आशीष ठाकूर
सामथ्र्यवान पुरुषाच्या सामर्थ्यांत त्याचे सौंदर्य असते, तर सौंदर्यवान स्त्रीच्या सौंदर्यात तिचं सामथ्र्य असते. आजच्या घडीला अमेरिकेत कर्जावरील व्याजदर, महागाईची धग यामुळे सर्व भांडवली बाजारांना आर्थिक भूकंपाचे हादरे बसत आहेत. प्रथम महागाईची धग व त्यामुळे ‘डाऊ जोन्स’ निर्देशांकावर १,३०० अंशांची घसरण झाली. नंतर प्रत्यक्ष कर्जावरील व्याजदर वाढवल्यानंतर ‘डाऊ जोन्स’ निर्देशांकावर ५०० अंशांची घसरण झाली. गेल्या दहा दिवसांतील घसरण-गाडीने, आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व भांडवली बाजारात रक्तपात सुरू आहे. मात्र या सर्व उलथापालथीत निफ्टी निर्देशांकाने अवघी ७९७ अंशांची (१८,०८८ वरून १७,२९१) घसरण दाखविली. तुलनेने इतर आंतरराष्ट्रीय भांडवली बाजारात दिवसाला ५०० ते १,३०० अंशांची घसरण होत असताना, आपल्याकडे दहा दिवसांतील एकत्रित घसरण अवघी ७९७ अंशांची आहे, जी निफ्टी निर्देशांकाचे सामथ्र्य दर्शविते. या पार्श्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या लेखातील वाक्य होते – ‘निफ्टी निर्देशांकावर १७,७३५ ते १७,९०० पर्यंत सुधारणा अपेक्षित आहे. या सुधारणेत १८,००० चा स्तर पार करण्यास निफ्टी निर्देशांक वारंवार अपयशी ठरल्यास निफ्टी निर्देशांकाचे खालचे लक्ष्य १७,२०० ते १६,८०० असे असेल.’
मागील लेखातील हे वाक्य काळाच्या कसोटीवर तपासता, सप्ताहाच्या सुरुवातीला १९ सप्टेंबरला, १७,४२९ स्तराचा आधार घेत निफ्टी निर्देशांक १७,९१९ पर्यंत झेपावला. या सुधारणेत १८,००० चा स्तर पार करण्यास निफ्टी निर्देशांक अपयशी ठरत असल्यामुळे, त्याच वेळेला गुंतवणूकदारांनी १७,२०० च्या घसरणीची आर्थिक, मानसिक तयारी केली आणि सरलेल्या सप्ताहातील शुक्रवारी त्याची प्रचीतीदेखील आली. या वाटचालीतून तांत्रिक विश्लेषणशास्त्राचे सामथ्र्य दिसले, तर हे भाकीत प्रत्यक्षात आणण्यासाठी निफ्टीने ज्या काही लकबी दाखविल्या त्यातून निफ्टीच्या पदन्यासचे सौंदर्य दिसून आले. आता चालू असलेल्या निफ्टी निर्देशांकाच्या घसरणीला १७,२०० ते १७,००० स्तराचा आधार असेल. या स्तराचा आधार लाभल्यास, निफ्टी निर्देशांक १७,२०० ते १७,५०० स्तरावर पायाभरणी करताना दिसेल आणि त्याचे वरचे लक्ष्य हे १७,७०० ते १७,८०० असे असेल. या सुधारणेला पुन्हा १८,००० स्तराचा भरभक्कम अडथळा असून निफ्टी निर्देशांक १८,००० चा स्तर पार करण्यास आणि त्या उप्पर १७,२०० चा स्तर राखण्यासदेखील अपयशी ठरत असल्यास ‘भय इथले संपत नाही.’..तर मात्र निफ्टी निर्देशांकाचे पहिले खालचे लक्ष्य १६,८०० ते १६,५०० आणि द्वितीय लक्ष्य १६,२०० असे असेल.

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Market beauty beauty of a woman indexes dow jones inflation interest rate capital financial to markets amy
First published on: 26-09-2022 at 00:03 IST