कुटुंबातील अथवा परिचितांपकी एखादा विमा विक्रेता नवीन बालक जन्माला आल्यानंतर अमुक-तमुक विम्याची योजना घेण्याचा आग्रह धरतात. शिक्षणासाठी बचत करणारी ही पालक मंडळी विमा कंपन्यांसाठीची सर्वात मोठी बाजारपेठ असल्याने प्रत्येक विमा कंपनीचे ‘चाईल्ड एज्युकेशन’ या प्रकारात मोडणारे एक तरी उत्पादन असतेच. विमा खरेदीदाराला मात्र लाभ होण्याऐवजी त्याची मोठी ‘किंमत’ मोजावी लागते.

हिमवंतीची सरोवरे। चंद्रोदयी होती काश्मीरे।।
मग सूर्यागमी माघारे। द्रवत्व ये।।
हिमालयावरील जलिबदू रात्री चंद्रोदय होताच गोठून स्फटिक रूप घेतात. परंतु सूर्योदय होताच त्यांना पुन्हा द्रवत्व प्राप्त होते (व ते प्रवाही होतात).. ज्ञानेश्वरीतील या ओवीचा असा अर्थ आहे. ‘सारस्वताचे झाड’ नावाच्या पुस्तकात वि. वा. शिरवाडकरांनी ज्ञानेश्वरांच्या भाषासौंदर्याविषयी सखोल विवेचन करताना या ओवीचा संदर्भ ते देतात. आज हा ज्ञानेश्वरांचा हा दृष्टांत आठवला कारण आíथक नियोजन हे गोठलेल्या जलिबदूप्रमाणे समाजातील मोजक्या अतिश्रीमंत वर्गापुरते सीमित होते. ‘लोकसत्ता-अर्थ वृत्तान्त’ या उपक्रमानंतर ‘सूर्यागमी माघारे द्रवत्व ये’ असे वरील ओवीत म्हटल्याप्रमाणे, समाजातील सर्व वयाच्या व सर्व आíथक स्तरातील वाचकांपर्यंत हा विचार पोहचला आहे, पोहचत आहे. याचा प्रत्ययही नेहमी येत असतो.
एका माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आधुनिक जीवनशैली जगणाऱ्या दाम्पत्याने आपल्या बाळाचे या जगात येण्यापूर्वी आíथक नियोजनाचा आराखडा करून घेतला आहे, तर मागील आठवडय़ातच नवी मुंबईत राहणाऱ्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात नोकरी करत असलेल्या एका वाचकाने जूनच्या शेवटच्या आठवडय़ात जन्मलेल्या व दोन आठवडे वय असताना आपल्या मुलीच्या आíथक नियोजनाच्या मार्गदर्शनासाठी संपर्क केला होता. त्यांना या कन्येचे नामकरण होताच जरूर आíथक नियोजन करून वाचकाच्या भेटीला आणण्यात आनंदच वाटेल. जर महिनाभरात बारसे झाले तर ही अनामिका या सदराची सर्वात लहान लाभार्थी ठरण्याची शक्यता आहे.
आजच्या भागात साडेचार महिन्यांची असलेल्या चिरंजीवी भार्गवीचे आíथक नियोजन जाणून घेऊ. भार्गवीचा जन्म २४ मार्च २०१४ चा आहे. १५ जून रोजी भार्गवीचा नामकरण विधी पार पडला. या नामकरण सोहळ्याला प व मुरुडेश्वर कुटुंबातील चार पिढय़ा हजर होत्या. भार्गवीचे बाबा स्वप्निल हे बडय़ा गृहोपयोगी वस्तू उद्योगात असलेल्या कंपनीत काम करतात, तर आई स्वरदा या एका सहकारी बँकेत काम करतात. प कुटुंबाचे वास्तव्य ठाणे शहरात असते. आई-बाबा मिळून भार्गवीच्या भविष्याची तरतूद म्हणून दरमहा १० हजारांची बचत करू इच्छितात.    
कुटुंबातील बालकाचा नामकरण विधी झाल्यानंतर त्या बाळाला स्वत:ची ओळख प्राप्त होते. भार्गवीचा जन्म ठाणे शहरात झाल्यामुळे ठाणे महानगरपालिकेत जन्माच्या दाखल्याकरिता अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज केल्यानंतर भार्गवीचा जन्म तारखेचा दाखला मिळेल. अनेकदा असे आढळून येते की, लहान मुलांना भेटीदाखल मिळालेली रक्कम साठवली जाते व त्या रकमेची एखादी मुदत ठेव आई किंवा वडिलांच्या नावे केली जाते. हे टाळण्यासाठी जन्म तारखेचा दाखला मिळाल्यावर लगेचच बाळाच्या पॅनकार्डासाठी अर्ज करणे आवश्यक आहे. जेव्हा असा सल्ला वित्तीय नियोजकाकडून दिला जातो, तेव्हा इतक्या लहान मुलाचे पॅन कार्ड मिळते का, असा प्रतिप्रश्न केला जातो. अनेकांना हे वाचून आश्चर्य वाटण्याची शक्यता आहे. परंतु एका धनाढय़ व्यावसायिकाने आपल्या आठ दिवसांच्या मुलीचे पॅन कार्ड काढले असून, ही मुलगी प्राप्तिकराच्या इतिहासात सर्वात लहान पॅनकार्ड धारक ठरली आहे. पॅनकार्ड व जन्म तारखेचा दाखला मिळाल्यानंतर सोयीच्या बँकेत भार्गवीचे बचत खाते उघडावे. (स्वरदा यांच्या बँकेत उघडले तरी चालेल) इतके झाले की गुंतवणूकपूर्व तयारी सफल झाली.
