scorecardresearch

बाजाराचा तंत्र-कल : ..साथ लाभेल का?

हृदयावरील, मनावरील ओझे हलक होण्यासाठी शब्दाबरोबर सोबत्याची साथ लागते.

|| आशीष ठाकूर

हृदयावरील, मनावरील ओझे हलक होण्यासाठी शब्दाबरोबर सोबत्याची साथ लागते. तशी १८,३५० वरून घरंगळणाऱ्या निफ्टी निर्देशांकाला कुठल्या स्तराची, भरभक्कम आधाराची साथ लाभेल? या घातक उताराला यातून येनकेन अटकाव करता येईल? हे सरलेल्या सप्ताहातील गुंतवणूकदारांच्या मनातील प्रश्न होते. या प्रश्नाचा विस्तृत आढावा घेण्याअगोदर सरलेल्या सप्ताहातील निर्देशांकाचा साप्ताहिक बंद जाणून घेऊया. 

शुक्रवारचा बंद भाव :

सेन्सेक्स : ५९,०३७.१८

निफ्टी : १७,६१७.१५

या स्तंभातील १० जानेवारीच्या ‘मन उधाण वाऱ्याचे’ या लेखातील वाक्य होते झ्र् ‘निफ्टी निर्देशांकावर १४ कामकाज दिवसांत, १,४९५ अंशांची जी वाढ झाली ती अतिजलद, पाया न रचता झालेली भूमिती श्रेणीतील वाढ आहे. जी भविष्यात घातक उतारास कारणीभूत ठरते. हे टाळायचे असल्यास, निफ्टी निर्देशांकांने १७,७०० च्या दरम्यान थोडी विश्रांती घेऊन, या स्तरावर पायाभरणी करत संथ गतीने १८,००० ते १८,३००चे वरचे लक्ष्य साध्य करावे. हे वरचे लक्ष्य साध्य झाल्यानंतर पुन्हा १७,५०० पर्यंत घसरण होऊन, नंतर निफ्टी निर्देशांकांने  १८,९०० च्या नवीन उच्चांकाला गवसणी घालावी..’ त्या लेखातील मंदीच्या बाबतीतील भाकिताचे ‘शब्द न् शब्द’ मूर्तरूप सरलेल्या सप्ताहात सर्वानी प्रत्यक्षपणे अनुभवले.

जसे की, मंगळवारी १८ जानेवारीला आनंदातला, उत्साहातला, जल्लोशातला १८,३५० चा उच्चांक निफ्टी निर्देशांक काय अनुभवतो, तर अवघ्या तीन दिवसांत, दातखिळी बसवणारी निफ्टी निर्देशांकावरील १७,४८६ची घसरण दहशत देखील पाहतो. ही सर्व जीवघेणी उलथापालथ सरलेल्या सप्ताहात आपल्याला अनुभवता आली.

सद्य:स्थितीत आपण महत्त्वाच्या वळणिबदूवर (टर्निग पॉइंटवर) आहोत. ज्यात समाजाच्या प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तींच्या आशा, आकांक्षा, स्वप्नपूर्ततेच साधन म्हणजे ‘अर्थसंकल्प.’

फेब्रुवारीच्या १ तारखेला सादर होणारा अर्थसंकल्प जर ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ असल्यास निफ्टी निर्देशांक १८,३००च्या पल्याड झेपावताना दिसेल. ३०० अंशांचा फेर धरत निफ्टी निर्देशांकाची वरची लक्ष्य ही १८,६००.. १८,९००.. १९,२०० अशी असतील.

आताच्या अपेक्षित सुधारणेत आणि त्यानंतरच्या अर्थसंकल्पाकडून बाजाराचा दारूण अपेक्षाभंग झाल्यास, निफ्टी निर्देशांक १८,००० चा महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर तोडताना दिसेल. निफ्टी निर्देशांकाला १७,२०० च्या पातळीची साथ लाभेल. या पातळीचा आधार घेत निफ्टी निर्देशांकावर तेजीचे अंकुर बहरतील.

निकालपूर्व विश्लेषण

अ‍ॅक्सिस बँक लिमिटेड 

तिमाही वित्तीय निकाल : सोमवार, २४ जानेवारी 

२१ जानेवारीचा बंद भाव – ७१२.६० रु. 

निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर : ७०० रु.

अ) उत्कृष्ट निकाल: समभागाकडून ७०० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ७५० रुपये, द्वितीय लक्ष्य ८०० रुपये.

ब) निराशादायक निकाल: ७०० रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत ६६० रुपयांपर्यंत घसरण.

एसबीआय कार्डस अँड पेमेंट सव्‍‌र्हिसेस लिमिटेड

तिमाही वित्तीय निकाल : सोमवार, २४ जानेवारी        

२१ जानेवारीचा बंद भाव – ८५०.५० रु.  

निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर : ८६० रु.

अ) उत्कृष्ट निकाल: समभागाकडून ८६० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ९०० रुपये, द्वितीय लक्ष्य ९४० रुपये.

ब) निराशादायक निकाल: ८६० रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत ७९० रुपयांपर्यंत घसरण.

कोटक मिहद्र बँक लिमिटेड

तिमाही वित्तीय निकाल : शुक्रवार, २८ जानेवारी         

२१ जानेवारीचा बंद भाव – १,८९२.८५ रु.  

निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर झ्र् १,९०० रु.

अ) उत्कृष्ट निकाल: समभागाकडून १,९०० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य २,००० रुपये, द्वितीय लक्ष्य २,०८०  रुपये.

ब) निराशादायक निकाल : १,९०० रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत १,८५० रुपयांपर्यंत घसरण.

लार्सन अँण्ड टुब्रो लिमिटेड

तिमाही वित्तीय निकाल : शुक्रवार,२८ जानेवारी         

२१ जानेवारीचा बंद भाव – १,९५४.५५ रु.  

निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर : १,९५० रु.

अ) उत्कृष्ट निकाल: समभागाकडून १,९५० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य २,०५० रुपये, द्वितीय लक्ष्य २,२००   रुपये.

ब) निराशादायक निकाल : १,९५० रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत १,८३० रुपयांपर्यंत घसरण.

मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड  

तिमाही वित्तीय निकाल : मंगळवार, २५ जानेवारी        

२१ जानेवारीचा बंद भाव – ८,१८८.६० रु.  

निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर- ७,९०० रु.

अ) उत्कृष्ट निकाल: समभागाकडून ७,९०० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ८,३५० रुपये, द्वितीय लक्ष्य ८,९०० रुपये.

ब) निराशादायक निकाल : ७,९०० रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत ७,६०० रुपयांपर्यंत घसरण.

अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’, इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

लेखक भांडवली बाजार विश्लेषक

ashishthakur1966@gmail.com

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त ( Arthvrutant ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Last week stock market performance stock market weekly update akp

ताज्या बातम्या