niyojan2नमस्कार,
मी पाच वष्रे वयाच्या एका मुलीची ‘सिंगल मदर’ असून माझ्यावर कुठलेही कर्ज नाही. मी आईवडिलांसोबत रहात असल्याने माझ्या एकटीच्या पगारात देखील आमच्या दोघांचा खर्च वजा जाता पन्नास हजार सहज बचत करू शकते. या बचतीचे मुलीच्या उच्च शिक्षणासाठी नियोजन कसे असावे जेणे करून उच्च शिक्षण घेताना तिला तडजोड करावी लागणार नाही.
धन्यवाद
अ. ब. क.
आíथक नियोजनासाठी मार्गदर्शन करण्याची विनंती करणाऱ्या अनेक मेलपकी आलेली ही मेल आज ‘नियोजन भान’ साठी निवडली. निवडीमागचे प्रमुख कारण ही मेल पाठविणारी व्यक्ती उच्चशिक्षित आहे. िपपरी येथील एका बहुराष्ट्रीय अभियांत्रिकी कंपनीत सहाय्यक कंपनी सचिव व वरिष्ठ व्यवस्थापक, कायदा या पदावर कार्यरत आणि या व्यक्तीचे शिक्षण बी.कॉम, कंपनी सेक्रेटरी, एलएलबी झाले आहे. या कंपनीत त्यांची दहा वर्षांची नोकरी झाली आहे. कायदा व वित्त क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी सहसा आपल्या आíथक नियोजनविषयक गरजांसाठी व्यावसायिक वित्तीय नियोजकांकडे जात नाहीत. स्वत:च्या गुंतवणूकविषयक ज्ञानावर विश्वास ठेऊन चुकीचे निर्णय घेतात. व चुकलेल्या निर्णयाचे पुढील आयुष्यभर समर्थन करतात. तसेच त्या सदाशिव पेठेच्या निवासी असूनही या पारंपारिक मतांना बदलण्यास त्यांची अनुकूलता तसेच विविध गुंतवणूक पर्याय स्वीकारण्यास लवचिकता होती.
लहानपणापासून आपल्या आईवडीलांकडून आपल्या मनावर हे िबबविण्यात आले आहे की मुलांचे शिक्षण (शिक्षणासाठीचा खर्च) ही आईवडिलांची सर्वोच्च प्राथमिकता असते. त्यासाठी त्यांनी आपल्या अनेक गरजा दूर केलेल्या असतात. याच भावनेतून अव्वल शाळा चांगले प्राध्यापक असलेले महाविद्यालय आपल्या पाल्यांना मिळावे यासाठी पालक प्रयत्नशील असतात. परंतु हे शिक्षण ज्या बचतीच्या जोरावर पूर्ण होणार असते त्या बचतीच्या नियोजनासाठी व्यावसायिक नियोजकाकडे न जाता  कोणी गेलाबाजार विमा विक्रेता, ज्याला गुंतवणुकीची मूलतत्वे सुद्धा ठाऊक नाहीत त्याने दिलेल्या सल्ल्यावर विसंबून आपल्या बचतीचे ते नियोजन करतात. आपले नियोजन चुकले हे ज्यावेळी उच्च शिक्षणासाठी पशाची जुळवाजुळव करताना आपली बचत अपुरी आहे लक्षात आल्यावरच कळते. पण तेव्हा वेळ गेलेली असते.
av-05av-06

अर्थविषयक वार्ताकन करणाऱ्या एका नियतकालिकाने मागे भारतीयांच्या बचत व गुंतवणूक सवयींचा प्रसिद्ध केलेला एक अहवाल नुकताच वाचनात आला. वय वष्रे ३० ते ५० या वयोगटातील देशातील ४५ शहरातून तीन हजाराहून अधिक गुंतवणूकदारांचे सर्वेक्षण करून या अहवालाने निष्कर्ष काढले आहेत. या सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपकी ७७ टक्के गुंतवणूकदार अर्थसाक्षरतेत काठावर देखील पास होतील अशी परिस्थिती नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. भारतीयांच्या मनावर आयुर्विमा म्हणजे बचत हे पक्के ठसलेले आहे. विम्यावरील परतावा महागाईच्या दरापेक्षा कमी असून आपण ज्याला बचत समजतो ती बचत नसून आपल्या मालमत्तेचे मूल्य दर वर्षी दोन ते चार टक्के गमावणे आहे हे या गुंतवणूकदारांच्या गावीही नसते. या अहवालातील निष्कर्षांशी एका अर्थनियोजकाने सहमत व्हावे असेच आहेत. म्हणूनच पत्रलेखिकेचे अभिनंदन करावेसे वाटले. एक स्त्री असूनही सोने, स्थावर मालमत्ता ही पठडीतील गुंतवणूक साधने न वापरता अन्य गोष्टींचा विचार त्यांना करावासा वाटतो हे कौतुकास्पद आहे.
