vittbhanकेंद्र सरकारने ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ आंदोलन चालू केले. त्या अंतर्गत मुलीच्या शिक्षणाची सोय व तिच्या लग्नासाठी तरतूद करण्यासाठी, पालकांना उपयुक्त योजना सुरू केली. मुलीच्या अठराव्या वर्षी ५०% रक्कम तिच्या शिक्षणासाठी काढता येते व बाकी रक्कम २१ वर्षांनंतर किंवा लग्नाच्या वेळेस (१८ ते २१ वर्षांदरम्यान) काढता येते.
मुलीच्या दहाव्या वर्षांपर्यंत खाते उघडता येते फक्त दोन मुलीसाठीच खाते उघडता येते. एका मुलीसाठी कोठेही फक्त एकच खाते उघडता येते. दुसऱ्या जुळ्या मुलींसाठी किंवा तिळ्यांसाठी नियमांत शिथिलता आहे. मुलगी दहा वर्षांची होईपर्यंत खाते उघडता येते. २०१५-१६ वर्षांसाठी हे खाते मुलगी ११ वर्षांची असेल तरी उघडता येईल. विद्यमान २०१५-१६ वर्षांसाठी या खात्यावर व्याज ९.२% आहे. दरवर्षी व्याजाचा दर इतर व्याजदरांप्रमाणे जाहीर केला जाईल. व्याज चक्रवाढ पद्धतीने दिले जाते. पोस्ट ऑफिस किंवा सरकारी बँकाच्या कोणत्याही शाखेत हे खाते उघडता येते.
एका आíथक वर्षांत किमान गुंतवणूक रू. १,०००/- व कमाल गुंतवणूक रू. १,५०,०००/- पर्यंत करता येते. मात्र दरवर्षी किमान हजार रुपये न भरल्यास ५० रूपये दंड आकारला जातो. पालकांना ८० सी कलमाअंतर्गत गुंतवलेल्या रकमेवर प्राप्तिकरांतून वजावट मिळते. योजनेतून व्याज लाभ करमुक्त आहे. साधारणपणे मुलांचे उत्पन्न वडिलांच्या उत्पन्नात मिळवून त्यावर वडिलांना प्राप्तिकर भरावा लागतो. परंतु या योजनेत गुंतवलेली रक्कम व व्याज वयाची १८ वष्रे पूर्ण झाल्याखेरीज मुलीला मिळणार नाही. त्यामुळे मुलगी सज्ञान झाल्यावर एकत्रित उत्पन्नावर कर आकारण्याचा प्रश्न उद्भवत नाही.
पालकांनी मुलांच्या नावावर सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) खाते उघडल्यास पालक व पाल्य दोघांच्या खात्यांत मिळून कमाल रू. १,५०,०००/- गुंतवणूक करता येते. या उलट पालक आपल्या पीपीएफ खात्यात रू. १,५०,०००/- गुंतवून सुकन्या समृद्धी खात्यात जास्तीचे रु. १,५०,०००/- गुंतवू शकतात. या खात्यास पीपीएफपेक्षा व्याज थोडे (०.५%) जास्त आहे. मुलगी दहाव्या वर्षांनंतर खाते स्वत: हाताळू शकते. एकवीस वष्रे पूर्ण झाल्यावर तिने मुद्दल न काढण्याचा विचार केल्यास, शिल्लक रकमेवर व्याज मिळत रहाते. खात्यात रक्कम वयाच्या १४ वर्षांपर्यंत भरता येते. नंतर फक्त व्याज जमा होत रहाते.
