आशीष ठाकूर

जेव्हा बाजार मंदीच्या गर्तेत होता तेव्हा निफ्टीची स्थिती ‘कोमेजून थकलेली एक परी राणी’अशी होती. त्या मंदीच्या गर्तेतदेखील, येणाऱ्या दिवसांत सुधारणा होऊन निफ्टी निर्देशांकाचा संभाव्य उच्चांक हा १८,०९६ असा असेल.. हे या स्तंभातील तेव्हाचे भाकीत अविश्वसनीय, ‘दिल है के मानता नहीं’ असे वाटत होते, पण सरलेल्या सप्ताहातील रंगपंचमीच्या अगोदर बाजारात जी काही तेजीच्या रंगाची उधळण झाली, त्यात निफ्टी निर्देशांक १७,२००च्या पल्याड झेपावल्याने मंदीने कोमेजलेल्या मनावर, तेजीने हळुवार फुंकर घालत सर्वानाच प्रसन्न केले. या पाश्र्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या.

Nashik heat, Temperature Hits New High, 40 Degrees Celsius, nobody on manmad street market, summer, summer news, summer in nashik, heatwave in nashik, heat wave in manmad, manmad news, nashik news,
नाशिक : उंचावणाऱ्या तापमानाने आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ, मनमाडमधील रस्त्यांवर असलेला शुकशुकाट
mumbai, KEM Hospital, Artificial Insemination Center, Project Stalled, Election Code of Conduct, child, Infertility, husband wife, couple for Artificial Insemination, mumbai KEM Hospital,
मुंबई : ‘केईएम’च्या कृत्रिम गर्भधारणा केंद्राला आचारसंहितेचा फटका
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
Sensex Nifty gains higher as a result of mineral oil prices
तेलाच्या भडक्याने ‘सेन्सेक्स-निफ्टी’च्या दौडीला पाचर

शुक्रवारचा बंद भाव :

सेन्सेक्स : ५७,८६३.९३

निफ्टी : १७,२८७.०५ 

आता चालू असलेल्या तेजीत निफ्टी निर्देशांकावर १७,००० ते १७,२०० हा महत्त्वाचा ‘वळणिबदू स्तर’(टर्निग पाँइंट) असेल. हा स्तर डोळय़ासमोर ठेवून आपण निर्देशांकाची भविष्यकालीन वाटचाल रेखाटू या. आता चालू असलेल्या सुधारणेत – तेजीत निफ्टी निर्देशांकाने १७,२००चा स्तर पार तर केला आहे! पण या स्तरावर निफ्टी निर्देशांक आठ दिवस टिकणे नितांत गरजेचे आहे. असे घडल्यास निफ्टी निर्देशांकाचे वरचे लक्ष्य हे १७,४५० ते १७,५०० असेल. या कालावधीत निफ्टी निर्देशांकाने  सातत्याने १७,०००चा स्तर राखल्यास १७,७०० ते १८,१०० हे वरचे लक्ष्य असेल. ही नाण्याची एक बाजू झाली. येणाऱ्या दिवसांत निफ्टी निर्देशांक १७,२००चा स्तर राखण्यास वारंवार अपयशी ठरल्यास निफ्टी निर्देशांक पुन्हा १६,८०० ते १६,६०० पर्यंत खाली घसरू शकतो.

येणाऱ्या पंधरवडय़ात निफ्टी निर्देशांकाने १६,६०० ते १७,२०० या स्तरांमध्ये पायाभरणी केल्यास निफ्टी निर्देशांक ३०० अंशांचा फेर धरत १६,६०० अधिक ३०० अंश १६,९००, १७,२००, १७,५००, १७,८००, १८,१०० अशी निफ्टी निर्देशांकाची ३०० अंशांच्या परिघातील परिक्रमा असेल.

