अजय वाळिंबे

कन्साई नेरोलॅक ही बहुराष्ट्रीय जपानी कन्साई समूहाची उपकंपनी आहे. जागतिक बाजारपेठेत कन्साई सजावटीच्या आणि औद्योगिक रंग उत्पादनांतील एक आघाडीची कंपनी समजली जाते. भारतीय उपकंपनी कन्साई नेरोलॅक ही मुख्यत्वे औद्योगिक पेंट, ऑटोमोटिव्ह, पावडर आणि सामान्य औद्योगिक कोटिंग्ज उत्पादनांत आहे. नामांकित जागतिक उत्पादकांची उपकंपनी तसेच कन्साईचे तांत्रिक सहकार्य यामुळे कन्साई नेरोलॅकला स्पर्धात्मक फायदा मिळतो. तसेच कंपनीची उत्पादने आंतरराष्ट्रीय गुणवत्ता आणि वैशिष्टय़ांची पूर्तता करणारी  मानली जातात. अत्याधुनिक आर्किटेक्चरल कोटिंग्जच्या निर्मितीसाठी कन्साईसोबतच्या मुख्य तांत्रिक सहकार्याव्यतिरिक्त, समूहाचे ओशिमा कोग्यो कंपनी लिमिटेड, जपान (उष्णता-प्रतिरोधक पेंटसाठी), प्रोटेक ऑक्सिप्लास्ट ग्रुप, कॅनडा (पावडर कोटिंग्जसाठी) आणि कॅश्यू लिमिटेड जपान (ऑटोमोटिव्ह कोटिंग्जसाठी) यांच्याशी तांत्रिक संबंध आहेत. २०२० या आर्थिक वर्षांत कंपनीने पॉलिजेल इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडच्या सहकार्याने नेरोफ्लिक्स प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना केली. नेरोफिक्स अधेसिव्ह, सीलंट, बांधकाम रसायने, मिश्रण, वॉटरप्रूिफग संयुगे, पोत आणि पेंट इ. उत्पादनांत आहे. विस्तारीकरणासाठी कंपनीने त्याच आर्थिक वर्षांत पर्मा कन्स्ट्रक्शन एड्स प्रायव्हेट लिमिटेड ही बांधकाम रसायनांमधील कंपनीदेखील विकत घेतली. या सगळय़ांमुळेच कन्साई नेरोलॅक ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी कोटिंग कंपनी आहे आणि इंडस्ट्रिअल कोटिंगमध्ये मार्केट लीडर आहे.

pakistani singer shazia manzoor slaps sherry nanha in the live show after asking honeymoon
“थर्ड क्लास माणूस…” संतापलेल्या गायिकेने लाईव्ह शोमध्येच कॉमेडियनच्या वाजवली कानाखाली; पाहा video
state of india s environment 2024 climate warnings amidst record high temperatures
अन्वयार्थ : हवामानकोपाला सामोरे कसे जाणार?
wagonr converted to pickup van see desi jugaa viral video
पठ्ठ्याच्या क्रिएटिव्हिटीला तोड नाही! जुगाडद्वारे बनविला वॅगनआर कारचा टेम्पो; VIDEO पाहून युजर्स अवाक्
couple romance at noida delhi metro station
VIDEO : मेट्रो स्टेशनवर रोमान्स करताना दिसले कपल; एकमेकांना किस करतानाचा व्हिडीओ होतोय व्हायरल, नेटकरी संतापले

डिसेंबर २०२१ साठी संपलेल्या तिमाहीसाठी कंपनीने १,८१० कोटी रुपयांची उलाढाल करून १४ टक्के वाढ नोंदवली असली तरीही नक्त नफ्यात गेल्या आर्थिक वर्षांतील याच कालावधीच्या तुलनेत ३७ टक्के घट होऊन तो १२८ कोटींवर आला आहे. यंदाच्या आर्थिक वर्षांत कोविड महामारीमुळे आलेली मंदी आणि जागतिक बाजारपेठेतील वाढते कच्च्या तेलाचे दर याचा विपरीत परिणाम कंपनीच्या कामकाजावर होऊ शकतो.

रंगकाम उद्योगाची गेल्या वर्षांतील देशांतर्गत उलाढाल/ बाजारपेठ सुमारे ५५,००० कोटी रुपयांची होती. मात्र भारतासारख्या विकसनशील देशांत पायाभूत सुविधांवर दिलेला भर, विस्तारणारे वाहन क्षेत्र तसेच बांधकाम क्षेत्राला आलेली उभारी यामुळे नजीकच्या काळात कन्साई नेरोलॅकसारख्या घरगुती तसेच औद्योगिक क्षेत्रात विविध उत्पादने पुरवणाऱ्या  आणि उत्तम गुणवत्ता असलेल्या कंपन्यांना अजून चांगले दिवस येतील अशी अपेक्षा आहे. अत्यल्प कर्ज आणि केवळ ०.५ बीटा असलेली कन्साई नेरोलॅक दीर्घ कालावधीत तुमच्या पोर्टफोलियोला आधार देईल अशी अपेक्षा आहे.

सध्याची शेअरबाजारातील अनिश्चितता पाहता प्रत्येक मंदीत तसेच टप्प्याटप्प्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे.

कन्साई नेरोलॅक पेंट्स लिमिटेड

(बीएसई कोड – ५००१६५)

शुक्रवारचा बंद भाव : रु. ४६४/-

वर्षभरातील उच्चांक/ नीचांक :

रु. ६७५ / ४२१

बाजार भांडवल :

रु. २५,००० कोटी

भरणा झालेले भागभांडवल : रु. ५३.८९ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक  ७४.९९   

परदेशी गुंतवणूकदार      ३.५७   

बँक/ म्यु. फंड/ सरकार   १३.२१   

इतर/ जनता     ८.२३

संक्षिप्त विवरण

* शेअर गट    : स्मॉल कॅप

* प्रवर्तक         : कन्साई पेंट, जपान

* व्यवसाय क्षेत्र : घर सजावट / औद्योगिक रंग

* पुस्तकी मूल्य : रु. ७५

* दर्शनी मूल्य         : रु. १/-

* गतवर्षीचा लाभांश : ५२५ %

शेअर शिफारसीचे निकष

*  प्रति समभाग उत्पन्न :      रु. ८.५१

*  किंमत उत्पन्न गुणोत्तर :     ५४.५

*  समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर :      ८२.७

*  डेट इक्विटी गुणोत्तर :       ०.०८ 

*  इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर :    २२.५

*  रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉइड : १७.७

*  बीटा :      ०.५

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यापेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.