पडद्यामगाचे सत्य

पारंपरिक विमा पॉलिसींमधील गुंतवणुकीच्या भागाचा विचार केला तरे साधारणत: ६ टक्क्यांच्या आसपास परतावा मिळत असतो.

पारंपरिक विमा पॉलिसींमधील गुंतवणुकीच्या भागाचा विचार केला तरे साधारणत: ६ टक्क्यांच्या आसपास परतावा मिळत असतो. १० टक्के वगैरे जे दाखविले जाते ते आय.आर.डी.ए.च्या नियमानुसार दाखवायचे म्हणून. आजपर्यंत गुंतवणूकदाराने जमा केलेल्या रकमेवर वार्षकि १० टक्के परतावा दिलेली पारंपरिक पॉलिसी पाहण्यात नाही. म्युच्युअल फंडाच्या ई.एल्.एस्.एस्. योजनांपकी सुमारे ४ योजनांनी त्यांच्या सुरुवातीपासूनचा काळ हिशोबात घेतला तर वार्षकि सरासरी २४ टक्क्यांपेक्षा जास्त वाढीची नोंद केलेली आहे.
भारतातील कोटक महेन्द्र उद्योग समूह आणि जागतिक स्तरावरील विमा कंपनी ओल्ड म्युच्युअल यांच्या सहकार्याने २००१ साली स्थापन झालेल्या कोटक लाईफ इन्शुरन्स या कंपनीची पारंपरिक विमा प्रकारातील ही पॉलिसी. या पॉल्सिीसंदर्भात सतीशला (नाव बदलले आहे) एक खास अनुभव आला. काही दिवसांपूर्वी एका इन्शुरन्स ब्रोकरच्या ऑफिसमधून त्याला एक मेल आली. त्यामध्ये कोटक कॅपिटल मल्टिप्लायर नावाच्या पॉलिसीची माहिती होती.
प्रथमदर्शनी त्याला ती पॉलिसी बरी वाटली म्हणून त्याने त्या मेलला उत्तर पाठविले. त्याच दिवशी त्याला त्या ब्रोकरच्या ऑफिसमधून एका मधाळ आवाजातल्या तरुणीचा फोन आला. तेव्हा त्याने स्वतबद्दलची माहिती सांगितली आणि त्याबाबतचे चित्रांकन  (illustration) मेल करायला सांगितले.
सतीशचे वय : ३३ वष्रे     
गुंतवणुकीची क्षमता : वार्षकि १ लाख रु.
यानुसार सतीशला पॉलिसीसंदर्भातील
चित्रांकनाचा मेल आला.
कोटेशनची तारीख : २६-१०-२०१३
विमाछत्राचा कालावधी : १५ वष्रे
वार्षकि प्रीमियम : ९७,००३ रु.
(सेवा करविरहित)
विमाछत्र : १५,६१,४५४ रु.

पुढील १५ वर्षांसाठी वार्षकि १ लाख रु.प्रमाणे सतीश एकूण १५ लाख रु. खर्च करण्यास तयार आहे. त्याला विमाछत्र तर हवेच आहे, परंतु त्याचबरोबर गुंतवणूकही हवी आहे. या दोन्ही गोष्टी वेगवेगळया हाताळल्या तर काय होते ते पाहू या. त्यासाठी त्याच्याकडे दोन पर्याय आहेत. भारतीय विमाक्षेत्रामधील क्लेम सेटलमेंट रेशिओंच्या बाबतीत टॉपच्या दोन कंपन्यांमध्ये त्याने ५० लाख रु. विमाछत्राची २५ वर्षांच्या टर्मची प्युअर टर्म पॉलिसी घेतली तर –
कंपनी क्रं.१ : वार्षकि प्रीमियम १७,४५० रु. २५ वर्षांच्या एकूण प्रीमियमची रक्कम४,३६,२५० रु. त्याने गुंतवणुकीसाठी ठरविलेल्या एकूण रकमेवरील बचत
१०,६३,७५० रु. (१५,००,०००४, ३६,२५०) ही रक्कम त्याने वार्षकि ७१,००० रु. प्रमाणे गुंतवणुकीच्या अशा एका सेफ पर्यायांमध्ये गुंतविली की ज्यामध्ये आयकरात सूट आहे आणि परतावा आयकरमुक्त आहे, तर १५ वर्षांमध्ये, म्हणजे कोटक कॅपिटल मल्टिप्लायर प्लानच्या देय रकमेच्या वेळी त्याच्याकडे
२२,१३,२६५ रु. इतकी गंगाजळी तयार होते.
कंपनी क्रं.२ : वार्षकि प्रीमियम ७,५०० रु. २५ वर्षांमधील एकूण रक्कम १,८७,५०० रु. बचत १३,१२,५०० रु. (१५,००,०००१,८७,५००). ही रक्कम त्याने वार्षकि ८७,५०० रु. प्रमाणे वरील सेफ पर्यायामध्ये १५ वष्रे गुंतविली की त्याच्या वयाच्या ४८ व्या वर्षी त्याच्याकडे २७,२७,६१६ रु. इतकी गंगाजळी
तयार होते, आणि तीही खात्रीलायक.

