niyojan2कुटुंबियांना आíथक संरक्षण देण्याच्या दृष्टीने मुदतीचा विमा ही आíथक नियोजनातील पहिली पायरी होय. आजही अनेकांची मानसिकता टर्म प्लान घेण्याची नसते. कारण विम्याच्या मुदतीनंतर पसे परत मिळत नाहीत. परंतु कमी पशात मोठे विमा छत्र केवळ टर्म प्लान मध्येच मिळू शकते. काळबादेवी येथे लागलेल्या आगीत अग्निशमन दलातील मृत्यूमुखी पडलेल्या अधिकारयांच्या कुटुंबियांना त्यांच्या मृत्यूपश्चात मिळालेल्या रकमेचा तपशील जाहीर झाला आहे. मिळालेली सतरा-अठरा लाखाची रक्कम अतिशय तुटपुंजी आहे. मुलांचे शिक्षण त्यांच्या वयाच्या बावीस-तेविसाव्या वर्षांपर्यंत सुरु असते. पालकांचे विमाछत्र त्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयापर्यत किंवा मुलांची पंचाविशी यापकी जे आधी असेल तिथपर्यंत तरी असावे.
अवघ्या सतरा दिवसांपूर्वी जन्मलेल्या श्रीप्रिया शैलेश सुप्रिया नाईक या बालिकेचे नियोजन आज जाणून घेऊ. शैलेश (३२) व सुप्रिया नाईक (२९) हे नवी मुंबईत एक दाम्पत्य. शैलेश वाशीतील एका कायम विनाअनुदानित शाळेत शिक्षक आहेत तर सुप्रिया या पनवेल येथील एका कायम विनाअनुदानित तत्वावरील शाळेत शिक्षिका आहेत. दोघांना मिळून वजावटी पश्चात मासिक ७७ हजार वेतन मिळते. ब्रिटिीा राजघराण्यात ज्या दिवशी प्रिन्सेस शाल्रेट जन्माला आली त्याच दिवशी या जोडप्याला पहिल्या कन्यारत्नाचा लाभ झाला. आईवडिलांनी या बालिकेचे नांव श्रीप्रिया (अर्थ: लक्ष्मी) असे ठेवले असून लाडाने तिला ‘प्रिन्सेस प्रिया’ असे म्हणतात. आपल्या मुलीला अथवा मुलाला एखाद्या राजकुमारी अथवा राजकुमाराला जी सुखे मिळतात ती सुखे मिळावीत, असे प्रत्येक आईवडिलांना वाटत असते.  या साठी त्यांची धडपड चाललेली असते. शैलेश व सुप्रिया हे ‘अर्थ वृत्तान्त’चे वाचक असल्याने व त्यांना त्यातील सल्ला मोलाचा वाटत असल्याने त्यांनी आपल्या नियोजनासाठी ‘अर्थ वृत्तान्त’चे मार्गदर्शन घेण्याचे ठरविले. सुप्रिया त्यांच्या गर्भधारणेचा सातवा महिना असून देखील‘अर्थब्रम्ह’च्या ठाणे येथे झालेल्या प्रकाशन सोहळ्याला शैलेश यांच्या सोबत हजर होत्या. या समारंभानंतर झालेल्या या भेटीत जन्मानंतर नवजात बालकाचे नियोजन लगेचच सुरु व्हावे, असा विचार शैलेश यांनी बोलून दाखविला. आजचे नियोजन हे त्याचेच फलित आहे.
शैलेश व सुप्रिया यांच्या चार एसआयपी वेगवेगळ्या फंडात सुरू होत्या. राहत्या घरासाठी घेतलेल्या कर्जाचा हप्ता अजून १८ वष्रे फेडायचा असल्याने श्रीप्रियासाठी मासिक दोन हजार इतकीच बचत त्या करू शकतात. त्या बाबतीत मार्गदर्शन करावे अशी विनंती त्यांनी प्रत्यक्ष भेटीत केली होती. शैलेश व सुप्रिया हे मागील तीन वर्षांपासून एसआयपी करीत होते शैलेश व सुप्रिया यांच्या सध्याच्या गुंतवणुकीचे फेर नियोजन करणे आवश्यक भासल्याने सर्व एसआयपी बंद करण्याचा सल्ला दिला.
