अजय वाळिंबे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जागतिक बाजारपेठेतील अनिश्चितता, डॉलरच्या तुलनेत ढासळता रुपया आणि चलनवाढीचा धोमा या कारणामुळे शेअर बाजारात नजीकच्या काळात तेजी येण्याची शक्यता धूसर वाटते. यामुळे अजूनही शेअर बाजार सावरण्याची लक्षणे दिसत नाहीत. काही गुंतवणूकदार वाचकांना माझा पोर्टफोलियोची कामगिरी यंदाच्या पहिल्या नौमाहीत तरी तितकीशी चांगली वाटणार नाही. मात्र नौमाहीतील परतावा (आयआरआर) पाहता मुंबई शेअर बाजारच्या तुलनेत तो नक्कीच चांगला आहे. आपल्या पोर्टफोलियोचा परतावा दर १८.०९ टक्के असून मुंबई शेअर बाजाराचा याच कालावधीतील परतावा १०.६५ टक्के आहे. माझा पोर्टफोलियोअंतर्गत सुचवलेले समभाग हे नेहमीच मध्यम ते दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी असल्याने त्यांचे लगेचच मूल्यमापन करणे योग्य ठरणार नाही. मात्र वाचक गुंतवणूकदारांनी कायम जागरूकता दाखवून गुंतवणूक केलेल्या कंपन्यांचे आर्थिक निकाल तसेच शेअर बाजारातील घडामोडींवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. अनिश्चित काळात उत्तम कंपन्यांत केलेली गुंतवणूक टप्प्याटप्प्यात केली तर जास्त फायद्याची ठरते, ही शिकवण आणि अनुभव आता वाचकांकडे आहेच.

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: My portfolio markets dollar inflation stock market investors amy
First published on: 03-10-2022 at 00:05 IST