आशीष ठाकूर

कर्जावरील वाढते व्याजदर, इंधनाचे चढे दर, त्यात रशिया-युक्रेन समस्येमुळे इंधन दुष्काळामुळे खंक होत चाललेली युरोपीय अर्थव्यवस्था, श्रीलंका, पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठयावर या सर्व समस्येमुळे अर्थचक्राची मंदावणारी गती या सर्व आंतरराष्ट्रीय समस्यांचा ताण एका बाजूला आहेच. तर दुसरीकडे आपल्याकडे अर्थव्यवस्थेच्या गतीबाबत अनिश्चितता आहे. आपल्या अर्थव्यवस्थेची दिशा मापण्यासाठी आपण वाहन उद्योग क्षेत्राचा (व्हील ऑफ इकॉनॉमी) आधार घेतो. कारण अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा भागविल्यानंतर आपण दुचाकी, चारचाकीचा विचार करतो. या क्षेत्रांनी शारदीय नवरात्रोत्सवात जी काही तडाखेबंद विक्री केली ती डोळे दिपवणारी होती. जसे की प्रवासी गाडय़ांची विक्री ही या वर्षी दहा वर्षांतील उच्चांकावर असून, बहुचर्चित श्रेणींच्या गाडय़ांची प्रतीक्षा यादी वर्षभराची आहे. तर दुचाकी, चारचाकी, ट्रक, ट्रॅक्टर या वाहन उद्योगातील विविध प्रकारांमध्ये गेल्या वर्षांच्या तुलनेत ५० टक्क्यांची विक्रीतील वाढीचा दर नोंदविला गेला आहे. तर राजकोट शहरात दसऱ्याच्या फक्त एका दिवशी फाफडा-जिलेबीची दोन कोटी रुपयांची विक्री झाली. अशा गोड, मधाळ वातावरणाच्या शीतल चांदण्यात आम्ही न्हाऊन निघत आहोत तर अमेरिका-युरोप आर्थिक दुष्टचक्राच्या उन्हांत भाजून निघत आहे. या पार्श्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या.  

गेल्या लेखात नमूद केल्याप्रमाणे, निफ्टी निर्देशांकावर १६,८०० ते १७,२०० या ४०० अंशांच्या परिघात पायाभरणी होणे आताच्या घडीला नितांत गरजेचे आहे. तरच निफ्टी निर्देशांकावर १७,६०० ते १७,८०० चे वरचे लक्ष्य दृष्टीपथात येईल. अजूनही आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिका-युरोपमधील आर्थिक निराशाजनक वातावरण तसेच आपल्याकडील डॉलर-रुपया चलन विनिमय दरात, सशक्त डॉलरम्च्या तुलनेत रुपयाचा कमकुवतपणा चिंताजनक स्तरावर आहे. ही गोष्ट आपल्या परकीय चलन गंगाजळी आणि आयातीसाठी डोकेदुखीची ठरत आहे. अशा सर्व निराशाजनक घटनांमध्येदेखील निफ्टी निर्देशांक सातत्याने १७,००० चा स्तर राखत असल्यास, पैशाच्या पाठबळावरील ही तेजीची चाल असून निफ्टी निर्देशांकाचे वरचे लक्ष्य १७,६०० – १७,८०० ते १८,००० असे असेल. वरील मळभ दाटलेल्या आर्थिक वातावरणांत, निफ्टी निर्देशांक १७,००० चा स्तर राखण्यास अपयशी ठरल्यास १६,८०० ते १६,६०० च्या खालच्या लक्ष्याची आर्थिक, मानसिक तयारी मात्र गुंतवणूकदारांनी ठेवावी.

      निकालपूर्व  विश्लेषण

१) टीसीएस लिमिटेड  

तिमाही वित्तीय निकाल – सोमवार, १० ऑक्टोबर    

७ ऑक्टोबरचा बंद भाव – ३,०६४.९० रु. 

निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – ३,२०० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ३,२०० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ३,४०० रुपये, द्वितीय लक्ष्य ३,६०० रुपये.

ब)निराशादायक निकाल : ३,२०० रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत, २,९०० रुपयांपर्यंत घसरण.

२)  आनंद राठी वेल्थ लिमिटेड

तिमाही वित्तीय निकाल- गुरुवार, १३ ऑक्टोबर   

७ ऑक्टोबरचा बंद भाव- ६६४.६५ रु. 

निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – ६५० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ६५० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ६९० रुपये, द्वितीय लक्ष्य ७२० रुपये.

ब)निराशादायक निकाल : ६५० रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत ६०० रुपयांपर्यंत घसरण.

३) एंजल वन लिमिटेड  

तिमाही वित्तीय निकाल – गुरुवार, १३ ऑक्टोबर       

७ ऑक्टोबरचा बंद भाव – १,५२६.९५ रु. 

निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – १,४५० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून १,४५० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १,७०० रुपये, द्वितीय लक्ष्य १,९०० रुपये.

ब) निराशादायक निकाल : १,४५० रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत १,३५० रुपयांपर्यंत घसरण.

४) इन्फोसिस लिमिटेड  

तिमाही वित्तीय निकाल – गुरुवार, १३ ऑक्टोबर    

७ ऑक्टोबरचा बंद भाव – ३,०६४.९० रु. 

निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – १,३५० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून १,३५० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १,६०० रुपये, द्वितीय लक्ष्य १,८०० रुपये.

ब)निराशादायक निकाल : १,३५० रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत १,२५० रुपयांपर्यंत घसरण.

५)  टाटा ऐलेक्सी लिमिटेड

तिमाही वित्तीय निकाल- शुक्रवार,१४ ऑक्टोबर   

७ ऑक्टोबरचा बंद भाव- ८,५५०.०५ रु. 

निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – ७,८०० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ७,८०० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ९,०५० रुपये, द्वितीय लक्ष्य १०,६०० रुपये.

ब)निराशादायक निकाल : ७,८०० रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत ७,००० रुपयांपर्यंत घसरण.

शुक्रवारचा बंद भाव :

सेन्सेक्स : ५८,१९१.२९

निफ्टी : १७,३१४.६५

अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’, इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

लेखक भांडवली बाजार विश्लेषक

ashishthakur1966@gmail.com