‘महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर’ या संकल्पनेची चिकित्सा

एखादी व्यक्ती यशाच्या, कीर्तीच्या, सत्तेच्या शिखरावर असताना, लोक त्या व्यक्तीला ओळखत असतात. त्या व्यक्तीशी सलगी वाढवण्याचा प्रयत्न करतात. पण एकदा का त्या व्यक्तीचे दिवस फिरले की ती व्यक्ती, सलगी वाढवणाऱ्या लोकांना ओळखायला लागते. हा सत्तेच्या सारीपाटावरील डाव प्रत्येक राजकीय व्यक्तीला माहीत असतो. तसेच काहीसे आमच्या भांडवली बाजाराबद्दल आहे. तेजीच्या दिवसांत समभागांचे किमती स्वरूपातील उच्च शिखर प्रत्येकाला साद घालत असतात. पण मध्येच भीषण मंदी व त्यात समभागाच्या किमतींचा डोलारा ज्यावर उभा आहे ते तिमाही वित्तीय निकाल याच भीषण मंदीच्या दरम्यान जाहीर झाले तर? तर मग ‘आकाश फाटलं तर ठिगळ कुठे कुठे लावायची’ या सबबीच्या आड लपायला हरकत नाही. पण हीच बिकट परिस्थिती आव्हानात्मक मानून प्रयत्नांची परकाष्टा करत, या बिकट परिस्थितीतून गुणवत्तेच्या निकषावर ‘तावून सुलाखून’ निघाल्यास ते शंभर नंबरी सोनेरी समभाग ठरतात. या निकषावर आपण टाटा एलेक्सी समभागाचा आढावा घेऊ या.

या स्तंभातील १७ जानेवारीच्या लेखात ‘टाटा एलेक्सी लिमिटेड’ समभागाचे निकालपूर्व विश्लेषण केलेले. त्या समयी शुक्रवार, १४ जानेवारीचा बंद भाव ६,३१४ रुपये होता, तर वित्तीय निकालानंतरचा ‘महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर’ हा ५,९५० रुपये होता. टाटा एलेक्सी लिमिटेड समभागाचा निकाल उत्कृष्ट असल्यास, निकालापश्चात टाटा एलेक्सी ५,९५० रुपयांचा ‘महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर’ राखत ७,५०० रुपयांचे वरचे लक्ष्य नमूद केलेले. या मंदीच्या दाहकतेत टाटा एलेक्सी समभागाने ५,९५० रुपयांचा महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर राखत मंगळवारी, १ फेब्रुवारीला ७,९६४ रुपयांचा उच्चांक नोंदवत, ७५०० रुपयांचे लेखात नमूद केलेले वरचे लक्ष्य साध्य केले. त्या दिवशीचा बंद भाव ७,४६४ रुपये होता.

निकालापश्चात वाचकांचा समभाग महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर राखत असल्यास, दीर्घ मुदतीच्या गुंतवणूकदारांनी आपला समभाग निश्चितपणे राखून ठेवावा. निकालापश्चात ज्यांनी टाटा एलेक्सी लिमिटेड समभागाची खरेदी केली अशा अल्पमुदतीच्या गुंतवणूकदारांनादेखील अल्पावधीत १८ टक्क्यांचा (रु. ७,५००- ६,३१४ = रु. १,१८६ नफा) परतावा मिळाला. टाटा एलेक्सी लिमिटेड समभागाचा १७ मार्चचा बंद भाव ७,४६८ रुपये आहे. टाटा एलेक्सी लिमिटेडच्या निकालपूर्व विश्लेषणात ७,५०० रुपयांचे वरचे लक्ष्य नमूद केलेले आणि सरलेल्या सप्ताहातील गुरुवारचा बंद भाव हा या लक्ष्यासमीपच आहे. मंदीच्या दाहक परिस्थितीत गुणवत्तेच्या निकषावर ‘तावून सुलाखून’ येत टाटा एलेक्सी लिमिटेड हा दुसरा शंभरी नंबरी सोनेरी समभाग ठरला आहे.

लेखक भांडवली बाजार विश्लेषक,

ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’, इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.