अजय वाळिंबे

अक्झो नोबेल पेंट्स म्हणजेच पूर्वाश्रमीची आयसीआय लिमिटेड. नेदरलँडसच्या अक्झो नोबेल एनव्हीची ही उपकंपनी असून ती जगातली तिसऱ्या क्रमांकाची मोठी पेंट कंपनी आहे. भारतीय कंपनीत प्रवर्तक कंपनीचा ७४.७६ टक्के हिस्सा आहे. अक्झो आपली डेकोरटिव्ह रंग उत्पादने डय़ुलक्स या प्रसिद्ध ब्रॅण्डअंतर्गत विक्री करते. कंपनीची उत्पादने विविध श्रेणीत उपलब्ध असून, प्रीमियम श्रेणीत कंपनीचा बाजारहिस्सा चांगला आहे. आपले विस्तारीकरण करताना कंपनीने पेंट व्यवसायाखेरीज पुट्टी, वॉटरप्रूफिंग, वूडकेअर तसेच अधेसिव्ह इ. उत्पादनांत प्रवेश केला आहे. कंपनीच्या एकूण उत्पन्नापैकी जवळपास ६५ टक्के उत्पन्न पेंट व्यवसायापासून असून उर्वरित उत्पन्न कोटिंग व्यवसायातून आहे. वाहन उद्योग तसेच इलेक्ट्रोनिक क्षेत्रातील कोटिंग व्यवसायात अक्झो नोबेलचे स्थान लक्षणीय आहे.

Air India Air Transport Services Limited jobs 2024
AIATSL recruitment 2024 : एअर इंडिया एअर ट्रान्स्पोर्ट सर्व्हिसेसमध्ये मोठी भरती; पाहा नोकरीची माहिती….
d subbarao rbi former governor
तिसऱ्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता होऊनही भारत गरीबच राहणार – RBI चे माजी गव्हर्नर
Job Opportunity Recruitment at AI Airport Services Limited
नोकरीची संधी: एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये पदभरती
Unicorns List India ranks third
Unicorns List: अमेरिका व चीनपाठोपाठ भारत तिसऱ्या स्थानावर

व्यवसाय वृद्धीसाठी आपली उत्पादन श्रेणी वाढवतानाच कंपनीने गेल्या आर्थिक वर्षांपासून ‘ग्रो अँड डिलिव्हर’ ही नवीन संकल्पना राबवयाला सुरुवात केली आहे. या संकल्पनेअंतर्गत कंपनी आपली टियर टू-थ्री शहरातील तसेच मोठय़ा गावातील आपली उपस्थिती मजबूत करेल, ग्राहकांशी संवाद वाढवून त्यांच्या गरजेप्रमाणे आणि योग्य किमतीत उत्पादने पुरवेल. या व्यवसायात आपले स्थान अजून मजबूत करण्यासाठी कंपनीने डिजिटल रोड-मॅप आखला असून त्याची अंमलबजावणी योग्यरित्या होत आहे. कंपनीने आपले नेटवर्क आता ५,००० शहरांपर्यंत विस्तारले आहे. गेल्या तीन तिमाहीत कंपनीने सातत्याने उत्तम कामगिरी करून आपला बाजारहिस्सा वाढवला आहे.

गेल्या आर्थिक वर्षांत उत्तम आर्थिक कामगिरी करून दाखवणाऱ्या अक्झो नोबेलचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. कंपनीने ३० सप्टेंबर २०२२ पर्यंतच्या कालावधीत ९२६ कोटी रुपयांच्या उलाढालीवर (गेल्या वर्षीच्या तिमाहीत ७४१ कोटी), १७ टक्के वाढीसह ६५ कोटी (गेल्या वर्षीच्या तिमाहीत ५६ कोटी) रूपयांचा नक्त नफा कमावला आहे. कच्च्या तेलाच्या किमती आता स्थिरावत असून कंपनीने तिच्या उत्पादनांच्या किमतीत देखील २१ टक्क्यांहून अधिक वाढ केली आहे. तर गेल्या वर्षीच्या सहामाहीच्या तुलनेत कंपनीने उलाढालीत ३६ टक्के वाढ साध्य करून ती १८,६३९ कोटींवर गेली आहे. कंपनीने बाजारात आणलेली नवीन उत्पादन श्रेणी तसेच ‘ग्रो अँड डिलिव्हर’ योजना याची सकारात्मक फळे आगामी कालावधीत दिसू लागतील. त्यामुळे यंदा तसेच २०२३-२४ मध्ये कंपनीची प्रगतीची घोडदौड वाढेल अशी अपेक्षा आहे.

अनुभवी प्रवर्तक, उत्तम ब्रॅंड आणि ‘ईएसजी’ तत्त्व सांभाळणारी तसेच अत्यल्प बिटा असलेली अक्झो नोबेल पेंट्स एक मध्यमकालीन गुंतवणूक म्हणून आकर्षक वाटते. सध्याची बाजारातील अनिश्चितता पाहता हा शेअर सुचविलेल्या किमतीपेक्षा कमी भावात मिळू शकतो, म्हणून प्रत्येक मंदीत तसेच टप्प्याटप्प्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे.

अक्झो नोबेल इंडिया लि.
(बीएसई कोड – ५००७१०)
शुक्रवारचा बंद भाव : रु. २,२७२/-
वर्षभरातील उच्चांक/ नीचांक :
रु. २,२६०/ १,६८५

बाजार भांडवल :
रु. १०,३४२ कोटी

भरणा झालेले भागभांडवल :. ४५.५० कोटी
शेअर होल्डिंग पॅटर्न (%)
प्रवर्तक ७४.७६
परदेशी गुंतवणूकदार २.१२
बँका/ म्यु. फंड/ सरकार ९.६१
इतर/ जनता १३.५१

संक्षिप्त विवरण
शेअर गट : मिड कॅप
प्रवर्तक : अक्झो नोबेल एनव्ही
व्यवसाय क्षेत्र : औद्योगिक रंग
पुस्तकी मूल्य : रु. २७३
दर्शनी मूल्य : रु. १०/-
गतवर्षीचा लाभांश : ७५०%

शेअर शिफारशीचे निकष
प्रति समभाग उत्पन्न : ६६.०३ रु.
पी/ई गुणोत्तर : ३४.६
समग्र पी/ई गुणोत्तर : ५७.८
डेट इक्विटी गुणोत्तर : ०.०६
इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर : २८.३
रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड : २८.४
बीटा : ०.२

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यापेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.
stocksandwealth@gmail. com