समीर नेसरीकर sameernesarikar@gmail.com

(म्युच्युअल फंड आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या आर्थिक संज्ञा, संकल्पना आणि पद्धतींचा धांडोळा घेणारे पाक्षिक सदर)

multi asset portfolio, investment, shares, stocks, mutual fund, commodity market, gold, expensive paintings, crypto currency, finance article
मार्ग सुबत्तेचा : मल्टिअ‍ॅसेट पोर्टफोलिओ – काय, का आणि कसा?
Loksatta vasturang Lessons from redevelopment buildings Layout of flats
पुनर्विकासाचे धडे : कौटुंबिक अवकाश जपू या!
what is the right way to wash and store grapes
द्राक्षांवरील जंतू कसे घालवायचे? ‘व्हिनेगर अन् सोडा’ खरंच ठरतो उपयोगी? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत…
Girl Riding Hands Free Scooter On Road
ताई जरा सांभाळून! हात सोडून दुचाकी चालवतेय तरुणी, व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले

देशाच्या स्वातंत्र्याला या वर्षी ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. इतक्या प्रदीर्घ वाटचालीतून अनेक सामाजिक स्थित्यंतरे अनुभवत आपण सर्व एक देश म्हणून विकसित होत आहोत. जसे अनेक सामाजिक बदल आपण स्वीकारले आहेत तसेच अनेक आर्थिक घडामोडींचे साक्षीदार आपण आहोत. ज्या देशात जगातील साधारण एक षष्टांश माणसे राहतात त्या देशाचा कारभार चालविणे हे एक अग्निदिव्य आहे. भारत आज अशा एका वाटेवर उभा आहे, की ज्याला जगाशीही स्पर्धा करायची आहे आणि देशातल्या वेगवेगळय़ा स्तरातल्या लोकांनाही आनंदी ठेवायचे आहे. सोने गहाण ठेवण्याच्या १९९१ मध्ये घेतलेल्या निर्णयापासून सुरुवात करून आज परकीय चलनाच्या साठय़ामध्ये जगात चौथ्या क्रमांकावर आपण आहोत. विकसनशील देशाकडून विकसित देशाकडे जाताना गुंतवणूकदार म्हणून अनेक संधी उपलब्ध आहेत. यापुढील आर्थिक वाटचाल ही बिग डेटा, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, आयओटीसोबत असणार आहे. भारतीय मानसिकता हळूहळू का होईना परंपरागत गुंतवणुकीच्या साधनांच्या पलीकडे पाहत आहे हे सुखावह आहे. भांडवली बाजार, म्युच्युअल फंड हे शब्द आता घराघरांत पोहोचत आहे. गेल्या काळात भांडवली बाजार नियंत्रक सेबी आणि रिझव्‍‌र्ह बँक यांनी वेळोवेळी जे निर्णय घेतले, त्यामुळे करोनाच्या महामारीच्या काळातही आपला प्रगतीचा आलेख उंचावत आहे.

पौराणिक कथांमध्ये विद्येची देवता सरस्वती आणि समृद्धीची देवता लक्ष्मी यांचे समसमान महत्त्व सांगितले होते. खूप लहानपणापासूनच मुलांना सरस्वतीची उपासना करायला आपण सांगत असतो, मग तो शाळेतला गृहपाठ असो, परीक्षेतील टक्केवारी असो की एखादा अंगभूत कलाविष्कार असो. परंतु आपल्यापैकी किती जण आपल्या मुलांना लक्ष्मीची पूजा करायला शिकवतात? पैशाची बचत न करणे, नियमित बचत न करणे, गुंतवणूक करताना उद्दिष्टाधारित दृष्टिकोन न ठेवणे यातून लक्ष्मी देवतेचा आपण अनादरच करत असतो, मग ती आपल्यावर प्रसन्न कशी होणार? आपण आपल्या योग्य आर्थिक वर्तवणुकीतून येणाऱ्या पिढीसाठी एक चांगला आदर्श निर्माण करूया.

या सदरातून पुढील वर्षभर आपण म्युच्युअल फंड आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या काही आर्थिक संकल्पना यांचा धांडोळा घेणार आहोत. आज पारंपरिक गुंतवणुकीवरील उत्पन्न कमी झाल्यामुळे सर्वजण म्युच्युअल फंडांकडे आश्वासक नजरेने पाहात आहेत. म्युच्युअल फंडांमध्ये वेगवेगळय़ा योजनांसाठी विविध फंड गट आहेत. घरातील प्रत्येक व्यक्तीसाठी यात योजना आहे. समभागसंलग्न योजनांपासून ते कर्जरोखेसंलग्न योजनांपर्यंत, भारतीय बाजारातील गुंतवणुकीपासून ते जागतिक बाजारातील गुंतवणुकीपर्यंत, जागतिक स्थावर मालमत्तेसारख्या एका वेगळय़ा पर्यायापासून ते औषधी निर्माण, बँकिंग, पायाभूत सेवा इत्यादी उद्योग क्षेत्रनिहाय पर्यायांपर्यंत असा हा म्युच्युअल फंडाचा पट आहे. भारतीय म्युच्युअल फंड योजनांचा इतिहास पाहिल्यास समभागसंलग्न योजनांनी दीर्घ कालावधीत चांगला परतावा दिला आहे. आपापल्या जोखिमांकानुसार स्वत: अभ्यास करून अथवा या क्षेत्रातील जाणकाराच्या मार्गदर्शनानुसार निर्णय घ्यावा. 

हिंदू धर्मात चार पुरुषार्थ सांगितले आहेत, त्यापैकीच एक ‘अर्थ.’ खरेच याला इतके महत्त्व आहे, नाही का? पुढील लेखात आपण आपली वित्तीय ध्येयांची रूपरेषा आखताना कोणत्या मानसिक बाबींचा विचार करणे गरजेचे आहे याविषयी जाणून घेऊया. संपत्तीनिर्मिती ही एक वैयक्तिक साधना असते आणि आपल्या या  साधनेच्या पूर्तीसाठी ही लेखमाला निमित्तमात्र ठरावी अशी आशा बाळगतो.

(लेखक मुंबईस्थित गुंतवणूकविषयक अभ्यासक)