नेहमीप्रमाणे पहिल्या वर्षांपासून १५व्या वर्षांपर्यंत ६ टक्के किंवा १० टक्के गृहीत परताव्यानुसार सतीशच्या खात्यात दरवर्षी जमा होत जाणाऱ्या रकमेचा तक्ता सोबत होता. त्याखाली बारीक अक्षरात छापलेली टीप होती. ‘वर जो ६ टक्के आणि १० टक्के परताव्याचा दर दाखविला आहे, त्यामध्ये ३ टक्के प्रत्याभूत (guaranteed)
 दराचा समावेश आहे. तक्त्यामध्ये दाखविल्या रकमा या फक्त चित्रांकनासाठी आहेत. कंपनी त्याबाबत कोणत्याही प्रकारची हमी देत नाही’.
सतीशने गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून परताव्याच्या रकमांचा अभ्यास करायला सुरुवात केली. पहिल्या वर्षांची ६ टक्के परतावा गृहीत धरून बोनसची रक्कम होती ३५,००० रु. सतीश बुचकळयात पडला. विमाछत्राच्या रकमेच्या ६ टक्के असे गणित मांडले तर रक्कम येते ९३,६८७ रु. आणि पहिल्या वर्षी प्रीमियमपोटी भरलेल्या रकमेवर (९७,००३) ६ टक्क्यांनी हिशोबाने रक्कम येते ५,८२० रु. ब्रोकरच्या ऑफिसमधून पुन्हा फोन आला, तेव्हा त्याने त्याबाबत खुलासा
विचारला. ब्रोकरच्या ऑफिसमधील ज्येष्ठ कर्मचाऱ्याचे उत्तर होते, ‘तुम्ही पहिल्या वर्षी जे प्रीमियम (९७,००३ रु.) भरता त्यापकी ३३,००० रु.ची गुंतवणूक होते. त्यावर ६ टक्क्यांनी १९८० रु. जमा होतात आणि एकूण रक्कम होते ४,९८० रु. राऊंड ऑफ करून ती ३५,००० रु. रक्कम दाखविली आहे’.
सतीश : माझ्या पहिल्या वर्षीच्या ९७,००३ रु. पकी फक्त ३३,००० रु. ची गुंतवणूक होते, तर बाकीच्या सुमारे ६४,००० रु. चे काय होते?
ब्रोकरचा कर्मचारी : ते पसे अ‍ॅलोकेशन, मॉरटॅलिटी चार्जेससारख्या वेगवेगळया मथळयाखाली कापले जातात.
सतीश : कोणत्या मथळयाखाली किती पसे कापले जातात? हा प्रश्न विचारल्यावर त्या ब्रोकरच्या कर्मचाऱ्याने सतीशला होल्डवर ठेवला आणि नंतर कोटक लाइफ या कंपनीचा अधिकारी फोनवर बोलू लागला.
अधिकारी : कोणत्या मथळयाखाली किती पसे कापले जातात याबद्दल आम्ही तुम्हाला काहीही सांगू शकत नाही. त्याबाबतीत आमच्यावर बंधन आहे.
सतीश : अहो, मी जमा केलेल्या पहिल्या वर्षांच्या प्रीमियमचे जवळजवळ ६६ टक्के वेगवेगळया खिशात जातात आणि ते कसे हे तुम्ही सांगू शकत नाही म्हणजे काय? पसे माझे आहेत आणि त्याबद्दल माहिती करून घेणे हा माझा हक्क आहे.
अधिकारी : युलिपच्या बाबतीत आम्ही सांगू शकतो. ही टड्रिशनल पॉलिसी आहे. त्या बाबतीत हे सर्व उघड करण्याचे आमच्यावर बंधन नाही.
सतीश : म्हणजे काही वर्षांपूर्वी सेबीने हरकत घेतली होती म्हणून तुम्ही युलिपच्या बाबतीत सर्व खर्च उघड करता. स्वत:हून आपल्या प्रॉडक्टमध्ये पारदर्शकता ठेवण्याची तुम्हाला गरज वाटत नाही.
