समीर नेसरीकर

मागील आठवडय़ात आबालवृद्धांचे लाडके ‘व्हॉट्सअ‍ॅप’ दोन तास बंद होते. ‘जीव कासावीस होणे’ या वाक्यप्रकारची खूप दिवसांनी सर्वानाच अनुभूती झाली. व्हॉट्सअ‍ॅपची मालकी ‘मेटा’ अर्थात फेसबुककडे आहे. ‘अ‍ॅपल’ने आपले उत्पादन भारतातून सुरू केले आहे. तरुण वर्गाचा अ‍ॅपलकडे ओढा आहेच. ‘गूगल’ शिवाय आपले काम होऊच शकणार नाही, इतके ते आपल्या जीवनाचा एक भाग झालंय. ‘अ‍ॅमेझॉन’ हे ऑनलाइन शॉपिंगसाठी आणि ‘नेटफ्लिक्स’ हे घरबसल्या मनोरंजनासाठी आपण वापरतोय. ‘मायक्रोसॉफ्ट’च्या ‘ऑफिस’ने अजूनही आपला ठसा कायम ठेवलाय. मित्रांसोबत क्रिकेटची मॅच बघताना ‘पेप्सी’ प्यायले जातेच, तो आपल्या सवयीचा भाग झालाय.

With restrictions on the export of non basmati rice the demand from the domestic market also declined Pune news
आंबेमोहर, कोलमचे दर घसरले; जाणून घ्या, ग्राहकांना काय फायदा होणार ?
Congress accuses the government that more and more families are in debt
अर्थव्यवस्थेची परिस्थिती बिकट! अधिकाधिक कुटुंबे कर्जाच्या विळख्यात सापडल्यचा काँग्रेसचा सरकारवर आरोप
chip manufacturing infrastructure
पोस्टाच्या तिकिटाएवढी दिसणारी सेमीकंडक्टर चिप नक्की कशी तयार होते?
The Food and Agriculture Organization of the United Nations has projected an increase in wheat production worldwide including in India
भारतात यंदा उच्चांकी गहू उत्पादन? काय कारण? जगात काय स्थिती?

ही आपल्या आसपासची, दररोजच्या आयुष्याचा भाग झालेली उदाहरणे. या आपल्या जिवाभावाच्या झालेल्या सर्व आंतरराष्ट्रीय पातळीवरील महाकाय कंपन्या आहेत. जगभरातून या कंपन्यांना खूप मोठी फॅन फॉलोइंग आहे. जागतिक पातळीवर यांची ‘मक्तेदारी’ आहे. आपण अशा प्रकारच्या जागतिक कंपन्यांत, भारतातील म्युच्युअल फंडांच्या माध्यमातून गुंतवणूक कशी करू शकतो ते आज पाहूया. म्युच्युअल फंडांमार्फत भारताच्या सीमांबाहेरही गुंतवणूक शक्य आहे, कसे ते पाहूया.

आपण जर देश / प्रदेशानुसार पाहिले तर भारतातील समभागसंलग्न म्युच्युअल फंडांनी ‘फंड ऑफ फंड्स’, ‘फिडर फंड’, ‘ईटीएफ’ अशा मार्गानी अमेरिका, युरोप, जपान, चीन, आशियाई देशांतील कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. आंतरराष्ट्रीय गुंतवणूक करण्याचे फायदे असतात.  एक तर परदेशी बाजारपेठेतील गुंतवणुकीचा भारतीय बाजाराशी असणारा सहसंबंध (को-रिलेशन) कमी असतो. तसेच भारतीयांना अशा अग्रगण्य कंपन्यांत गुंतवणूक करायची संधी मिळते की, ज्या ‘ग्लोबल लीडर्स’ आहेत आणि अशा प्रकारचा व्यवसाय भारतात उपलब्ध नाही. तसेच भारतीय रुपया अमेरिकन डॉलरसमोर वर्षांनुवर्षे कमकुवत राहण्याचा फायदा भारतीय गुंतवणूकदारांना मिळू शकतो.

एकाच देशांतील अर्थव्यवस्थेत गुंतवणूक करायची असल्यास असे दिसते की ‘त्या’ देशाची जोखीम (उदाहरणार्थ चीन) आपल्या गुंतवणुकीस लागू होते. जपान, ब्राझील, चीन येथील कंपन्यांत गुंतविणारे फंडदेखील आहेत. आपला जर देशांच्या अर्थव्यवस्थेचा अभ्यास असेल तर आपण जोखीम लक्षात घेऊन तशी एकदेशीय गुंतवणूक करू शकता. अन्यथा आपण जागतिक बाजारपेठेतील महत्त्वाच्या अशा ‘माहिती-तंत्रज्ञान’ क्षेत्रात गुंतवणूक करणे योग्य ठरेल. अर्थातच आपण अमेरिकेबद्दल बोलतोय आणि तेथील ‘नॅसडॅक १००’ हा निर्देशांक (बाजार भांडवलाप्रमाणे शंभर सर्वात मोठय़ा  बिगरवित्त कंपन्या) अशाच नावीन्यपूर्ण कंपन्यांचे प्रतिनिधित्व करतो.

नजीकच्या काळातील ‘नॅसडॅक १००’ची (एका वर्षांत उणे २४ टक्के परतावा), निफ्टी ५० सापेक्ष कामगिरी समाधानकारक नसली तरी दीर्घ कालावधीतील या निर्देशांकाचा उत्कृष्ट परतावा (मागील १० वर्षांमध्ये, वार्षिक १७ टक्के) नजरअंदाज करून चालणार नाही. हा परतावा भारतीय रुपयांतील आहे. आदित्य बिर्ला, कोटक आदी म्युच्युअल फंड व्यवस्थापन कंपन्यांचे ‘नॅसडॅक १००’वर आधारित फंड गुंतवणुकीसाठी उपलब्ध आहेत. 

रिझव्‍‌र्ह बँकेच्या भारताबाहेरील गुंतवणुकीवरील मर्यादेमुळे काही फंड नवीन परदेशी गुंतवणूक करू शकत नाहीत. हा लेख लिहिताना आलेल्या बातमीप्रमाणे अमेरिकेच्या  अर्थव्यवस्थेने जुलै ते सप्टेंबर या कालावधीत अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी करून वार्षिक २.६ टक्के दराने विकास साधला आहे. असे जरी असले तरी वाढलेली महागाई आणि उच्च व्याजदर यामुळे अमेरिकी अर्थव्यवस्था कशी मार्गक्रमण करेल हे पाहावे लागेल. विकासदर वाढल्याने व्याजदर वाढ अधिक आक्रमक नसावी असे आपण मानू शकतो. सद्य:स्थितीत ‘नॅसडॅक १००’मध्ये आपण दीर्घकालीन गुंतवणुकीच्या दृष्टीने विचार करू शकता. गुंतवणुकीमध्ये वैविध्य असलेले केव्हाही चांगले, त्याचे प्रमाण किती ठेवायचे याची चर्चा पोर्टफोलिओचे पुनरावलोकन करताना आपल्या गुंतवणूक सल्लागाराबरोबर करावी. भारतीय भांडवल बाजाराची वेस ओलांडताना ते आवश्यकच ठरेल.

(लेखक मुंबईस्थित गुंतवणूकविषयक अभ्यासक)

sameernesarikar@gmail.com