अजय वाळिंबे
ग्रीनपॅनेल इंडस्ट्रीज लिमिटेड ही कंपनी म्हणजे ग्रीनप्लाय इंडस्ट्रीज लिमिटेडचा पूर्वीचा एक स्वतंत्र विभाग होता. २०१८ मध्ये ग्रीनप्लाय कंपनीचे विलीनीकरण ग्रीनपॅनेल इंडस्ट्रीज या स्वतंत्र कंपनीत करण्यात आले. कंपनी मुख्यत्वे मध्यम प्लायवूड आणि मध्यम घनता फायबर बोर्ड म्हणजेच एमडीएफचे उत्पादन, वितरण आणि विपणन करते. ग्रीनप्लायच्या प्रत्येक भागधारकाला डिमर्जरवर १:१ प्रमाणात ग्रीनपॅनेलचे समभाग मिळाले होते. कंपनीच्या उत्पादन पोर्टफोलिओमध्ये एमडीएफव्यतिरिक्त डेकोरेटिव्ह लाकडी मजले, प्लायवूड, लिबास, फ्लोरिंग आणि दरवाजे यांचा समावेश होतो.
कंपनीच्या महसुलात बोर्ड आणि संबंधित उत्पादने ८७ टक्के तर प्लायवूड विभागाचा १३ टक्के महसूल आहे. ग्रीनप्लाय भारतातील एमडीएफ बोर्डाची सर्वात मोठी उत्पादक असून आशियातील तिसरी सर्वात मोठी आणि जगातील पाचवी मोठी उत्पादक कंपनी आहे. एमडीएफ कंपनीचा देशांतर्गत बाजार हिस्सा २९ टक्के आहे. कंपनीचा एमडीएफ व्यवसाय २०१० पासून चालू असून ग्रीनप्लाय भारतातील सर्वात जुनी आणि अनुभवी एमडीएफ उत्पादक आहे. कंपनी संपूर्ण देशभरात २,५३५ वितरक आणि १२,५०० हून अधिक किरकोळ विक्रेत्यांसह कार्यरत आहे. कंपनीच्या भारतातील १७ शाखांद्वारे उत्पादन सेवा दिली जाते.

सध्या, उत्तराखंड आणि आंध्र प्रदेशमध्ये वार्षिक ५,८८,००० क्युबिक मीटर्स क्षमतेसह तीन अद्ययावत उत्पादन सुविधा आहेत. कंपनीची प्लायवूड उत्पादनाची वार्षिक क्षमता ११ दशलक्ष चौ. मीटर आहे. पहिल्या तिमाहीत कंपनीचा एमडीएफ आणि प्लायवूड या दोन्ही विभागांसाठी क्षमता वापर अनुक्रमे ८१ टक्के आणि ९० टक्के होता. यंदाच्या आर्थिक वर्षांत एमडीएफ विभागाची क्षमता ६,६०,००० क्युबिक मीटर्सपर्यंत वाढवण्याचे कंपनीचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे.

fssai to examine mdh and everest spices banned recently in singapore and hong kong
मसाल्यावरील बंदीच्या  सिंगापूर, हाँगकाँगच्या निर्णयाची तपासणी; एफएसएसएआय, मसाला मंडळाचे पाऊल
Portfolio, Stock Market, knr constructions Limited Company, knr constructions Limited share, share market, road construction, bridge construction, construction of irrigation projects, Hybrid Annuity Model, BOT,EPC, knr road construction, knr constructions company share,
माझा पोर्टफोलिओ – कामगिरी उजवी, ताळेबंदही सशक्त! केएनआर कन्स्ट्रकशन लिमिटेड
Yamaha introduces vibrant new color options across the MT15 V2 Fascino and Ray ZR portfolios Know Features And price
ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह यामाहा इंडियाने ‘या’ दुचाकींना केलं उपडेट; पाहा कलर ऑप्शन…
Job Opportunity Recruitment of Junior Engineer
नोकरीची संधी: ज्युनियर इंजिनीअरची भरती

कंपनीने जून २०२२ अखेर संपलेल्या पहिल्या तिमाहीसाठी उत्तम कामगिरी करून दाखवली आहे. गेल्या आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत कंपनीने उलाढालीत ५३ टक्के वाढ साध्य केली आहे. उलाढाल आता ४६४ कोटी रुपयांवर पोहोचली आहे, तर नक्त नफ्यात तब्बल १६१ टक्क्यांनी वाढ होऊन तो ७७.६० कोटी रुपयांवर गेला आहे. उत्पादनांची वाढती मागणी पाहता कंपनी आपली उत्पादन क्षमता वाढवत आहे, तसेच होणाऱ्या नफ्यातून आपला कर्जभार कमी करत आहे. जागतिक बाजारपेठेत तुलनेत भारतीय बाजारात एमडीएफ वापराचे प्रमाण अजूनही खूप कमी आहे. यामुळे देशांतर्गत कंपनीच्या उत्पादनांना मागणी आणि निर्यातीतदेखील दमदार वाढ अपेक्षित आहे. सध्या ४३५ रुपयांच्या आसपास असलेला हा समभाग दोन ते तीन वर्षांत उत्तम परतावा देऊ शकेल.

सध्याची बाजारातील अनिश्चितता पाहता हा शेअर सुचविलेल्या किमतीपेक्षा कमी भावात मिळू शकतो, म्हणून प्रत्येक मंदीत तसेच टप्प्याटप्प्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे.

ग्रीनपॅनल इंडस्ट्रीज लिमिटेड
(बीएसई कोड – ५४२८५७)
शुक्रवारचा बंद भाव : रु. ४३६/-
वर्षभरातील उच्चांक/ नीचांक : रु. ६२६/२४६

बाजार भांडवल : रु. ५,३४२ कोटी
भरणा झालेले भागभांडवल : रु. १२.२६ कोटी
शेअर होल्डिंग पॅटर्न (%)
प्रवर्तक ५३.१०
परदेशी गुंतवणूकदार ६.२७
बँका/ म्यु. फंड/ सरकार २१.४५
इतर/ जनता १९.१८

संक्षिप्त विवरण
शेअर गट : स्मॉल कॅप
प्रवर्तक : शिवप्रकाश मित्तल
व्यवसाय क्षेत्र : प्लायवूड/ एमडीएफ
पुस्तकी मूल्य : रु. ७७.६
दर्शनी मूल्य : रु. १/-
गतवर्षीचा लाभांश : १५०%

शेअर शिफारशीचे निकष
प्रति समभाग उत्पन्न : २३.५ रु.
पी/ई गुणोत्तर : १८.५
समग्र पी/ई गुणोत्तर : २६
डेट इक्विटी गुणोत्तर : ०.३३
इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर : ४७.८
रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड : २९.७
बीटा : ०.९

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यापेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.