श्रीकांत कुवळेकर ksrikant10@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मागील सहा-आठ महिने कृषिमाल बाजारपेठेमध्ये सोयाबीनने धमाल उडवून दिलेली आपण पाहिली आहे. साधारणपणे मागील काही वर्षांत ३,०००-४,००० रुपये क्विंटलने विकले जाणारे सोयाबीन मागील सहा-आठ महिन्यांमध्ये आलेल्या अभूतपूर्व तेजीमध्ये १०,००० रुपयांपलीकडे गेल्यामुळे सातत्याने चांगल्या वाईट चर्चेत राहिले आहे. सोयाबीन १०,००० रुपयांच्या जादूई भावापुढे, तर याच काळात इतर कमॉडिटीजमधील तेजी झाकोळली गेली होती. परंतु नवीन हंगामाचे सोयाबीन बाजारात आल्यामुळे या किमती तुलनेने चांगल्याच कमी झाल्या असल्यामुळे सोयाबीन आता थोडे मागे पडू लागले आहे. आणि त्याची जागा आता कापसाने घेतली आहे. मागील दोन-तीन आठवडय़ांमध्ये तर कापसाची किंमत अमेरिकेमध्ये ३० टक्क्यांहून अधिक वाढली आहे. त्याचा परिणाम येथील बाजारपेठांवर देखील झाला आहे. आणि वायदेबाजारामध्ये मागील शुक्रवारी कापूस स्वप्नवत वाटणाऱ्या किमतीला म्हणजे जवळपास ८,५०० रुपये क्विंटल भावाने विकला गेला आहे. केंद्र सरकारने आताच सुरू झालेल्या २०२१-२२ या कापूस पणन वर्षांसाठी हमी भाव वाढवून तो ६,०२५ रुपये प्रति क्विंटल केला आहे. नवीन हंगामातील कापूस खऱ्या अर्थाने बाजारात यायला अजून तीन-चार आठवडय़ांचा अवकाश आहे. हंगामाच्या सुरुवातीलाच हमीभावापेक्षा ४० टक्के अधिक भाव आज वायदे बाजारात आहे. एमसीएक्स या कापूस गाठींचा वायदा उपलब्ध करून देणाऱ्या कमॉडिटी एक्सचेंजवर अलीकडे कापूस प्रतिगाठ ३१,००० रुपयांचा विक्रम करून आता किंचित खाली बंद झाला आहे. कापसातील विक्रमी भाववाढ ही जर दुर्मीळ संधी मानली तर या संधीचे सोने करून कसे घेता येईल याबद्दल आपण या लेखात माहिती घेणार आहोत.

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian farming market indian cotton growers indian agriculture market zws
First published on: 18-10-2021 at 01:10 IST