भारतात सुमारे सव्वा कोटी किराणा स्टोअर्स आहेत. देशातल्या आधुनिक किरकोळ विक्री व्यवस्थेचा ते आधार आहेत. गेल्या काही वर्षांत घडून आलेला विशेष बदल म्हणजे, किरकोळ विक्री व्यवस्थेच्या जुन्या आणि नव्या पद्धतींचा इ-कॉमर्सच्या रुपाने मिलाप झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे. यातून ग्राहकांना चांगली सेवा तर दिली जातेच, पण त्यासोबतच या संपूर्ण व्यवस्थेतील सहभागी लोकांच्या कौशल्यात आणि अर्थार्जनात उल्लेखनीय अशी भर देखील पडते.

एक पूर्णपणे भारतीय इ-कॉमर्स प्रणाली असल्यामुळे फ्लिपकार्ट या व्यवस्थेतील प्रत्येक घटकाच्या भल्यासाठी बांधिल आहे. मग त्यामध्ये विक्रेते, लघु-मध्यम उद्योजक, कलाकार, किराणा स्टोअर्स आणि व्हेंडर्स अशा सगळ्यांचाच समावेश होतो.

फ्लिपकार्टच्या किराणा डिलीव्हरी प्रोग्रामला २०१९मध्ये सुरुवात झाली. हा भारतातल्या सर्वात मोठ्या इ-कॉमर्स डिलीव्हरी प्रोग्राम्सपैकी एक आहे. कारण या उपक्रमामध्ये देशातील तब्बल १ लाखाहून जास्त किराणा सहभागी आहेत. दर महिन्याला देशभरात होणाऱ्या एकूण ६ कोटींहून जास्त डिलीव्हरींपैकी तब्बल ३० टक्के डिलीव्हरी या किराणांच्या माध्यमातून केल्या जातात. या किराणांमध्ये जनरल स्टोअर्स, ब्युटी पार्लर, गोडाऊन अशा अनेक प्रकारच्या स्थानिक पातळीवरच्या व्यवसायांचा समावेश आहे.

आवश्यकतेनुसार डिलीव्हरी होण्याइतपत हे व्यवसाय सक्षम व्हावेत यासाठी फ्लिपकार्ट अनेक प्रकारच्या गोष्टी करत असतं. लाखो डिलीव्हरी अगदी विनासायास व्हाव्यात यासाठी या किराणांना मदत व्हावी म्हणून फ्लिपकार्टची एक विशिष्ट टीम काम करत असते. ही टीम या व्यावसायिकांना त्यासाठी लागणारं ज्ञान, कौशल्य, अनुभव आणि तंत्रज्ञान या बाबतीत मदत करते. गेल्या वर्षी सण-उत्सवाच्या काळात याच विशिष्ट प्रशिक्षण दिलेल्या कुशल किराणा सहकाऱ्यांनी देशभरात तब्बल १ कोटींहून जास्त डिलीव्हरी केल्या आहेत.

या उपक्रमातून वाढणारं कौशल्य आणि सुधारणारं जीवनमान याची अनेक उदाहरणं समोर आली आहेत. त्यांच्या प्रवासाकडे बघून नक्कीच प्रेरणा आणि उत्साह वाढतो.

गोविंद विसपुते हे महाराष्ट्राच्या नाशिकमध्ये चंचल पेट स्टोअर नावाचं दुकान चालवतात. ते गेल्या अडीच वर्षाहून जास्त काळ फ्लिपकार्टच्या किराणा डिलीव्हरी प्रोग्रामशी जोडले गेले आहेत. गेल्या वर्षी लॉकडाऊनच्या काळात आपल्या पाळीव प्राण्यांसाठी ते मालकांना वेगवेगळ्या आवश्यक गोष्टी तर पुरवत होतेच, पण त्यासोबतच फ्लिपकार्टच्या ग्राहकांना त्यांच्या घरापर्यंत वस्तू पोहोचवत होते. गोविंद विसपुते या भागातले एक कुशल आणि सर्वाधिक कार्यरत असणारे किराणा पार्टनर आहेत. ते म्हणतात, यातून मिळणाऱ्या ज्ञानाचा ते त्यांच्या व्यवसायात देखील वापर करतात. “फ्लिपकार्टकडून मिळालेल्या प्रशिक्षणामुळे मला ग्राहकांना व्यवस्थितरीत्या हाताळणं शक्य होतं. याच गोष्टीचा मला माझ्या दुकानात देखील फायदा होतो”, असं ते सांगतात.

govind vispute
गोविंद विसपुते

गोविंद विसपुतेंना फ्लिपकार्टच्या या उपक्रमाविषयी त्यांच्या मित्राकडून समजलं होतं. त्यांनीही पुढे वस्तू पोहोचवण्यासाठी त्यांच्या एका मित्राला सहभागी करून घेतलं. त्यामुळे त्यांच्या मित्राला अर्थार्जनासाठी मदत देखील झाली आणि स्वत: गोविंद विसपुतेंना त्यांच्या व्यवसायाकडे लक्ष देणंही सोपं झालं.