पत्रलेखिकेने आपल्या नियोजनाची सुरुवात मुदतीच्या विम्याने करणे योग्य ठरेल. त्यांचे सध्याचे उत्पन्न लक्षात घेता त्यांना तीन कोटींचा विमा सहज मिळेल असा विचार करून विम्याचा वार्षकि हप्ता स्थिर असलेला परंतु दरवर्षी विमाछत्रात वाढ होणारा असा चाकोरीबाहेरचा एक पर्याय सुचविला. पत्रलेखिकेने या प्रकारच्या विम्याचे सादरीकरण (Policy  Illustration) दोन कंपन्यांकडून मागविले. दोन्ही विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींनी पत्रलेखिकेशी संपर्क साधून आपापल्या विम्याबाबत शंकांचे निरसन केले. पत्रलेखिकेने सुरुवातीला दोन कोटी विमा छत्र असलेली व २८ वर्षांच्या शेवटी ४.७० कोटी विमाछत्र मिळणारी पॉलिसी खरेदी करण्याचा निर्णय घेतला. या विमा कंपनीचा क्लेम सेटलमेंट रेशो व रिटेन्शन रेशो विमा नियामक प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर पडताळून पाहिला व तो समाधानकारक वाटल्याने या विमा कंपनीची त्यांनी निवड केली.
पत्रलेखिका कंपनीच्या समूह आरोग्य विमा योजनेच्या सभासद असल्याने स्वत: त्यांना व आईवडील यांना या योजनेतून पाच लाखाचे आरोग्य विमाछत्र लाभले आहे. या योजनेत काही वैद्यकीय चाचण्यांच्या खर्चाचा समावेश नसल्याने व पत्र लेखिकेची कौटुंबिक व आíथक पाश्र्वभूमी लक्षात घेऊन मॅक्स बुपाची १० लाखांपर्यंत आरोग्य विमाछत्र देणारी पॉलिसी खरेदी करण्याचा सल्ला दिला. कारण या पॉलिसीच्या शर्थीत आजारपणातील वैद्यकीय सहाय्यकाच्या खर्चाचा समावेश असल्याने ही पॉलिसी आवश्यक वाटते.
पत्रलेखिकेची मुलगी पाच वर्षांची असल्याने पुढील १२ वष्रे पत्रलेखिकेस बचतीच्या वापराची आवश्यकता भासणार नाही. समभाग गुंतवणुकीचे महत्व पत्रलेखिकेस पटले असल्याने समभाग गुंतवणुकीसाठी पीएमएस किंवा समभाग गुंतवणूक करणारे म्युच्युअल फंड असे दोन विकल्प उपलब्ध होते. पत्रलेखिकेने दुसऱ्या विकल्पाची निवड केली. ही निवड निश्चित केल्यानंतर म्युच्युअल फंड गुंतवणुकीचा ढाचा पुढीलप्रमाणे असावा हे ठरले.
९      एकूण गुंतवणुकीपकी २० टक्के गुंतवणूक पोर्टफोलिओला स्थर्य देणारी असावी.
९      उर्वरित बचतीसाठी ५० टक्के लार्जकॅप व ३० टक्के मिडकॅप  योजना असाव्यात गुंतवणुकीचा कालावधी दीर्घ असल्याने प्रत्येक फंड गटातील आक्रमक धोरण असलेल्या (Aggressive) योजनांचा समावेश असावा.
९      एखाद्या सुरू असलेल्या गुंतवणूक योजनेचा परताव्याचा दर समाधानकारक नसल्यास एसआयपी लगेच बंद न करता निदान दोन वष्रे वाट पाहावी.
९      वर्षांतून एकदा गुंतवणुकीचा आढावा घ्यावा.
हे निकष ठरल्यावर प्रत्यक्ष फंड निवडीसाठी व्हॅल्यू एक्सप्रेस या म्युच्युअल फंड विषयक संगणक प्रणालीला निवडीच्या अटीचे (Constrains) पालन करून फंडांची नावे मागितली असता खालील फंड समोर आले. (खालील चौकट पाहावी)
या फंडातून पाच फंड निवडून त्यात वर उल्लेख केल्या प्रमाणात गुंतवणूक करावी. ज्या वर्षी पशाची आवश्यकता भासेल त्या आधी दोन वष्रे समभाग गुंतवणूक करणारया फंडातून रोखे गुंतवणूक करणारया फंडात (शॉर्ट टर्म फंडात) रक्कम वळविण्यास विसरू नये असे न केल्यास संपूर्ण नियोजन वाया जाण्याची शक्यता आहे.
shreeyachebaba@gmail.com