अजय वाळिंबे

चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (सीपीसीएल) ही इंडियन ऑइल कॉर्पोरेशन या सरकारी कंपनीची उपकंपनी असून, ती दक्षिण भारतातील एक आघाडीची पेट्रोलियम उत्पादक आणि पुरवठादार कंपनी मानली जाते. कंपनी मुख्यत्वे हाय-स्पीड डिझेल आणि मोटर स्पिरीट उत्पादनात कार्यरत असून दक्षिण भारतातील बाजारपेठेत तिचा २१ टक्के हिस्सा आहे. गेल्या पन्नास वर्षांत कंपनीची उत्पादन क्षमता वार्षिक २.५ दशलक्ष मेट्रिक टन्सवरून ११.५ दशलक्ष मेट्रिक टनांवर गेली आहे. कंपनीचा मुख्य प्रकल्प तमिळनाडू राज्यात मनाली येथे असून दुसरा कावेरी बेसिन येथे आहे. सीपीसीएल ही दक्षिण भारतातील इंडियन ऑइल समूहाची एकमेव रिफायिनग कंपनी आहे. इंडियन ऑइलची कंपनीमध्ये ५२ टक्के हिस्सेदारी आहे.

Air India Air Transport Services Limited jobs 2024
AIATSL recruitment 2024 : एअर इंडिया एअर ट्रान्स्पोर्ट सर्व्हिसेसमध्ये मोठी भरती; पाहा नोकरीची माहिती….
easy trip planners limited, company share, stock market, share market, portfolio, share market portfolio, stock market portfolio, easemytrip, trip planning company, holiday planning company, holiday packages, trip planning service, airline ticket service, finance article,
माझा पोर्टफोलियो : प्रवास सोपा नाही म्हणून!
fire broke out in vasai industrial estate
वस‌ईच्या औद्योगिक वसाहतीत भीषण आग; औद्योगिक कचऱ्यामुळे आग लागल्याचा शक्यता
Samsung launch of A Series Galaxy A55 5G and Galaxy A35 5G with awesome innovations With Offers
यूट्यूब प्रीमियम अन् आकर्षक ऑफर्ससह ‘या’ कंपनीच्या स्मार्टफोनची मार्केटमध्ये एंट्री; जाणून घ्या किंमत

इंडियन ऑइल ही आघाडीची नवरत्न कंपनी सीपीसीएलची प्रवर्तक असल्याने ती कंपनीला तेल शुद्धीकरणासाठी आयात केलेले क्रूड ऑइल पुरवते. सीपीसीएल हे तेल शुद्ध करून इंडियन ऑइलला विकते. कंपनीच्या रिफायनरी उत्पादनाचा मोठा हिस्सा इंडियन ऑइलच्या नेटवर्कद्वारे विकला जातो. सीपीसीएल, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन समूहाचा एक भाग आहे आणि आयातीत खनिज तेलाच्या सोर्सिग आणि उत्पादनासंदर्भात कंपनीला महत्त्वपूर्ण परिचालनात्मक फायदे मिळतात. इंडियन ऑइल ही भारतातील सर्वात मोठी तेल शुद्धीकरण आणि विपणन कंपनी आहे.

कंपनीची शेव्हरॉन केमिकल्स कंपनीसोबत १९८९ पासून ल्युब अॅडिटीव्ह घटक आणि पॅकेजेसच्या निर्मितीसाठी संयुक्त उपक्रम आहे. या मध्ये कंपनी आणि शेव्हरॉन या दोघांचा प्रत्येकी ५० टक्के हिस्सा आहे. कंपनीच्या एकूण उलाढालीत हाय-स्पीड डिझेलचा महसूल सुमारे ४५ टक्के इतका असून मोटर स्पिरिट (११ टक्के), हेवी एंड्स (११ टक्के), ऑटोमॅटिक ट्रान्समिशन फ्लुइड (११ टक्के), नाफ्था (९ टक्के) आणि इतर मूल्यवर्धित उत्पादने (१४ टक्के) आहे.

