समीर नेसरीकर

भांडवल बाजारातील बहुसंख्य आगंतुक गुंतवणूकदार ‘मल्टीबॅगर’ समभाग शोधण्यात खूप वेळ खर्च करतात. त्यांना असे सांगणे आहे की, त्यांनी स्मॉल कॅप फंडातील गुंतवणूक पर्यायाचा अवश्य विचार करावा. प्रत्येक फंडाचा परतावा आणि घेतलेली जोखीम, प्रमाणित विचलन हे वेगळे असते. परताव्याच्या आकडय़ांपाठी त्या फंडातील जोखीम सावलीसारखी चालत असते, हे लक्षात घ्यायला हवे.

wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
apmc market, license issue, nashik district
नाशिक : बाजार समित्यांमध्ये उत्तर भारतातील व्यापाऱ्यांना परवाने देण्याचा विचार
entrepreneur and digital freelancer Saheli Chatterjee
सोशल मीडियावर ११० रुपयांनी सुरू झाली कमाई; आता आहे कोट्यावधींची मालकीण! जाणून घ्या ‘या’ उद्योजिकेचा प्रवास
repair work of creek bridge on uran panvel road completed
उरणच्या खाडीपूल दुरुस्तीचे काम पूर्ण; ‘हाइट गेट’ हटवण्याची प्रतीक्षा; चार गावांतील हजारो नागरिकांना दिलासा

    माणसांचा उद्यमशीलतेचा प्रवास हा जिद्दीचा आहे. नवकल्पनेचा आहे. विजिगीषु वृत्तीचा आणि मनगटातील ताकदीचा आहे. एखाद्या स्वप्नाचा पाठपुरावा करणं, असंख्य व्यावहारिक अडचणींवर मात करून ते प्रत्यक्षात आणणं आणि त्या व्यवसायाचा बाजारात एक वेगळा ठसा उमटवणं, हा सारा प्रवास रोमांचकारी आहे. भारतातल्या कितीतरी लहान किंवा लहान प्रमाणात सुरुवात करून कालांतराने लहानपणाची वेस ओलांडलेल्या कंपन्यांच्या प्रवर्तकांची जीवनगाथा, सर्वानीच अभ्यासावी अशीच आहे. प्रेरणेचा एक अक्षय्य स्रोत आहेत ही मंडळी.

दररोजच्या व्यवहारातून जर आपण बारकाईने पाहिलं तर आपल्या उत्पादनातून / सेवेतून या अशा लहान कंपन्या आपल्याशी कधीतरी जोडल्या जातच असतात. आपण थेट गुंतवणूकदारही असू शकतो त्या कंपन्यांत, आपल्या बरोबरीने म्युचुअल फंडसुद्धा अशा लहान कंपन्यांमध्ये गुंतवणूक करत असतात. त्याविषयी जाणून घेऊ या आजच्या लेखात, विषय आहे ‘स्मॉल कॅप’ फंड.

 मुळात स्मॉल कॅप कंपनी म्हणजे काय? ‘सेबी’ने ऑक्टोबर २०१७ च्या पत्रकानुसार, बाजार भांडवल अर्थात मार्केट कॅपनुसार कंपन्यांची क्रमवारी करायचे ठरविले. त्यानुरूप मार्केट कॅपच्या क्रमवारीनुसार अव्वल २५० कंपन्या वगळता, २५१ पासून पुढे क्रम लागणाऱ्या तळच्या  कंपन्यांना स्मॉल कॅप कंपन्या संबोधले गेले. ‘सेबी’च्या योजना पत्रकानुसार स्मॉल कॅप म्युच्युअल फंडाला कमीत कमी ६५ टक्के गुंतवणूक या स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये करणे बंधनकारक आहे. 

स्मॉल कॅप फंडांचे वैशिष्टय़ हे आहे की, साधारणत: त्यांचा परतावा लार्ज कॅप फंडांपेक्षा जास्त असू शकतो. अर्थात त्यामध्ये थोडी जास्त जोखीम असते. परंतु ज्यांची जास्त जोखीम घ्यायची तयारी आहे, त्यांना यात दीर्घ कालावधीत एक चांगला परतावा मिळण्याची शक्यता असते. स्मॉल कॅप कंपन्या या खूप वेगवेगळय़ा क्षेत्रात दिसून येतात आणि त्यातील काही क्षेत्र निफ्टी ५० किंवा सेन्सेक्स या मुख्य निर्देशांकामध्ये सामील कंपन्यांच्या पलीकडील असतात. त्यामुळे जर तुम्ही स्मॉल कॅप फंडात पैसे गुंतवत असाल तर तुम्ही अप्रत्यक्षपणे निफ्टी ५० / सेन्सेक्स व्यतिरिक्त अन्य क्षेत्रातील कंपन्यांमध्ये गुंतवणूक करत असता. निष्णात फंड व्यवस्थापक यातील काही अग्रणी कंपन्यांमध्ये पैसे गुंतवितो. उदाहरण द्यायचे झाल्यास आज मोठय़ा झालेल्या एसआरएफ, एल अँड टी इन्फोटेक, पर्सिस्टन्ट सिस्टीम्स या एकेकाळी छोटय़ा कंपन्या होत्या. अशी अनेक उदाहरणे आहेत. 