श्रीप्रियास आíथक संरक्षण देण्याच्या दृष्टीने दोघांनी टर्म प्लान खरेदी करणे ही पहिली पायरी होती. आजही अनेकांची मानसिकता टर्म प्लान घेण्याची नसते. काळबादेवी येथे लागलेल्या आगीत अग्निशामन दलातील मृत्यूमुखी पडलेल्या अधिकाऱ्यांना मिळालेल्या रकमेचा तपशील हा लेख लिहीत असताना जाहीर झाला आहे. मिळालेली  १७-१८ लाखाची रक्कम अतिशय तुटपुंजी आहे. मुलांचे शिक्षण त्यांच्या वयाच्या २२-२३व्या वर्षांपर्यंत सुरू असते. पालकांचे विमाछत्र निदान मुलांच्या पंचविशीपर्यंत तरी असावे. सुप्रिया गरोदर असल्याने त्यांना त्यावेळी कोणतीही पॉलिसी मिळणार नव्हती. शैलेश यांनी ५० लाखाचे विमा छत्र असलेला व तीस वष्रे मुदत असलेल्या एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स वगळता अन्य सात कंपन्यांपकी एकाची निवड करण्यास सांगितले. त्यानुसार शैलेश यांनी एसबीआय लाइफची निवड केली. या साठी ते ८,८३७ रुपये वार्षकि हप्ता देत आहेत. सुप्रिया या येत्या दोन-चार महिन्यात एचडीएफसी लाइफ वगळता अन्य सात कंपन्यातून एका कंपनीचा ५० लाखाचे विमा छत्र असलेला व तीस वष्रे मुदतीचा टर्म प्लान खरेदी करतील. यासाठी त्यांनाही जवळपास इतकाच विमा हप्ता पडेल.
नवीन गुंतवणूक श्रीप्रियाच्या नावाने सुरू करायचा त्यांचा मानस होता. या मानसाची पूर्तता करण्यासाठी श्रीप्रियाचे पॅन कार्ड असणे आवश्यक असल्याने जन्म तारखेचा दाखला मिळताच एव्हाना श्रीप्रियाच्या पॅन कार्डासाठी अर्ज दाखल झाला असेल. येत्या एका महिन्यात पॅन क्रमांक मिळणे अपेक्षित आहे.
शैलेश व सुप्रिया यांचे अभिनंदन यासाठी करावेसे वाटते की, सोळा संस्कारापकी एक असलेल्या नामकरण संस्काराच्या जोडीला त्यांना अर्थसंस्कार करणे महत्वाचे वाटले. अनेकदा असे दिसून येते की, म्युच्युअल फंडातील परताव्याचा दर अधिक आहे हे ठाऊक असूनही अनेक पालक एक तर मुलांच्या नावाने बँकेत मुदत ठेवी करतात किंवा स्वत:च्या नावाने मुलांसाठी गुंतवणुका करतात. भावनेला हात घालून पालकांच्या गळ्यात मारलेल्या मुलांच्या नावाने विमा योजनेसाठी मुलाचा पॅन क्रमांक असणे आवश्यक नसते. परंतु हीच गुंतवणूक मुलाच्या नावाने म्युच्युअल फंडात करावयाचे असल्यास पॅन क्रमांक असणे आवश्यक असते. असे असूनही पॅन क्रमांक काढून श्रीप्रियाच्या हिताची असलेली म्युच्युअल फंड गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. आपली मुले व त्यांच्या नावाने केलेली गुंतवणूक हे दोन्ही वाढत असलेली पाहण्यातला आनंद अनुभवल्याशिवाय कळणार नाही. विमा योजना खरेदी करणारे व बँकांच्या मुदत ठेवी करणारे या आनंदापासून मात्र कैक मल दूर आहेत.
