scorecardresearch

जाहल्या काही चुका.. : आता मागील सर्व वैभव तुझे स्थानच्युता ओसरे!

पराग पारिख फ्लेक्सी बाजाराच्या अस्थिरतेवर मात करण्यासाठी डेरिव्हेटिव्हचा वापर करतात.

राजीव ठक्कर ( निधी व्यवस्थापक)

वसंत कुळकर्णी

कोणत्याही भारतीय व्यक्ती अथवा संस्थेने परदेशात गुंतवणूक करण्याची कमाल मर्यादा रिझव्‍‌र्ह बँकेने निश्चित केली आहे. रिझव्‍‌र्ह बँकेने निश्चित केलेली ही मर्यादा वार्षिक ७ अब्ज डॉलर असून, या मर्यादेच्या ९५ टक्के इतकी गुंतवणूक डिसेंबपर्यंत झाल्याने, ‘सेबी’ने तसे परिपत्रक काढून भारतात नोंदणी झालेल्या आणि परदेशात गुंतवणूक करणाऱ्या फंडांना त्यांच्या परदेशातील गुंतवणुकीवर बंदी घातली. परिणामी जानेवारी महिन्यापासून म्युच्युअल फंडांच्या आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीवर निर्बंध घातले गेल्याने अनेक फंडांनी नवी गुंतवणूक स्वीकारणे बंद केले.

पराग पारिख फ्लेक्सी कॅप या फंडाला त्याच्या एकूण मालमत्तेच्या ६५ टक्के गुंतवणूक भारतीय कंपन्यांच्या समभागांत, तर ३५ टक्के परदेशात करण्यास मान्यता आहे. पराग पारिख फ्लेक्सी कॅप या फंडाने उपरोक्त ‘सेबी’ परिपत्रकाला अनुसरून नवीन एकरकमी गुंतवणूक आणि किंवा नवीन ‘एसआयपी’ नोंदणी (आधी ज्यांच्या ‘एसआयपी’ सुरू होत्या) स्वीकारणेदेखील बंद केले होते. आता पराग पारिख फ्लेक्सी कॅपने गुंतवणूक रणनीतीत बदल करत हे निर्बंध सैल केले आहेत. फंडाने १५ मार्चपासून नवीन एकरकमी गुंतवणूक आणि किंवा नवीन ‘एसआयपी’ नोंदणीवरील बंदी उठवली आहे. हे करीत असताना ६५:३५ गुणोत्तर स्थगित केले असून नव्याने येणारी सर्व गुंतवणूक भारतीय बाजारात केली जाणार असल्याचे नमूद केले आहे. अनेक वाचकांकडून विचारणा झाल्याने या स्तंभातून या बदलाची दाखल घेणे क्रमप्राप्त ठरते.

पराग पारिख फ्लेक्सी कॅपच्या बदलत्या रणनीतीचा नेमका अर्थ काय, हा प्रश्न काही वाचकांनी विचारला आहे. पराग पारिख फ्लेक्सी कॅप फंडाच्या पोर्टफोलिओमध्ये अल्फाबेट, मेटा प्लॅटफॉम्र्स, मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन, आणि अ‍ॅमेझॉनसारख्या मेगाकॅप कंपन्या आहेत. एकूण परकीय गुंतवणुकीच्या ५ टक्क्यांपेक्षा अधिक गुंतवणूक त्या बाळगून असून ही गुंतवणूक मागील तीन वर्षांपेक्षा अधिक काळापासून आहे. केवळ परकीय चलनात गुंतवणूक करणारा फंड म्हणून नव्हे कामगिरीच्या आघाडीवरही या फंडाने उत्कृष्टता सिद्ध केली आहे.

पराग पारिख फ्लेक्सी कॅप फंडाची एक वर्ष कालावधीची चलत सरासरी तपासली असता, फंडांची कामगिरी ९३ टक्के वेळा फंड गट सरासरीपेक्षा किमान ७ टक्के फरकापेक्षा अधिक आहे. पोर्टफोलिओचा ६५ टक्के भाग असलेल्या देशांतर्गत कंपन्यांत मजबूत ताळेबंद असलेल्या आणि फंड कामगिरीत मोलाचा वाटा राखून आहेत. ज्यामध्ये इंडिया एनर्जी एक्स्चेंज, सीडीएसएल, बजाज होिल्डग्स, सिप्ला, सन फार्मा आणि एचसीएल टेक्नॉलॉजीज यांसारख्या कंपन्यांचा समावेश आहे. तर फंडाकडे सुझुकी कॉर्पोरेशन, हिरो मोटोकॉर्पसारख्या गुंतवणुकीत मोठा हिस्सा असूनही या कंपन्यांचा फंड कामगिरीवर विपरीत परिणाम झालेला नाही.  

