मृत्यू कोणत्याही वयात कुणालाही येऊ शकतो हे रोज मृत्यूची दाहकता अनुभवत असलेल्या ‘गुरुजीं’इतके अन्य कुणास ठाऊक नसेल. म्हणूनच आपला दीड-दोन कोटीचा विमा असावा असे गुरुजींना वाटणेही स्वाभाविकच! आíथक सुबत्ता आहे, कुठलेही कर्ज नाही, मग कष्टाने कमावलेले धन उजळ माथ्याने मिरविण्याचे सुख हवे तर पुरेसे विमा संरक्षणही हवे, हे गुरुजींना पुरेपूर पटले आहे..
स्मशान असावे दोन हाकांवर मनाच्याही,
पावलांना सराव असावा त्याच्या सांगाताचा
विशेषत: सायंकाळी
वाचून घ्यावे दरवाज्याच्या कमानीवरचे
मृताच्या मिटल्या ओठांतले अमर सुभाषित
आज माका फाल्या तुका
चेतून पहाव्या गेलेल्या जीवलगांच्या
जिवंत झालेल्या जागल्या चिता
आणि स्वत:चीही
– बा. भ. बोरकर
आज पितृपंधरवडयातील शेवटचा दिवस. िहदू धर्मात या पंधरा दिवसांत पूर्वजांचे स्मरण या काळात करण्याची प्रथा आहे. पूर्वजांचे स्मरण या दिवशी करून त्यांच्या नावाने कावबळी काढला जातो. िहदूनी करावयाच्या सोळा संस्कारांपकी पहिले पाच मातापित्यांनी तर शेवटचा हा संस्कार पुत्राने करावयाचा असतो. हा सोळावा संस्कार, म्हणजे अंत्येष्टी व क्रियाकर्म करवून घेणारे गुरुजी म्हणजे ‘किरवंत’. लेखक प्रेमानंद गज्वी यांनी या किरवंताची वेदना आपल्या नाटकातून मांडली आहे. हे नाटक लिहिण्याआधी गज्वी यांना मुंबई येथील मालाडच्या स्मशानात क्रियाकर्म करणारे अशोक जोशी भेटले. अशाच एका ‘अशोक जोशीं’चे आजचे नियोजन. आपण ‘गुरुजीं’चे म्हणू. हे गुरुजी मुंबई महानगर परिक्षेत्रातील एका शहरात वास्तव्यास आहेत.
या गुरुजींच्या कुटुंबात ते स्वत: गुरुजी (४८) पत्नी (४२) व पुत्र (८) हे कुटुंबीय आहेत. गुरुजींचे वार्षकि उत्पन्न तसे ११-१२ लाख असले तरी गुरुजी स्वत:चे चार लाख व पत्नीचे दोन लाख उत्पन्न दाखविणारे प्राप्तिकर विवरण पत्र सादर करीत आहेत. साहजिकच दर वर्षी सहा ते सात लाखाचे उत्पन्न दडवीत आहेत. हे गुरुजी वार्षकि ७२ हजार विम्याचा हप्ता भरत असून सर्व विमा पॉलिसी मिळून आठ लाखांचे विमाछत्र आहे. या पॉलिसींची मुदतपूर्ती त्यांच्या वयाच्या ५० ते ५४ वर्षांदरम्यान होईल. आजपर्यंत गुरुजींनी आपली सर्व बचत बँकांच्या मुदत ठेवीत गुंतविली होती. मार्च २०१५ मध्ये झालेल्या या दोन भेटीत गुरुजींचे आíथक नियोजन त्यांना समजावून दिले व हे नियोजन पुढील तीन वर्षांत पूर्णत्वास न्यावे असा बेत निश्चित केला.
साधारण दीड लाखांपर्यंत कर वजावटीस पात्र साधनांत गुंतवणूक केल्यास (या वर्षी एनपीएस धरून दोन लाख) साडेचार लाखांपर्यंत उत्पन्नावर कर भरावा लागत नाही व सर्व उत्पन्न करमुक्त उत्पन्न म्हणून प्राप्तिकर विवरण पत्रात दाखविता येते. २०-२२ लाख उत्पन्न असलेले अनेक वैद्यकीय व्यावसायिक आपले खरे उत्पन्न दडवतात व साडेचार पाच लाखांदरम्यान दाखवतात. गुरुजींना सनदी लेखापालाने देखील असाच सल्ला दिल्याने गुरुजी निम्मेच उत्पन्न दाखवत होते. गुरुजींना त्यांची कर कार्यक्षमता वाढविणारे गुंतवणूक पर्याय सुचवून त्यांनी तीन वर्षांनी आठ लाख पर्यंत आयकर विवरण पत्र दखल करावे असा सल्ला दिला. यादृष्टीने या वर्षांपासून सुरुवात केली. आíथक वर्ष २०१५ साठी साडेपाच लाखांचे कर विवरण पत्र दखल केले. पुढील तीन वष्रे यात टप्याटप्याने वाढ केली जाईल. आजपर्यंत गुरुजींनी कधी प्राप्तिकराचा अग्रिम कर भरणा केला नव्हता. या वर्षी गुरुजींनी १५ जून व १५ सप्टेंबर या दिवशी अनुक्रमे पाच हजार व नऊ हजार कर भरला असून संपूर्ण आíथक वर्षांत २५ हजारांदरम्यान गुरुजी कर भरतील.
