहून आरोग्यविमा योग्य रकमेचा सुचवतो.
दुसऱ्या चौकटीतील आवश्यक पण बदलता खर्च खूप कमी करता येत नाही. ५ ते १० टक्के खर्च काही बाबतीत कमी करता येतो किंवा काही खर्च थोडय़ा अवधीसाठी पुढे ढकलता येतो. उदा. घर सजावट व दुरुस्ती.
तिसऱ्या चौकटीतील ऐच्छिक व स्थिर खर्च १५ ते २० टक्के कमी करता येतो. दूरदर्शन संच, म्युझिक सिस्टीम या किंमती वस्तू किती महाग निवडायच्या याचे स्वातंत्र्य आपल्याला असते.
ऐच्छिक व बदलता खर्च आपल्या जीवन राहणीमानानुसार (लाईफ स्टाईलनुसार) बदलत असतो यात २५ ते ३५ टक्के बचत करता येते.

av-02
खर्च लिहून ठेवला तर त्याचे वर्गीकरण व विश्लेषण करता येते. मग आíथक नियोजनकाराची मदत न घेताही आपणच काही निर्णय घेऊ शकतो. कोणते खर्च आवरते घ्यायचे याचा अंदाज आपल्याला येतो. खर्च कमी करणे म्हणजेच बचतीत वाढ व गुंतवणूकीत वाढ. खर्च कमी करणे म्हणजे तुम्ही कंजूष होणे नव्हे, तर त्यावर आपले संपूर्ण नियंत्रण असणे. खर्च लिहीला तर मागील वर्षांपेक्षा यावर्षी तो किती वाढला याचा अंदाज येतो. मग सरकार काय सांगते, महागाई ५ टक्के आहे; पण माझा तर खर्च १० टक्क्याने वाढतोय! याची जाणीव होते. आतातर काय सरकार म्हणते अन्नधान्य भाजीपाला यातील महागाईतील वाढ मागील सहा ते आठ महिने उणे आहे! पण तरी माझा खर्च तर वाढतोच आहे.
आज विविध मराठी चॅनल्सच्या विविध ‘लफडंतीका’ बघण्यात आजी-आजोबांपासून नातवंडांपर्यंत सर्वाचा वेळ जातो. त्यात एकत्र बसून सर्वानी परवचा म्हणणे इतिहास जमा झाले आहे. तसेच घरखर्च लिहिण्याचे झाले आहे. मला आवठते आहे मी ९-१० वर्षांचा असल्यापासून वडील मला विचारत असत, तू आज काय खर्च केलास? त्यात माझासुद्धा सहभाग असायचा, मग मी बाजारातून मिरच्या, कोिथबीर आणलेली, आई सांगायची विसरली असल्यास त्याची नोंद केली जायची. घरखर्च लिहिणे हा सुद्धा मुलांवर करण्याचा संस्कार आहे. मग पॉकेटमनीचा हिशोब मागितल्यावर त्यांचा इन्सल्ट होणार नाही.

lancet study on breast cancer how early diagnosis and understanding relapse can help women
भारतात दर चार मिनिटांनी एका महिलेला स्तनाच्या कर्करोगाचे निदान; महिलांकडे दुर्लक्ष होतंय का? वाचा तज्ज्ञांचं निरीक्षण
Loksatta explained What are the reasons for the fall of the rupee against the dollar and what are its consequences
गेल्या १० वर्षांत २८.३ टक्के घसरण… डॉलरपुढे रुपयाची घसरण आणखी कुठपर्यंत? कारणे काय? परिणाम काय?
Loksatta explained Is Apple ReALM better than ChatGPT
ॲपलचे ReALM चॅटजीपीटीपेक्षा सरस? येत्या जूनपासून ‘एआय’ क्षेत्रात धुमाकूळ?
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…

* आवश्यक व स्थिर खर्च
घरभाडे किंवा सोसायटीचे मासिक देणे शाळा, कॉलेजची फी विम्याचे हप्ते घर कर्जाचे हप्ते गाडी/वाहन कर्जाचे हप्ते इतर हप्ते व्यावसायिक / लायसन्स फी
* आवश्यक पण बदलता खर्च आयकर व इतर कर भाज्या, दूध, फळे, धान्य इ. प्रवासखर्च कपडेलक्ते फोन, वीज, गॅस
पेट्रोल वाहन दुरुस्ती व देखभाल घरातील वस्तू देखभाल व दुरुस्ती घर दुरुस्ती वैयक्तिक व इतर
* ऐच्छिक व स्थिर खर्च जिमखाना/ व्यायामशाळा फी सभासदत्व वर्गणी मोठ्या वस्तू खरेदी उदा. टि.व्ही. फ्रीज
* ऐच्छिक व बदलता खर्च शॉिपग सिनेमा, महागडय़ा, हॉटेलमध्ये जेवण सुट्टीतील प्रवास भेटवस्तू देणग्या इतर सामाजिक खर्च

चार भागांत विभागणी केल्यावर कोणता खर्च आपण किती प्रमाणात कमी करू शकतो याचा अंदाज येतो. आपल्याला असे वाटते पहिल्या चौकोनातील खर्च आवश्यक आहे, तो वाचवणार कसा? आजच्या तरुणांत नवरा-बायको दोघांच्या एकत्रित उत्पन्नाच्या ५५ ते ६० टक्क्यापर्यंत कर्जाचे हप्ते असतात. घरासाठी कर्ज,वाहन कर्ज,घरातील वस्तूंसाठी कर्ज घेतलेले असते. एकाची नोकरी गेली तर हप्ते भरणे शक्य होत नाही. आíथक नियोजनकार सर्व प्रकारच्या कर्जाचे हप्ते एकूण करपश्चात उत्पन्नाच्या, 35% पर्यंत मर्यादित असावेत असे सांगतात. आयुर्वमिा मुदतीचा (टर्म) असेल तर हप्ता खूप कमी होतो.
sebiregisteredadvisor@gmail.com
(लेखक सेबीकडे नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार आहेत.)