कंपनीची नागपट्टिणम येथे संयुक्त उपक्रमाद्वारे नऊ दशलक्ष मेट्रिक टन प्रति वर्ष क्षमतेची ग्रास रूट रिफायनरी उभारण्याची योजना आहे. प्रकल्पाला गुंतवणूक मंजुरी मिळाली असून आणि प्रकल्पाचा अंदाजे खर्च ३१,५८० कोटी रुपये आहे. रिफायनरी एका संयुक्त उद्यमामध्ये बांधली जाणार असून यांत आयओसी आणि सीपीसीएल प्रत्येकी २५ टक्के गुंतवणूक करतील तर उर्वरित एलआयसी, अॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी लाइफ, एसबीआय लाइफ इन्शुरन्स इ. धोरणात्मक/ सार्वजनिक गुंतवणूकदारांकडे असेल. सीपीसीएलच्या संचालक मंडळाने या गुंतवणुकीस नुकतीच मान्यता दिली आहे.

अस्थिर व्यवसाय

कुठलीही गुंतवणूक करताना गुंतवणूकदारांनी त्यातील धोकेही लक्षात घ्यायला हवेत. सीपीसीएल ही फक्त एक तेल शुद्धीकरण कंपनी आहे आणि तिचे मार्जिन आणि नफा आंतरराष्ट्रीय खनिज तेलाच्या किमती, आयात शुल्क भिन्नता आणि अस्थिर परकीय चलन दर यामुळे असुरक्षित आहेत.

कंपनीने जून २०२२ साठी संपलेल्या पहिल्या तिमाहीसाठी उत्तम कामगिरी करून दाखवली आहे. गेल्या आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत कंपनीने उलाढालीत १८४ टक्के वाढ साध्य करून ती २३१६३ कोटी रुपयांवर गेली आहे तर नक्त नफ्यात मोठी वाढ होऊन तो २३५८ कोटी रुपयांवर गेला आहे. सध्या अत्यल्प किंमत उत्पन्न (पीई) गुणोत्तरास उपलब्ध असलेला हा शेअर दोन-तीन वर्षांत उत्तम परतावा देऊ शकेल.

चेन्नई पेट्रोलियम कॉर्पो. लि.

(बीएसई कोड – ५००११०)

शुक्रवारचा बंद भाव : रु.  २४७.४०/-

वर्षभरातील उच्चांक/ नीचांक : रु. ४१८/९४

बाजार भांडवल : रु. ३५०० कोटी

भरणा झालेले भागभांडवल :. १४८.९१ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक ६७.२९  

परदेशी गुंतवणूकदार ४.०१

बँका/ म्यु. फंड/ सरकार   २.६७ 

इतर/ जनता २६.०३

संक्षिप्त विवरण

६ शेअर गट         :  स्मॉल कॅप

६ प्रवर्तक         :  इंडियन ऑइल

६ व्यवसाय क्षेत्र :   तेल शुद्धीकरण

६ पुस्तकी मूल्य  :      रु. १८७

६ दर्शनी मूल्य    :   रु. १०/-

६ गतवर्षीचा लाभांश : २०%

शेअर शिफारशीचे निकष

 प्रति समभाग उत्पन्न :  २४४.९४ रु.

पी/ई गुणोत्तर :   १

समग्र पी/ई गुणोत्तर : ११

डेट इक्विटी गुणोत्तर :    २.६६

इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर :    १३.७७

रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड : १९.८

 बीटा : ०.८  

सध्याची बाजारातील अनिश्चितता पाहता हा शेअर सुचविलेल्या किमतीपेक्षा कमी भावात मिळू शकतो, म्हणून प्रत्येक मंदीत तसेच टप्प्याटप्प्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे. 

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यापेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.

stocksandwealth@gmail.com