|| वसंत कुळकर्णी

(ठोस शास्त्रीय निकषांनुरूप, गुंतवणूक भांडाराचे (पोर्टफोलियो) मूल्यमापन करून, सुधारणेच्या अपेक्षेने दुरुस्ती सुचविणारे पाक्षिक सदर)

The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका
china people punished for not paying debt
जीवनावश्यक वस्तू खरेदी करणेही कठीण; कर्ज फेडू न शकणाऱ्यांना चीन कशी शिक्षा करत आहे?
Surat Diamond Bourse
सूरत डायमंड बोर्सकडे हिरे व्यापाऱ्यांची पाठ; अनेकजण पुन्हा मुंबईत परतले, नेमकं कारण काय? जाणून घ्या
Why the frequent change of candidates from the Vanchit Bahujan Alliance
‘वंचित’कडून वारंवार उमेदवार बदल का?

या सदरातील पहिल्या पोर्टफोलिओच्या पुनरीक्षणासाठी ईशा यांचा पोर्टफोलिओ निवडला आहे. या पोर्टफोलिओतील बहुसंख्य फंडांची निवड ईशा यांची असून त्या बँक कर्मचारी आहेत. मागील चार वर्षांपासून ‘एसआयपी’च्या माध्यमातून त्या गुंतवणूक करीत आहेत. त्यांच्या एकूण गुंतवणुकीच्या ८८ टक्के गुंतवणूक ‘एसआयपी’च्या माध्यमातून तर १२ टक्के गुंतवणूक एकरकमी केली गेली आहे. त्यांच्याकडे २.८७ लाख रुपयांचा दीर्घकालीन भांडवली लाभ उपलब्ध आहे. दर वर्षी एक लाख रुपयांचा दीर्घकालीन भांडवली लाभ करमुक्त असल्याने त्यांनी या सवलतीचा लाभ घेणे गरजेचे आहे. त्यांच्या पोर्टफोलिओतील १५ फंडांपैकी, एबीएसएल फ्रंटलाइन इक्विटी, एचडीएफसी टॉप १००, सुंदरम मिडकॅप आणि एसबीआय मॅग्नम मिडकॅप या फंडाची कामगिरी समाधानकारक नाही. सोबतच्या ‘रिस्क रिवॉर्ड स्कॅटरप्लॉट’नुसार, हे फंड अतिरिक्त जोखीम स्वीकारणारे आणि कमी परतावा देणारे (द्वितीय चतुष्कोनात) फंड आहेत. या फंडातून बाहेर पडून उपलब्ध भांडवली लाभातून करमुक्त १ लाख रुपयांपर्यंतचा नफा होईल, यासाठी ३.४६ लाखांच्या युनिट्सची विक्री त्यांना करावी लागेल. उपलब्ध होणारी रोकड ही सध्या गुंतवणूक असलेल्या कॅनरा रोबेको फोकस्ड इक्विटी, कॅनरा रोबेको फ्लेक्झीकॅप आणि निप्पॉन इंडिया फ्लेक्झी कॅप या फंडात त्यांनी सम प्रमाणात गुंतवावी.

फंड निवड करताना आपल्या वित्तीय ध्येयाशी सुसंगत फंड निवडणे गरजेचे असते. बहुसंख्य फंडांची निवड त्यांची असून, त्यांच्या बँकेने ‘एसआयपी’ विक्रीचे लक्ष्य पूर्ण करण्याकरिता केलेली आहे. त्यांनी ‘लोकसत्ता शिफारसप्राप्त’ फंडाची निवड केली असती, तर सध्याच्या २० टक्के नफ्यावरून २३.४८ टक्के नफा मिळविणे शक्य झाले असते (संदर्भ: ‘मॉर्निगस्टार हायपोथिसिस’). दुसरी मोठी चूक म्हणजे म्युच्युअल फंड गुंतवणुकीत रोखे फंडांना स्थान न देणे. जी चूक बहुसंख्य बँक कर्मचारी करतात. मुदत ठेव (एफडी) आणि आवर्ती ठेव (आरडी) यांच्यापेक्षा रोखे गुंतवणूक करणाऱ्या फंडातील गुंतवणूक करकार्यक्षम असते. सेवानिवृत्तीस पाच वर्षे शिल्लक असल्याने किमान ५० टक्के गुंतवणूक रोखे गुंतवणूक करणाऱ्या फंडात करावी.

म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजार जोखमींच्या अधीन असते. गुंतवणूक करण्यापूर्वी फंडाचे माहितीपत्रक कृपया सखोल अभ्यासा.

गुंतवणूक असलेले फंड

१. एबीएसएल फ्रंट लाइन इक्विटी

२. कॅनरा रोबेको फ्लेक्झीकॅप

३. कॅनरा रोबेको फोकस्ड इक्विटी

४. एचडीएफसी टॉप १००

५. आयडीएफसी मल्टीकॅप

६ आयडीएफसी यूएस इक्विटी

७. एल अँड टी फोकस्ड इक्विटी

८. निप्पॉन इंडिया मल्टीकॅप

९. एसबीआय मॅग्नम मिडकॅप

१०. सुंदरम मिडकॅप

११. टाटा रिटायरमेंट सेव्हिंग्ज

१२. यूटीआय फ्लेक्झीकॅप

  पोर्टफोलिओ गुंतवणूक (लाख रु.)     ८.०६

  पोर्टफोलिओ बाजार मूल्य (लाख रु.) ११.२५

  गुंतवणूक असलेल्या फंडांची संख्या                      १५

  पोर्टफोलिओवरील वार्षिक परतावा (%)      २०.२२

   जोखीमांक        समतोल

‘एसआयपी’चा तपशील

कॅनरा रोबेको फ्लेक्झीकॅप    २,०००

कॅनरा रोबेको फोकस्ड इक्विटी       १०,०००

यूटीआय फ्लेक्सीकॅप          २,०००

टाटा रिटायरमेंट प्रोग्रेसिव्ह प्लान      २५.०००

एचडीएफसी एचडीएफसी   २,०००

टॉप १००

shreeyachebaba@gmail.com