वाचकांच्या माहितीसाठी स्मॉल कॅप फंडांची काही उदाहरणे देत आहे. दहा वर्षांचा वार्षिक वृद्धीदराचा (सीएजीआर) विचार करता, फेब्रुवारी २०२२ अखेरीस एसबीआय स्मॉल कॅप ,निप्पॉन स्मॉल कॅप, डीएसपी स्मॉल कॅप, कोटक स्मॉल कॅप, फ्रँकलिन इंडिया स्मॉलर कंपनीज् फंडाचा परतावा अनुक्रमे २४.६० टक्के, २४.४५ टक्के, २१.४२ टक्के, २०.४३ टक्के आणि २०.३३ टक्के असा आहे. चक्रवाढीची ताकद बघता १० वर्षांत १५ टक्के वृद्धी दराने (उदाहरण म्हणून) गुंतविलेल्या मूळ रकमेचे मूल्य साधारण चौपट होते हे आपण ध्यानात ठेवले पाहिजे. अर्थात बाजाराचा चढणीचा आणि उतरंडीचा एक आलेख असतो, एकाच दिशेने वाटचाल कधीच होत नसते. ‘टाइम इन द मार्केट इज मोर इम्पॉर्टन्ट दॅन टाइिमग द मार्केट’ हे खरे तर भांडवली बाजारातील यशाचं गमकच असतं.  परताव्याच्या आकडय़ांपाठी त्या फंडातील जोखीम सावलीसारखी चालत असते. प्रत्येक फंडाचा परतावा आणि घेतलेली जोखीम, प्रमाणित विचलन (स्टॅंडर्ड डेव्हिएशन) हे वेगळे असते. त्याचबरोबरीने ‘अप साइड कॅप्चर रेशो’आणि ‘डाउन साइड कॅप्चर रेशो’ याचा आधार घेऊन परताव्याचे अधिक खोलात जाऊन विच्छेदन करता येते. बाजार वाढत असताना आणि बाजार पडत असताना फंडाचा मानदंडसापेक्ष परतावा कसा होता याचा हा अभ्यास असतो. १०० पेक्षा जास्त ‘अप साइड कॅप्चर रेशो’ हा फंडाच्या चांगल्या कामगिरीचा द्योतक आहे, तसेच ‘डाउन साइड कॅप्चर रेशो’ १०० पेक्षा कमी असल्यास फंड मानदंडापेक्षा कमी पडला असा निष्कर्ष काढता येतो. एकाच योजना श्रेणीतला हा तुलनात्मक अभ्यास फंड निवडीसाठी अत्यंत आवश्यक आहे. गुंतवणूक क्षेत्रातील योग्य अनुभवी सल्लागार निवडल्यास आपला मार्ग अधिक सुकर होऊ शकेल.  आणखी एक वेगळा मुद्दा, भांडवल बाजारातील बहुसंख्य आगंतुक गुंतवणूकदार ‘मल्टीबॅगर’ समभाग शोधण्यात खूप वेळ खर्च करतात. त्यांना असे सांगणे आहे की, त्यांनी स्मॉल कॅप फंडातील गुंतवणूक पर्यायाचा अवश्य विचार करावा. फंड व्यवस्थापकाच्या मदतीने (लिव्हरेजच्या अनुषंगाने) तुमच्या संपत्तीत वाढ होऊ द्या. तुमचा वेळ तुमच्या कामधंद्यावर व्यतीत करा. संपत्तीनिर्मिती व्हायला एक काळ जावा लागतो तो पर्यंत संयमबाळगावा लागेल. जेव्हा आपला पहिला पगार / मिळकत येते तेव्हापासूनच खरे तर निवृत्ती काळासाठीची तजवीज करणे गरजेचे आहे. आधीपासूनच स्मॉल कॅप फंड तुमच्या पोर्टफोलिओचा भाग असल्यास दीर्घ कालावधीत एक चांगली रक्कम तुमच्या हातात पडू शकेल ही ‘छोटी सी आशा’ आपण नक्कीच बाळगू शकतो.

 (लेखक मुंबईस्थित गुंतवणूकविषयक अभ्यासक)

sameernesarikar@gmail. com