लहान मूल घरात असल्याने सर्वप्रथम शैलेश व सुप्रिया यांनी तातडीच्या खर्चाच्या दृष्टीने पन्नास हजाराची रोकड बचत खात्यात जमविणे जरुरीचे आहे. ही बचत जमल्यानंतर शैलेश व सुप्रिया यांनी यांची मासिक बचत दहा हजार होती व या बचतीतून चार एसआयपी सुरू होत्या या एसआयपी एप्रिलपासून बंद करण्याचा सल्ला देण्यात आला. टर्म प्लानचा वार्षकि हप्ता भरण्यासाठी ‘लोकसत्ता कत्रे – म्युच्युअल फंडा’च्या यादीतून एक शॉर्ट टर्म फंड निवडून दोन हजाराची एसआयपी सुरू करावी. शैलेश व सुप्रिया यांचे पीपीएफ खाते नाही. परंतु चार ठिकाणी गुंतवणूक करावी इतकी रोकड सुलभता देखील नाही. याचा विचार करून प्रत्येकी दोन हजाराची एसआयपी शैलेश व सुप्रिया यांनी अनुक्रमे एचडीएफसी प्रुडन्स व एचडीएफसी बॅलेन्स या दोन फंडात सुरूकरावी. श्रीप्रिया हिची प्रत्येकी एक हजाराची एसआयपी एलआयसी नोमुरा चाईल्ड फंडात व ‘लोकसत्ता कत्रे – म्युच्युअल फंडा’च्या यादीतील एका लार्ज कॅप फंडात २० वर्षांसाठी सुरू करावी. एलआयसी नोमुरा चाईल्ड फंड हा बॅलन्स फंड असून किमान ७० टक्के गुंतवणूक समभागसदृश्य असते.
या सर्व एसआयपी दीर्घकाळ सुरू करण्याचा सल्ला दिलेला असला तरी आपल्या गुंतवणुकीचा वार्षकि आढावा घेणे जरूरीचे आहे. एकूण खर्चापकी ३५ हजाराचा गृह कर्जाचा हप्ता दीर्घ काळ सुरू रहाणार असल्याने या नियोजनाच्या निमित्ताने काही गोष्टींचा उहापोह होणे जरूरीचे आहे. या नियोजनात सुचविलेले विमाछत्र आजच्या घडीला जेमतेम पुरेसे आहे. हे खरे असले तरी आजची रोकड सुलभता याहून अधिक विमाछत्र खरेदी करावे इतकी नाही. रोकड सुलभतेची ही मर्यादा लक्षात घेऊन कमीत कमी गुंतवणूक साधनांचा विचार केला आहे. विचार न केलेली गुंतवणूकसाधने अव्वल नाहीत असे नसून या कुटुंबाला हेच नियोजन योग्य ठरेल असे वाटल्याने फाफटपसारा टाळण्याकडे कल आहे.
इतर नोकरदारांप्रमाणे शिक्षकांचे पगार वेगाने वाढत नाहीत. साहजिकच शैलेश व सुप्रिया यांचे कर्ज मुदतीआधी फिटण्याची शक्यता कमीच आहे. भविष्यात काही काळ असा येण्याची शक्यता नाकारता येत नाही ज्या काळात एसआयपी सुरू असलेले फंड उणे परतावा देतील. तरी सुद्धा एसआयपी सुरूच ठेवायच्या आहेत. आज प्राप्तिकरमुक्त उत्पन्नकक्षेच्या आत असल्याने कर नियोजनाचा विचार केलेला नाही. यात कालानुरूप सुधारणा करण्यास ‘लोकसत्ता अर्थ वृत्तान्त’ शैलेश आणि सुप्रिया यांच्या साथीला आहेच.