साधारण ३० वर्षांपूर्वी एम. जी. गांधी आणि बी. जी. गांधी या भावांनी बेण्ट्लर अँड कंपनी या जर्मन कंपनीचे तांत्रिक सहकार्य घेऊन गांधी स्पेशल ००७ टय़ूब्स या कंपनीची स्थापना केली. सुरुवातीला तोटय़ात गेल्यामुळे ही कंपनी आजारी कंपनी म्हणून औद्योगिक पुनर्रचना मंडळ ‘बीआयएफआर’च्या ताब्यात गेली होती. मात्र नंतर नव्या रूपातील जीएसटी या कंपनीने सातत्याने उत्तम कामगिरी करून दाखवली आहे. सध्या कुठलेही कर्ज नसलेली ही कंपनी वाहन उद्योग, एयर कंडिशिनग, रेफ्रीजरेशन तसेच जनरल इंजिनीिरग इ. साठी प्रिसीजन पाइपचा पुरवठा करते. गेली दोन वष्रे मंदीतही चांगली कामगिरी करून दाखवणाऱ्या या कंपनीची येत्या वर्षांतील कामगिरी उत्तम असेल तसेच कंपनीच्या उत्पादनांनाही चांगली मागणी असल्याने जीएसटीचे भवितव्य उज्ज्वल आहे. कंपनीचे डिसेंबर २०१३साठी संपणाऱ्या तिमाहीचे निकाल अजून जाहीर व्हायचे आहेत. मात्र गेल्याच आठवडय़ात कंपनीच्या संचालक मंडळाने अंतरिम लाभांश जाहीर केला आहे. सध्या १३०च्या आसपास असणारा हा स्मॉल कॅप शेअर एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून योग्य वाटतो.
दोन वष्रे मंदीतही चांगली कामगिरी करून दाखवणाऱ्या या कंपनीच्या उत्पादनांना चांगली मागणी असल्याने कंपनीची येत्या वर्षांतील कामगिरी व भवितव्य उज्ज्वल आहे.
काही महिन्यांपूर्वी सुचविलेला अशोक लेलँड सध्या १७ रुपयांवर आला आहे. ज्या गुंतवणूकदारांनी हे शेअर्स खरेदी केले नसतील त्यांना ही एक दीर्घकालीन गुंतवणुकीची उत्तम संधी आहे.