भारताची आर्थिक कामगिरी चमकदार – नाणेनिधी

जागतिक अर्थव्यवस्थेत भारत हा चमकदार कामगिरी असलेल्या काही मोजक्या देशांपकी एक आहे

जागतिक अर्थव्यवस्थेत भारत हा चमकदार कामगिरी असलेल्या काही मोजक्या देशांपकी एक आहे, असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हटले आहे. चीनमधील आíथक पेचप्रसंगानंतर जागतिक बाजारपेठेवर जो परिणाम झाला त्यानंतर नाणेनिधीने हे निरीक्षण नोंदवले आहे.

जी-२० देशांचे अर्थमंत्री व मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नरांच्या बठकीत नाणेनिधीच्या प्रमुख ख्रिस्तीन लॅगार्ड यांनी भारताच्या कामगिरीची प्रशंसा केली आहे. प्रगत व उदयोन्मुख देशांच्या अर्थमंत्र्यांच्या बठकीत त्यांनी असे सांगितले की, प्रगत जगातील अनेक ठिकाणी काही आíथक समस्या आहेत, चीनमध्येही काही समस्या आहेत त्या फार मोठय़ा नाहीत सध्या तरी शेअर बाजाराशीच निगडित आहेत.
उदयोन्मुख देशात ज्यांची आíथक प्रगती चांगली आहे अशा देशांमध्ये भारताचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल, असे श्रीमती लॅगार्ड यांनी सांगितले. रिझर्व बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी या बठकीत चीनमधील काही समस्यांमुळे चिंताजनक परिस्थिती आहे. पण अर्थगती मंदावण्याच्या भीतीने तेथे हे प्रश्न निर्माण झाले आहेत. जी-२० देशांची ही बठक रात्री उशिरापर्यंत लांबली होती. अमेरिका, दक्षिण आस्ट्रेलिया, चीन व अमेरिका या देशातील आíथक धोरणकत्रे यावेळी उपस्थित होते.
चीनने यावेळी जी-२० देशांना असे आश्वासन दिले की, आमची अर्थव्यवस्था कोसळणार नाही फक्त मंद गतीने प्रगती करीत राहील. परिषदेच्या मसुद्यात चीन व अमेरिका यांचा उल्लेख केलेला नाही. भारताने गुरुवारी असे म्हटले होते की, अनेक उदयोन्मुख अर्थव्यवस्थांच्या चलनांवर परिणाम झाला, त्यांचे विनिमय दर घसरले आहेत कारण काही प्रमुख देशांच्या चलनांचे अवमूल्यन करण्यात आले. जागतिक मागणी कमी असताना चलनांचे अवमूल्यन कमी करणे म्हणजे जागतिक अर्थव्यवस्थेच्या स्थिरतेला धोका निर्माण करण्यासारखे आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Indias economic growth