लिक्विफाइड नॅचरल गॅस (एलएनजी)चे वाढते महत्त्व लक्षात घेता भारत सरकारने १९९८ मध्ये पेट्रोनेट एलएनजी या कंपनीची संयुक्त भागीदारीने स्थापना केली. गेल, ओएनजीसी, भारत पेट्रोलियम या ऊर्जा क्षेत्रातील सरकारी कंपन्यांच्या एकत्रित गुंतवणुकीतून ही कंपनी उभी राहिली. रास लाफान एलएनजी या कतारमधील कंपनीशी एलएनजी पुरवठय़ाबाबत करार केल्यानंतर २००९मध्ये कंपनीने ऑस्ट्रेलियाच्या अ‍ॅक्सॉन मोबिल इंटरनॅशनल या कंपनीशी आणि २०११मध्ये गॅझ्प्रोम ग्लोबल एलएनजी या सिंगापूरच्या कंपनीशी एलएनजीच्या पुरवठा, खरेदी आणि विक्रीचे करार केले. भारतातील या सर्वात मोठय़ा एलएनजी कंपनीचे दहेज (गुजरात) येथे मोठे टर्मिनल आहे. येत्या तिमाहीत कोची (केरळ) येथील टर्मिनल कार्यान्वित होत असून दहेजमध्येही क्षमता वाढवण्यात येत आहे. नसíगक वायूची मागणी वार्षकि सरासरी ९% दराने वाढत असून पुरवठा मात्र ३% दराने कमी होण्याची शक्यता आहे. एलएनजी पुरवठय़ासाठी कंपनीचे करार दीर्घ कालावधीसाठी असल्याने पेट्रोनेट एलएनजीला त्याचा फायदाच होईल. गेल्या आíथक वर्षांकरिता ३१,४८७ कोटी रुपयांच्या उलाढालीवर १,१४९ कोटी रुपयांचा नफा कमावणाऱ्या पेट्रोनेट एलएनजीकडून यंदाच्या आर्थिक वर्षांत १,३०० कोटी रुपयांचा नफा अपेक्षित आहे. सध्या १२५ रुपयांच्या आसपास मिळणारा हा शेअर तुम्हाला २०% परतावा वर्षभरात देऊ शकेल.

Metro 1 route soon to MMRDA Bankruptcy petition against MMOPL disposed
मेट्रो १ मार्गिका लवकरच एमएमआरडीएकडे, ‘एमएमओपीएल’विरोधातील दिवाळखोरीची याचिका निकाली
RBI restrictions on Shirpur Cooperative Bank
रिझर्व्ह बँकेचे शिरपूर सहकारी बँकेवर निर्बंध
Amit Kalyani Reappointed as Vice Chairman and MD of Bharat Forge
भारत फोर्जच्या उपाध्यक्षपदी अमित कल्याणींची पुनर्नियुक्ती
indigrid cio meghana pandit talks about future Investment flow in invit
‘इन्व्हिट्स’मध्ये गुंतवणूक ओघ वाढत जाणार ! इंडिया ग्रिड ट्रस्टच्या मुख्य गुंतवणूक अधिकारी पंडित यांचे प्रतिपादन