सप्ताहातील या घडामोडींवर लक्ष ठेवा:

  • कॅस्ट्रॉल, देवयानी इंटरनॅशनल, आयडीबीआय बँक, मिहद्र हॉलिडेज, मिहद्रा फायनान्शियल्स, एबीबी लि., गोदरेज प्रॉपर्टीज, टीव्हीएस मोटर्स, डाबर, ब्रिटानिया, टाटा व अदानी समूहातील कंपन्या सरलेल्या आर्थिक वर्षांचे निकाल जाहीर करतील.
  • टाटा स्टील समभागांच्या विभाजनाची घोषणा
  • एप्रिल महिन्याचे जीएसटी व वाहन विक्रीचे आकडे
  • अमेरिकी फेडरल रिझव्‍‌र्ह बँकेची व्याजदर आढावा बैठक
    एलआयसीचा महाकाय आयपीओ
    चालू आठवडय़ात देशातील सर्वात मोठय़ा प्रारंभिक समभाग विक्रीला सुरुवात होणार आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळाची भागविक्री येत्या ४ मेपासून सुरू होणार असून गुंतवणूकदारांना ९ मेपर्यंत अर्ज करता येईल.
    समभाग विक्रीची वैशिष्टय
  • भागविक्रीसाठी प्रति समभाग ९०२ रुपये ते ९४९ रुपये किंमतपट्टा निश्चित
  • भागविक्रीच्या माध्यमातून केंद्र सरकारचा ३.५ टक्के हिस्सा अर्थात २२.१३ कोटी समभाग विक्रीसाठी उपलब्ध होणार.
  • केंद्र सरकारला यातून २१,००० कोटी रुपयांचा निधी मिळण्याची अपेक्षा.
  • यापैकी १० टक्के समभाग पॉलिसीधारकांसाठी राखीव असतील आणि त्यांना प्रति समभाग ६० रुपयांची सूट.
  • कंपनीच्या कर्मचा साठी ०.७ टक्के समभाग राखीव असतील. कर्मचारी आणि किरकोळ वैयक्तिक गुंतवणूकदारांना प्रति समभाग ४५ रुपयांची सूट.
  • वैयक्तिक गुंतवणूकदारांना किमान १५ समभागांसाठी (१४,२३५ रुपयांसह) बोली लावता येईल आणि त्यानंतर १५ च्या पटीत समभागांसाठी ते बोली शक्य.
    समभागांची १७ मे रोजी सूचिबद्धता
    एलआयसीने ‘सेबी’कडे दाखल केलेल्या अंतिम प्रस्तावानुसार, १६ मेपर्यंत बोलीदारांच्या डिमॅट खात्यात समभागांचे वाटप होईल. यामुळे भागविक्रीच्या एका आठवडयमनंतर १७ मे रोजी मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजारात एलआयसीचे समभाग सूचिबद्ध होणार आहे.