ठरलेले ध्येय गाठायचे यासाठी आर्थिक नियोजन असते. प्रत्येक व्यक्तीनुरूप व व्यक्तीच्या वयोगटाप्रमाणे आर्थिक ध्येये नेमकी सुनिश्चित करावयाची कशी?
आíथक नियोजन हे प्रामुख्याने आíथक ध्येयांवर आधारित असते. मागील लेखात सांगितले तसे प्रत्येक व्यक्तीच्या वयोगटाप्रमाणे वेगवेगळी ध्येये असू शकतात. परंतु ही ध्येये कशी ठरवावीत याची माहिती आजच्या लेखात पाहू.
जर ध्येये निश्चित नसतील, तर आपण नुसताच विचार करत राहतो. जसे की घर घेण्यासाठी डाऊन पेमेंटची व्यवस्था करणे, मुलांच्या उच्च शिक्षणासाठी पशांची जुळवा जुळव करणे, खासगी क्षेत्रात नोकरी असल्यामुळे रिटायरमेंटची सोय करणे. या गोष्टींसाठी करत असलेल्या गुंतवणुकीत महागाईचा दरही लक्षात घ्यायला हवा. त्यातून मिळणारी रक्कम आपल्या भविष्यातील गरजेला पुरेशी असेल का याचा विचार करायला हवा. ढोबळमानाने केली गेलेली गुंतवणूक ही अपेक्षित फळ मिळवून देऊ शकत नाही.

आíथक ध्येये ही नेहमी सुनिश्चित असावी. वरील उद्दिष्टांची सुनिश्चित मांडणी अशी असावी :
१. मला २०२० मध्ये घर घ्यायचे असून, त्यावेळी डाऊन पेमेंटसाठी १५ लाख रुपयांची गरज असेल.
२. माझा मुलगा हा आता ८ वर्षांचा आहे म्हणजे अजून १० वर्षांनी त्याच्या उच्च शिक्षणासाठी आजच्या मानाने २५ लाखांची व्यवस्था करायला हवी.
३. अजून २५ वर्षांनंतर मी रिटायर होईन तेव्हा मासिक ४० हजार इतकी रक्कम मला पेन्शनसारख्या स्वरूपात मिळायला हवी.
वरील प्रकारच्या सुनिश्चित ध्येयांवरून तुमच्या आíथक नियोजकाला (फायनान्शियल प्लॅनर) तुम्हाला अचूक मार्गदर्शन करता येईल. भविष्यातील ध्येयांचा त्याच्या पूर्तीसाठी लागणाऱ्या वेळेवरून त्यात होणारा महागाईचा दरही लक्षात घेतल्यामुळे आजपासून दरमहा किती रक्कम बाजूला ठेवली, तर तुमच्या भविष्यातील गरजांसाठी लागणाऱ्या रकमेची पूर्तता होऊ शकेल, हे अíथक नियोजक तुम्हाला सांगू शकेल. हे करताना नियोजक तुमचे कर नियोजनही समाविष्ट करून घेईल. गुंतवणूक ही कुठल्या प्रकारच्या पर्यायांमध्ये करणे योग्य असेल हेही मार्गदर्शन तो तुम्हाला देऊ शकेल.
योग्य नियोजन करण्यासाठी ध्येयांच्या कालावधीची वर्गवारी केली जाते.
(सोबतची चौकट पाहावी)
व्यवस्थापन गुरू पीटर ड्रकर यांनी म्हटले आहे, ‘भविष्याचे उत्तम भाकीत ते घडविण्यातच आहे’ (The best way to predict the future is to create it ). अशाप्रकारे, पूर्व निश्चित ध्येय ही आपल्या स्वप्नपूर्तीसाठी मदतकारक ठरतात.
कुठलीही आíथक ध्येये गाठण्यासाठी बचतवृद्धी कशी करता येईल याचा आढावा तुमचे वित्तप्रवाह विश्लेषण (कॅश फ्लो अ‍ॅनालिसीस) करून कसे ठरवता येईल ते आपण पुढच्या सदरात पाहू.

योग्य नियोजनासाठी ध्येयांच्या कालावधीची वर्गवारी दीर्घावधी (लाँग टर्म)
(५ वर्षांपेक्षा जास्त)
* स्वमालकीचे घर, मुलांचे उच्च शिक्षण, रिटायरमेंटची सोय वगैरे ध्येये या वर्गात मोडतात. भाववाढीच्या दराचा सर्वात जास्त परिणाम येथे महत्त्वाचा ठरतो. १५ वर्षांपूर्वी मुंबईसारख्या शहरातून सर्वात अव्वल महाविद्यालयात पदव्युत्तर व्यवस्थापनाच्या पदवीची फी ही सरासरी वार्षकि १.७५ लाख रुपये इतकी होती. त्याच कोर्सची फी आज ७.५ लाख रुपये झाली आहे. म्हणजेच शैक्षणिक महागाईचा दर हा सरासरी १०% आहे असे दिसून येते. दीर्घावधीची गुंतवणूक त्यामुळे महागाईच्या दराहून अधिक परतावा देऊ शकेल, अशाच पर्यायांमध्ये असली तरच नफादायक ठरू शकते. जोखीम स्वीकारण्याच्या क्षमतेनुसार थोडय़ा अधिक जोखमीची गुंतवणूक यात केली जाऊ शकते.
नजीकचा कालावधी (इंटरमीडिएट टर्म)
(१ ते ५ वर्ष )
ज्या प्रकारच्या ध्येयांची पूर्तता लगेच करता येऊ शकत नाही, परंतु फार काळही लागण्याची शक्यता नाही. जसे की गाडी विकत घेणे, त्यासाठी करावी लागणारी पशांची जमवाजमव ही साधारण २ ते ३ वर्षांत होऊ शकते. ही गुंतवणूक कमी जोखीम असलेल्या सुरक्षित गुंतवणूक पर्यायांमध्ये केली जाऊ शकते, किंवा त्यातल्या त्यात इक्विटी आणि डेट चे संयोजन असलेल्या पर्यायांमध्ये करता येऊ शकते. यात विशेषत गुंतवणूक कर कार्यक्षम कशी करता येईल याकडे नियोजक भर देतो.
अल्पकालीन (शॉर्ट टर्म)
(१ वर्षांपर्यंत )
यात प्रामुख्याने, किती वेळात किती रकमेची गरज आहे, याचे मोजमाप करून अशा प्रकारची गुंतवणूक ही लिक्विड फंडमध्ये किंवा शॉर्ट फंडात करणे योग्य ठरते, जेणे करून गरजेनुसार ती रक्कम लगेच आपल्या बँक खात्यात जमा होऊ शकेल.
किरण हाके
kiranhake@fingenie.co.in
लेखक आíथक नियोजनातील उाढ उट पात्रताधारक व सेबी मान्यताप्राप्त गुंतवणूक सल्लागार आहेत.