त्यामुळे पराग पारिख फ्लेक्सी कॅप फंडाच्या कामगिरीचे परदेशी गुंतवणुकीशिवायदेखील चांगले प्रदर्शन अपेक्षित आहे. पराग पारिख फ्लेक्सी कॅप फंडाच्या परदेशातील गुंतवणुकीचे प्रमाण फेब्रुवारीअखेरीस २९ टक्के होते. हे प्रमाण परदेशातील गुंतवणुकीवर बंदी लागू असलेल्या काही काळासाठी हळूहळू कमी होऊ शकते. फंडातील गुंतवणूक थांबविणे हा लाभाचा निर्णय असू शकणार नाही. दुसरी गोष्ट अशी की, परदेशी गुंतवणुकीवरील बंदी अनिश्चित काळासाठी असण्याची शक्यता नाही. रिझव्‍‌र्ह बँक आणि ‘सेबी’ बदलत्या परिस्थितीचा अभ्यास करून नवीन मर्यादा लागू करेपर्यंत आणखी काही महिने परकीय गुंतवणुकीवरील बंदी असू शकेल.

पराग पारिख फ्लेक्सी बाजाराच्या अस्थिरतेवर मात करण्यासाठी डेरिव्हेटिव्हचा वापर करतात. उपलब्ध माहितीनुसार साधारणपणे १५ ते २२ टक्के ‘हेज’ करणाऱ्या व्यवस्थापकांनी २०२०च्या सुरुवातीस घसरणीनंतर ‘हेजिंग’ शून्यावर आणले. त्या पश्चात बाजारामध्ये तेजी आली. डेरिव्हेटिव्हद्वारे बाजारातील अस्थिरतेचा सामना करण्याची फंडाची क्षमता ही दोन्ही उतार-चढाव आणि एकूणच अस्थिरता नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.

बाजारातील अस्थिरतेचा सामना करण्यास फंडाला परदेशातील गुंतवणुकीचा फायदा होत होता. तुमच्या दीर्घकालीन पोर्टफोलिओमध्ये (कोअर पोर्टफोलिओ) या फंडाच्या रूपाने एक चांगल्या फंडाचा तुम्ही समावेश करीत आहात. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर आंतरराष्ट्रीय गुंतवणूक घटली म्हणून शोक करत ‘एसआयपी’ बंद किंवा नवीन गुंतवणूक टाळण्यापेक्षा तुमच्याकडे अतिरिक्त रक्कम असल्यास, सध्याच्या बाजारातील अस्थिरतेचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी उपलब्ध निधी या दर्जेदार फंडात गुंतवावा असा सल्ला आहे.

फंडाची गुंतवणूक आणि परतावा कामगिरी

कंपनी   गुंतवणुकीतील टक्केवारी    मागील एका  वर्षांतील परतावा %  

अ‍ॅक्सिस बँक    ५.४२   -७   

बजाज होिल्डग्ज ८.७    ४१

सीडीएसएल लि.  ३.२३   १५०

एचसीएल टेक.   ५.२७   २०

एचडीएफसी बँक  ५.१८   -९

हिरो मोटोकॉर्प             ५.००                 -२९

आयसीआयसीआय बँक   ५.२९   १२

इंडिया एनर्जी एक्स्चेंज    ४.५२   ९६

आयटीसी       ८.०४   १५

पॉवर ग्रिड      ४.५३   २६

निफ्टी ५००     —     १३

shreeyachebaba@gmail.com

म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजार जोखमींच्या अधीन असते. गुंतवणूक करण्यापूर्वी फंडाचे माहितीपत्रक कृपया सखोल अभ्यासा.

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त ( Arthvrutant ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Investment in mutual funds foreign investors indian mutual funds zws

ताज्या बातम्या