av-07
ज्यांना गुंतवणुकीवर कोणतीही जोखीम घ्यावयाची नाही अशासाठी ही योजना खूप चांगली आहे. परंतु पूर्वी म्हटल्याप्रमाणे मुले १७ व्या वर्षी बारावी उत्तीर्ण झाल्यावर त्यांना उच्च शिक्षणासाठी मोठी रक्कम गरजेची असते. ती एक वर्ष उशिरा मिळते. पीपीएफ खात्यावर तिसऱ्या वर्षांनंतर कर्ज मिळते; तशी सोय मुलीच्या १६व्या वर्षांनंतर या खात्यावर उपलब्ध झाल्यास सोयीचे होईल. यासाठी कर्जाचा धनादेश शिक्षण संस्थेच्या नावाने काढण्याची व्यवस्था केल्यास गरप्रकार होण्याची शक्यता खूप कमी होईल आणि ही योजना खरोखरच सर्वसामान्यांसाठी उपयुक्त होईल.
av-08साधम्र्यामुळे या योजनेची तुलना पीपीएफ  खात्याशी केली जाते. त्यातील समानता, भेद खालील तक्त्यात दाखवले आहेत-
या योजनेसाठी कोणीही एजंट/ विक्री प्रतिनिधी नाही, म्हणून कोणीही योग्य माहिती देत नाही. दापोली येथील श्री. मनोज भिडे यांनी हे खाते उघडण्यासाठी अल्पबचत एजंटाकडे चौकशी केली. तुमची मुलगी सध्या आठ वर्षांची आहे. एकवीस वर्ष पसे भरायचे म्हणून हे खाते उघडण्यात विशेष फायदा नाही, असे त्यांना सुचविण्यात आले. या योजनेची सविस्तर माहिती http://www.rissindia.gov.in या संकेतस्थळावर मिळेल. भिडेसाहेब आपण पोस्टात किंवा स्टेट बँकेत जाऊन चौकशी करा आणि खाते नक्की उघडा.
या योजनेत एजंटास दलाली मिळत नाही म्हणून वरीलप्रमाणे दिशाभूल केली जाते आणि पर्यायी योजना म्हणून पाच वर्षांचे आवर्ती जमा खाते उघडून त्यातील रक्कम पाच वर्षांनी राष्ट्रीय बचत पत्रांमध्ये पुन्हा पाच वर्षांसाठी गुंतवण्याचे सुचवले जाते. अशा गुंतवणुकीवर सध्या व्याज ८.५% आहे, त्या उलट सुकन्या समृद्धी खात्यावर ९.२% व्याज आहे.
ही योजना सर्वसामान्य जनतेसाठी असली तरी, श्रीमंत लोक याचा उपयोग संपत्ती मुलीच्या नावावर हस्तांतरीत करण्यासाठी करतील. दरवर्षी रु. १,५०,०००/- या खात्यात भरून एकविसाव्या वर्षी मुलीला करोडपती बनवण्याची ही योजना आहे.
सुरुवातीस पीपीएफ ही योजना देखील फक्त व्यावसायिकांसाठी होती. (त्यांच्यासाठी प्रॉव्हिडंड फंड नसल्याने) नंतर ही योजना सर्वासाठी खुली करण्यात आली. तसेच सुकन्या समृद्धी खाते हे आज फक्त मुलींसाठी असले तरी अजून काही वर्षांनी ते मुलांसाठी उघडण्याची कदाचित संधी मिळेल.
पुढील लेखात लहान मुलांसाठीच्या १५%पेक्षा जास्त व्याज देणाऱ्या योजना पाहू.     (क्रमश:)
sebiregisteredadvisor@gmail.com
(लेखक सेबीकडे नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार)

Slum Improvement Board, contract,
मुंबई : झोपडपट्टी सुधार मंडळातील ‘कंत्राटा’साठी गोळीबार!
Simran Thorat first woman merchant navy officer
शिक्षणासाठी पालकांनी जमीन विकली, पुण्याच्या सिमरन थोरातने मर्चंट नेव्ही क्षेत्रात मिळला ‘हा’ बहुमान
Deputy Chief Minister Devendra Fadnavis challenges Uddhav Thackeray to show the good work he has done for Mumbai
मुंबईसाठी केलेले चांगले काम दाखवा; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्धव ठाकरे यांना आव्हान
Mumbai new road
मुंबई : रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणाच्या नवीन कामांसाठी १५ कंत्राटदारांचा प्रतिसाद