गुरुजी घरातील कत्रे असल्याने व आíथक उत्पन्न ही चांगले असल्याने गुरुजींना पुरेसा विमा असणे गरजेचे आहे. वाढते वय, तंबाखूजन्य पदार्थ चघळत राहण्याची सवय, पुरेशी झोप न मिळणे, व सर्वात महत्वाचे म्हणजे पोरवयाचा मुलगा याचा विचार करून गुरुजींना मोठय़ा रकमेचा विमा खरेदी करण्याचा सल्ला दिला. विमा खरेदीचा सल्ला दिल्यावर ‘मला काय धाड भरली आहे’ असा प्रतिप्रश्न अशील करतात. गुरुजी रोज मृत्यूची दाहकता अनुभवत असल्याने व वेगवेगळ्या वयाच्या व्यक्तींची अंत्येष्टी करीत असल्याने मृत्यू कोणत्याही वयात कुणालाही येऊ शकतो हे गुरुजींना चांगलेच पटले. आपला दीड दोन कोटीचा विमा असावा असे गुरुजींना वाटले. सध्या गुरुजींना पन्नास लाखा पर्यंतचाच विमा मिळणार असल्याने गुरुजींचा पन्नास लाखाचा विमा काढला. पुढील दोन वर्षांनी अधिक उत्पनाचे विवरण पत्र सादर केल्याने दीड कोटीपर्यंतचा मुदतीचा विमा मिळू शकेल. आíथक वर्ष २०१८चे प्राप्तिकर विवरण पत्र सादर केल्यानंतर जून-जुल २०१८ मध्ये आणखी एक विम्याची एक कोटीची पॉलिसी गुरुजी घेतील. पहिल्या पॉलीसीची मुदत १७ वष्रे तर दुसऱ्या पॉलीसीची मुदत १५ वष्रे प्रस्तावित असून जेणेकरून या दोन्ही पॉलिसींची मुदत गुरुजींचा मुलगा  २६-२७ वर्षांचा होईपर्यंत कुटुंबाला विमा संरक्षण मिळेल.
गुरुजींकडे आíथक सुबत्ता असून त्यांच्यावर कुठलेही कर्ज नाही. बँकांमध्ये गुरुजींच्या एकूण सहा लाखांच्या मुदत ठेवी आहेत. गुरुजींची मुलगा अभ्यासात हुशार असून मेहनती आहे. या मुलाने हवे तेवढे शिक्षण घेऊन उच्च शिक्षाविभूषित व्हावे असे गुरुजींना वाटते. सध्या गुरुजी केवळ कर बचतीसाठी विम्याच्या हप्त्याचा वापर करीत आहेत. सरलेल्या एप्रिल महिन्यात गुरुजी व त्यांच्या पत्नीने पीपीएफ खाते उघडले असून दोघेही त्यात प्रत्येकी एक लाख जमा करणार आहेत. या व्यतिरिक्त गुरुजींनी एका ईएलएसएस फंडात १,००० रुपयांची एसआयपी सुरू केली आहे. गुरुजींनी चार म्युच्युअल फंडात दहा हजाराच्या व पत्नीने तीन हजाराच्या एसआयपी सुरू केल्या आहेत. ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात बाजार ढेपाळला असताना गुरुजींनी एक लाख एकरकमी एका म्युच्युअल फंडात गुंतविले. गुरुजींनी चार वष्रे एसआयपी अशाच सुरु ठेवल्या तर एक मोठी रक्कम हाताला लागेल हा त्या मागचा विचार आहे.