अधिकारी : मी आपल्याशी आय्.आर.डी.ए.ने तयार केलेल्या नियमांच्या चौकटीनुसारच बोलतो आहे. यापेक्षा जास्त माहिती मी देऊ शकत नाही. अशा प्रकारचे उद्दाम उत्तर ऐकल्यावर सतीशने त्या पॉलिसीबाबतचा विचार सोडून दिला.
कोटक कॅपिटल मल्टिप्लायर प्लानमध्ये फक्त ३ टक्के परताव्याची हमी दिलेली आहे. त्यापेक्षा जास्त परतावा मिळणे हे संपूर्णपणे कंपनीने कमाविलेल्या नफ्यावर अवलंबून आहे. विमाधारकांच्या दृष्टिकोनातून पाहिले तर ते या बाबतीत पूर्वनियोजित जोखीम ((calculated risk) घेत असतात. वर दर्शविलेल्यांपकी प्युअरटर्म पॉलिसी घेतल्यानंतर उर्वरित रक्कम जर त्यांनी ठोस परतावा मिळणाऱ्या सेफ पर्यायामध्ये गुंतविण्याऐवजी पूर्वनियोजित जोखीम पत्करून
म्यु.फंडाच्या आयकर बचत फंडामध्ये गुंतविली तर आयकरामध्ये तर सूट मिळेलच आणि परतावाही आयकर मुक्त असेल. शिवाय गुंतवणूक फक्त तीन वर्षांसाठीच बंदिस्त (Locking up period)  असेल. त्यानंतर गुंतवणुकदार  आपले पसे केव्हाही परत मागू शकेल. म्युच्युअल फंडाच्या ई.एल्.एस्.एस्. योजनांपकी सुमारे चार योजनांनी त्यांच्या सुरवातीपासूनचा काळ हिशोबात घेतला तर वार्षकि सरासरी २४ टक्क्यांपेक्षा जास्त वाढीची नोंद केलेली आहे.
सतीशच्या वाटय़ाला फक्त अर्धी म्हणजे १२ टक्के वाढ गृहीत धरली तर कंपनी क्रं.१ आणि कंपनी क्र.२ मधील प्रीमियमच्या फरकाच्या रकमेच्या वार्षकि गुंतवणुकीपासून त्याच्या ४८ व्या वर्षी किती रक्कम जमा होते ते पाहू या – कंपनी क्रं.१ ची गुंतवणुकीची वार्षकि रक्क्म ७१,००० रु. १२ टक्केप्रमाणे १५ वर्षांनंतर तयार होणारी गंगाजळी २९,६४,४८२ रु. कंपनी क्रं.२ ची गुंतवणुकीची वार्षकि रक्कम ८७,५०० रु. १२ टक्के प्रमाणे १५ वर्षांनंतरची गंगाजळी – ६,५३,४१२ रु. (सदर लेख प्रत्यक्ष घटनेवर आधारित आहे आणिउद्देश वाचकांना जागृत करण्याचा आहे.)लेखक गुंतवणूक आणि विमा सल्लागार आहेत.ठळक वैशिष्टय़े :
१. या पॉलिसीअंतर्गत दरवर्षी बोनस घोषित केला जातो. जेणेकरून मॅच्युरिटीपर्यंत विमाधारकाच्या खात्यात भरपूर गंगाजळी तयार होते. त्यामुळे निवृत्तीनंतर आíथक विवंचनेपासून मुक्ती मिळते.
२. मॅच्युरिटीनंतर विमाधारकाला  पूर्ण रक्कम मिळू शकते किंवा ती रक्कम आपल्या खात्यात तशीच ठेवून पुढील १५ वर्षांमध्ये हप्त्याहप्त्याने परत घेता येते. या सुविधेत आणखी एक लाभ आहे. पुढील १५ वष्रे मूळ विमा रकमेच्या १० टक्के रकमेचे विमाछत्र प्राप्त
होते.
३. प्रीमियम भरावयाच्या कालावधीमध्ये विमाधारकाचा मृत्यू झाला तर त्याच्या नामनिर्देशकाला मूळ विमा रक्कम किंवा त्याच्या खात्यामध्ये जमा असलेली रक्कम अधिक मूळ विमा रकमेच्या १० टक्के रक्कम यापकी जी रक्कम जास्त
असेल ती प्राप्त होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Kotak capital multiplyer plan

ताज्या बातम्या