पुण्यातले रणजीत सावंत हे फ्लिपकार्टशी बऱ्याच काळापासून संबंधित असलेले असेच एक किराणा डिलीव्हरी पार्टनर! एक डिलीव्हरी एक्झिक्युटिव्ह म्हणून त्यांनी या प्रवासाला सुरुवात केली. २०१४ ते २०१९ या काळात ते पुण्यातील ग्राहकांना सर्वाधिक समाधानकारक सेवा पुरवणाऱ्या डिलीव्हरी एक्झिक्युटिव्हपैकी एक ठरले. त्यांच्या कामातून ते मनमुराद आनंद लुटत होते. पण त्यांच्यातला नवउद्योजक त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. त्यांना स्वत:चा व्यवसाय सुरू करायचा होता. त्यामुळे त्यांनी २०१९मध्ये नोकरीचा राजीनामा दिला आणि श्लोक एंटरप्राइजेस नावाचं फर्निचर स्टोअर सुरू केलं. पण त्यानंतर देखील किराणा डिलीव्हरी प्रोग्रामच्या माध्यमातून त्यांनी फ्लिपकार्टसोबत आपले संबंध कायम ठेवले.

“फ्लिपकार्टसोबतच्या संबंधांमुळे मला खूप फायदा झाला. याच कारणामुळे इथले किमान डझनभर स्थानिक किराणा स्टोअर्स माझ्यासोबत जोडले गेले. या सगळ्यांना किराणा डिलीव्हरी प्रोग्राममध्ये आपल्या सोयीनुसार काम करण्याची पद्धत आणि त्यातून मिळणारे फायदे याची जाणीव झाल्यामुळेच हे शक्य झालं”, असं रणजीत सांगतात.

गोविंद आणि रणजीत यांच्याप्रमाणेच असे असंख्य लहान दुकानदार आहेत, ज्यांनी त्यांची स्वप्न पूर्ण केली आहेत आणि त्यांचे व्यवसाय वाढवले आहेत. फ्लिपकार्टच्या किराणा प्रोग्राममुळे उपलब्ध झालेल्या संधीचाच हा परिपाक म्हणता येईल. ग्राहकांचं समाधान आणि वेळेवर वस्तू पोहोचण्याच्या दृष्टीने फ्लिपकार्टच्या या उपक्रमात पार्टनर्सच्या त्यांच्या सोयीनुसार कामाचे तास निश्चित करण्याची मुभा दिली आहे.

आपल्या दुकानात थोडीशी मोकळी जागा आणि थोडासा मोकळा वेळ असणारा छोट्यात छोटा दुकानदार देखील फ्लिपकार्टचा किरीणा डिलीव्हरी पार्टनर बनू शकतो. त्यासाठी अर्ज केल्यानंतर या दुकानदाराची पार्श्वभूमी तपासण्याची एक सोपी प्रक्रिया पार पडते. त्यानंतर या उपक्रमाशी जोडले जाण्यासाठीच्या काही सोप्या पायऱ्या पार केल्या, फ्लिपकार्टचे प्रतिनिधी तुमच्या दुकानाला भेट देतात. यामध्ये तुम्ही दिलेल्या माहितीचं व्हेरिफिकेशन आणि तुमच्या पार्श्वभूमीची माहिती घेतली जाते.

यानंतर किराणा डिलीव्हरी पार्टनर्सला चार दिवसांचं प्रशिक्षण दिलं जातं. यात ग्राहक व्यवस्थापन, डिलीव्हरी, रस्ते सुरक्षा अशा काही महत्त्वाच्या बाबींचा समावेश असतो. एकदा का या प्रक्रिया पार पडली, की संबंधित पार्टनर शिपमेंट मिळण्यासाठी, ग्राहकांना डिलीव्हरी देण्यासाठी पात्र ठरतो. यानंतर दुकानदाराने दिलेल्या बँक खात्यामध्ये महिन्यातून दोनदा पेमेंट जमा व्हायला सुरुवात होते.

याशिवाय, त्यांना अतिरिक्त कमाई करण्याची देखील संधी असते, विशेषत: सण-उत्सवांच्या काळात इन्सेन्टिव्हच्या माध्यमातून अतिरिक्त अर्थार्जनाची उत्तम संधी असते.