जमलेल्या रोकडीचा उपयोग व्हावा म्हणून गुरुजींनी त्यांच्याच शहरात दोन सदानिका विकत घेण्यासाठी एका ओळखीच्या विकासकाला बयाणा रक्कम दिली आहे. हा प्रकल्प रखडल्याने या सदनिकांचा ताबा मिळण्यास विलंब होत आहे. या सदनिकांचा वेळेत ताबा मिळेल या विषयी गुरुजी साशंक आहेत. शिवाय रोकडीचा व्यवहार केल्याने रक्कम परत मिळण्याबाबतही ते साशंक आहेत. जर गुरुजींकडे पुरेसे कायदेशीर रक्कम (पांढरे धन) असती तर हे टाळता आले असते. वयाच्या अठराव्या वर्षांपासून ते कष्ट करीत आहेत. कधी कधी एकाच दिवशी सहा-सात मृतदेहांवर अंतिम संस्कार करून घ्यावे लागतात. एक वेळ सत्यनारायणाची पूजा ठरवायला आलेल्या यजमानाला नकार देता येतो, परंतु अंत्येष्टीसाठी आलेल्याला नकार देता येत नाही. यमदूत सणावारीसुद्धा आपले काम चोख बजावतात. म्हणून ‘स्मशान असावे दोन हाकांवर’ असे वाटले तर त्यात गर नव्हे. कष्टाने कमावलेले धन उजळ माथ्याने मिरविण्यासारखे सुख नाही. परंतु हे धन मिरवायचे तर त्यासाठी योग्य बचतीची व कर नियोजनाची आवश्यकता आहे. गुरुजी जरी पारंपारिक व्यवसायात असले तरी त्यांना वित्तीय नियोजनात आधुनिकतेची कास धरावी असे वाटले व थोडा अधिक कर देण्यास ते राजी झाले हे त्यांचे वेगळेपण.
‘अंडर टेकर’च्या पाटय़ा मुंबईत ख्रिश्चन लोकांची वस्ती असलेल्या ठिकाणी पाहावयास मिळतात. ‘अंडर टेकर’ म्हणजे अंत्ययात्रेचा इव्हेन्ट मॅनेजर. मागील आठवडय़ाच्या ‘लोकप्रभे’त िहदू धर्मियांना या प्रकारची सेवा देणारी कंपनी मुंबईत सुरू झाली असल्याची बातमी वाचली. आजच्या ‘इव्हेन्ट’च्या जमान्यात किमान १०,७०० रु. भरून मृत्यूनंतर आपल्या देहावर अंत्यसंस्कार करण्याची सेवा आपल्याला जिवंत असतानाच विकत घेता येते. ज्यांच्या आपल्या मृत्यूचा इव्हेन्ट करण्याची इच्छा आहे त्यांना जास्त पसे भरून यामधील ‘प्रीमियम सíव्हस’ विकत घेण्याची सोय या कंपनीने दिली आहे. पूर्वी वैऱ्याचे मरण झाले तरी त्याच्या अंत्ययात्रेला मंडळी जात असत. अंत्यसंस्काराचे सामान आणण्यापासून तिरडी बांधण्यापर्यंत कामात सहभागी होत असत. बदलत्या काळात हे घडत नाही एखाद्याचा मृत्यू झाल्याचे कळल्यावर अंत्ययात्रेमुळे आपले ठरलेले कार्यक्रम रद्द करावे लागतील म्हणून ते टाळण्याकडेच कल असतो. ‘सुखान्त’चा जन्म झाला तो लोकांच्या या मानसिकतेतून बदलत्या काळात गुरुजींनीही बदलावे व ‘कॉर्पोरेट कल्चर’ आत्मसात करावे, असे स्वाभाविकच वाटले. येत्या दोन तीन वर्षांत या गुरुजींनी कोऱ्या करकरीत चारचाकी वाहनातून अंत्यसंस्कारास जावे इतपत तयारी या नियोजनातून निश्चितच होणार आहे. मारुती चालवत अंत्यसंस्कारासाठी आलेले गुरुजी कोणास पाहावयास मिळाले तर ते म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून आज ज्यांचे नियोजन लिहिले तेच ते गुरुजी समजण्यास हरकत नाही. ‘‘हा व्यवसाय अमाप पसा देतो पण मिळविलेला पसा प्रतिष्ठा देत नाही’ या ‘किरवंत’च्या प्रस्तावनेतील वाक्याची आठवण ठेऊन कष्टाने कमावलेल्या पशाला सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देण्याचा हा एक अल्पसा प्रयत्न. त्यासाठी आजच्या नियोजनापेक्षा चांगला मुहूर्त सापडला नसता हे निश्चित.
shreeyachebaba@gmail.com

Venus And Sun Yuti
हनुमान जयंतीनंतर ‘या’ राशी होणार गडगंज श्रीमंत? अनेक वर्षांनी ‘शुक्रादित्य राजयोग’ घडल्याने मिळू शकते व्यवसायात मोठे यश
Nagpur MIDC police arrested the youth who molested the girl crime news
विवाहितेच्या अंगावर चिठ्ठी फेकली, पुढे झाले असे की…
mukhtar ansari umar ansari
“कट रचून विषप्रयोग केला”, मुख्तार अन्सारीच्या मुलाचे गंभीर आरोप; म्हणाला “तीन दिवसांपूर्वी त्यांनी…”
Shukra Transit: 31 March Malavya Rajyog In Meen Rashi
३१ मार्चपासून मालव्य राजयोग बनल्याने ‘या’ राही कमावतील प्रेम, पैसे व प्रतिष्ठा; धनलक्ष्मीच्या आवडत्या राशी कोणत्या पाहा?