कुटुंबातील अथवा परिचितांपकी एखादा विमा विक्रेता नवीन बालक जन्माला आल्यानंतर अमुक-तमुक विम्याची योजना घेण्याचा आग्रह धरतात. शिक्षणासाठी बचत करणारी विमा कंपन्यांसाठीची सर्वात मोठी बाजारपेठ असल्याने प्रत्येक विमा कंपनीचे ‘चाईल्ड  एज्युकेशन’ या प्रकारात मोडणारे एक तरी उत्पादन असतेच. या योजनेच्या विमाधारकाला वयाच्या सातव्या वर्षांपर्यंत विमाछत्र मिळत नाही. अशा योजनेत वयाच्या सातव्या वर्षांपर्यंत विमाछत्र त्याच्या आई अथवा वडिलांना मिळते व वयाच्या सातव्या वर्षांनंतर मुलाचे अथवा मुलीचे विमाछत्र सुरू होते. या नको असलेल्या विमाछत्राची किंमत विमा खरेदीदाराला मोजावी लागते. परिणामी गुंतवणुकीवरील परताव्याचा दर चार साडेचार टक्क्याहून अधिक असत नाही.
आíथक नियोजनाची सुरुवात सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी अर्थात पीपीएफने करणे कधीही उत्तम. परंतु अनेकांना १५ वष्रे हा काळ मोठा वाटतो. मागील आठवडय़ात एका माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या कट्टेकर याचा फोन होता. त्याला जूनच्या पगारासोबत वार्षकि बोनस म्हणून दोन लाखांची प्राप्ती झाली होती. एक लाख ५० हजार रुपये हे कर वजावटीपश्चात मिळाले होते. प्रत्येक गुंतवणुकीपूर्वी सल्ला घेणाऱ्या या मित्राच्या आíथक व कौटुंबिक जबाबदाऱ्या लक्षात घेऊन आणि अर्थसंकल्पात प्रस्तावित केलेल्या पीपीएफच्या वाढीव मर्यादेचा लाभ घेण्यासाठी पीपीएफमध्ये सर्व रक्कम जमा करावी, असा सल्ला दिला. पण ‘बँकिंग अॅण्ड फायनान्शियल सíव्हसेस’ या विभागात उपाध्यक्ष असलेल्या या मित्राने  ‘एवढे सोडून बाकी काही सांग’ असे उत्तर दिले. वस्तुत: दीर्घ मुदतीची व कोणत्याही वयोगटातील गुंतवणूकदारांच्या आíथक नियोजनाचा भक्कम पाया घालणाऱ्या या गुंतवणूक साधनाने आíथक नियोजनाची सुरुवात करणे कधीही श्रेयस्कर आहे. पीपीएफ हा गुंतवणुकीतील कल्पवृक्ष आहे. म्हणून दरमहा १० हजारांपकी पाच हजार भार्गवीच्या पीपीएफ खात्यात भरणे उत्तम. या पद्धतीने पीपीएफमध्ये ५० व्या महिन्यात दोन लाख २४ हजार, १०० व्या महिन्यात सहा लाख २३ हजार तर २० वर्षांनंतर म्हणजे २४० महिन्यांनंतर २९ लाख ४० हजार रुपये जमा झालेले दिसतील. आकडेमोडीच्या सोयीसाठी सध्याचा व्याजदर गृहीत धरलेला आहे. परंतु प्रत्यक्षात भविष्यात पीपीएफवरील व्याजदर कमी होणार आहेत. तरीसुद्धा दीर्घकालीन बचतीसाठी पीपीएफला पर्याय नाही. म्हणून आजचे शीर्षक (पीपीएफचा) कल्पवृक्ष कन्येसाठी!
दीर्घकालीन परताव्याचा विचार केल्यास समभागसदृश गुंतवणुकीवरील परतावा नेहमीच अव्वल असतो. स्वप्निल व स्वरदा यांनी प्रत्यक्ष समभाग अथवा इक्विटी म्युचल फंड म्हणजे समभागात गुंतवणूक करणाऱ्या म्युचल फंडांचा या आधी विचार केलेला नाही. गुंतवणुकीत समभागसदृश गुंतवणुकीचे प्रमाण काय असावे याचे उत्तर शंभर वजा वय असे या प्रश्नाचे पारंपरिक उत्तर आहे. म्हणजे भार्गवीसाठीची शंभर टक्के गुंतवणूक समभागसदृश असायला हवी, परंतु स्वप्निल व स्वरदा यांनी समभागसदृश गुंतवणूक या आधी विचार केला नसल्यामुळे त्यांना पन्नास टक्के स्थिर उत्पन्न देणारी गुंतवणूक (पीपीएफ) व पन्नास टक्के समभागसदृश म्हणजे इक्विटी म्युचल फंड सुचविण्यात येत आहेत. आजपासून २० वर्षांनी इंडेक्स किती असेल याचा विचार करण्यापेक्षा या कालावधीत तीन आíथक आवर्तने नक्की होतील. एक आवर्तन ३५ ते ४० टक्के परतावा देते. म्हणून भार्गवीच्या भविष्यासाठी करावयाच्या तरतुदीपकी ५० टक्के गुंतवणूक समभाग किंवा समभागसदृश करावी. आíथक नियोजनाची सुरुवात करण्यास इतके पुरेसे आहे. दोन वर्षांनी या गुंतवणुकीचा आढावा घ्यायला ‘लोकसत्ता- अर्थ वृत्तान्त’ सोबतीला आहेच.