scorecardresearch

बाजाराचा तंत्र-कल : कालाय तस्मै नम:

आपल्या आयुष्यातील अनुत्तरित प्रश्नांच्या उत्तरांसाठी- ‘यावर काळच उत्तर आहे!’ असे बोलून आपण मोकळे होतो.

( प्रतिनिधिक छायाचित्र )

गेल्या लेखातील वाक्य होते – ‘महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर जी काही अभूतपूर्व उलथापालथ झाली त्यात सत्ताधारी पक्षास विधानसभेत बहुमताचा आधार आणि निफ्टी निर्देशांकाला १५,१८३ चा आधार आहे की नाही हे ‘मन मनास उमगत नाही, आधार कसा शोधावा’ अशी भावना या दोन्ही आघाडय़ांवर होती.’ त्याच लेखात ‘गॅन कालमापन’ पद्धतीचा आधार घेत निर्देशांकाच्या भविष्यकालीन वाटचालीचा आढावा घेतला होता आणि या तिघांमध्ये सामाईक दुवा हा वेळेचा/ काळाचा होता. आपल्या आयुष्यातील अनुत्तरित प्रश्नांच्या उत्तरांसाठी- ‘यावर काळच उत्तर आहे!’ असे बोलून आपण मोकळे होतो. याचेच प्रत्यंतर राजकीय पटलावर राज्याला नवीन मुख्यमंत्री मिळाला आणि निफ्टी निर्देशांक १५,१८३ चा स्तर राखत १५,९२७ पर्यंत झेपावला – ‘कालाय तस्मै नम:’! या पार्श्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या.

राजकीय आघाडीवर आता जशी पारदर्शकता दिसत आहे तशीच निफ्टी निर्देशांकावर पारदर्शकता शोधण्याचा प्रयत्न करू या. त्यासाठी गेल्या लेखातील काही उताऱ्यांचा आधार घेत निफ्टी निर्देशांकाची वाटचाल रेखाटू या.

निफ्टी निर्देशांकावर १५,९०० हा ‘महत्त्वाचा केंद्रिबदू’ मानत ‘गॅन कालमापन’ पद्धतीचा आधार घेत, १ ते ८ जुलैमध्ये निफ्टी निर्देशांकाची वाटचाल ही खालील तीन शक्यतांमध्ये विभागली होती – १) निफ्टी निर्देशांक १५,९०० चा स्तर पार करत १६,२०० चा उच्चांक नोंदवेल. २) निफ्टी निर्देशांक १५,३०० ते १५,९०० मध्ये पायाभरणी करत १ ते ८ जुलैच्या दरम्यान निफ्टी निर्देशांक सकारात्मक वरचा छेद देत आपल्या वरच्या लक्ष्यांकडे वाटचाल सुरू करेल. ३) निफ्टी निर्देशांक १५,९०० वरून घसरण सुरू होत १ ते ८ जुलैदरम्यान नीचांक नोंदवेल. आताच्या घडीला शक्यता क्रमांक ३ चा विचार करता : सरलेल्या सप्ताहातील पूर्वार्धात सोमवारी, २७ जूनला निफ्टी निर्देशांकाने १५,९०० या ‘महत्त्वाचा केंद्रिबदू’ स्तराला स्पर्श करत, १५,९२७ चा उच्चांक मारून घसरणीला सुरुवात केली. सरलेल्या सप्ताहातील शुक्रवारी १ जुलैला निफ्टी निर्देशांकाने १५,५११ हा दिवसांतर्गत नीचांक नोंदवत, त्वरित सावरत जलद सुधारणा केली आणि त्या दिवशीचा त्याचा बंद भाव हा १५,७५२ होता. या आठवडय़ात ८ जुलैपर्यंत निफ्टी निर्देशांकाने १५,५०० चा स्तर राखल्यास, निफ्टी निर्देशांकांनी आपले खालचे लक्ष्य शुक्रवारी, १ जुलैला – कालानुरूप व १५,५०० च्या किमती स्वरूपात – साध्य केल्याचे गृहीत धरावे. निफ्टी निर्देशांकांनी १५,५०० च्या स्तरावर पायाभरणी केल्यास निफ्टी निर्देशांकाचे वरचे लक्ष्य हे १५,९००.. १६,२००.. १६,५०० असे असेल. या सर्व प्रक्रियेत निफ्टी निर्देशांकाने १५,३००चा स्तर राखण्याची नितांत गरज आहे, १५,३०० चा स्तर न राखल्यास तेजीचा अंत गृहीत धरावा.

निकालपूर्व विश्लेषण
१) पीटीसी इंडिया लिमिटेड
६ तिमाही वित्तीय निकाल – मंगळवार, ५ जुलै
६ १ जुलैचा बंद भाव – ७५.६५ रु.
६ निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर – ७५ रु. अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ७५ रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ८५ रुपये, द्वितीय लक्ष्य ९५ रुपये.
ब) निराशादायक निकाल : ७५ रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत ६५ रुपयांपर्यंत घसरण.
२)ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेड (डीमार्ट)
६ तिमाही वित्तीय निकाल – शनिवार, ९ जुलै
६ १ जुलैचा बंद भाव – ३,३८८.७५ रु.
६ निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर – ३,३५० रु.
अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ३,३५० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ३,६५० रुपये, द्वितीय लक्ष्य ३,९५० रुपये.
ब) निराशादायक निकाल : ३,३५० रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत ३,२०० रुपयांपर्यंत घसरण.
३) भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (बीईएल)
६ तिमाही वित्तीय निकाल – शनिवार, १६ जुलै
६ १ जुलैचा बंद भाव – २२९.८० रु.
६ निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर – २३० रु.
अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून २३० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य २५० रुपये, द्वितीय लक्ष्य २७५ रुपये.
ब) निराशादायक निकाल : २३० रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत २०५ रुपयांपर्यंत घसरण.
शुक्रवारचा बंद भाव :
सेन्सेक्स : ५२,९०७.९३
निफ्टी : १५,७५२.०५

लेखक भांडवली बाजार विश्लेषक
ashishthakur1966@gmail.com

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त ( Arthvrutant ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Market political of maharashtra legislative assembly gain chronology amy

ताज्या बातम्या