पीजीआयएम इंडिया ग्लोबल इक्विटी अपॉर्च्युनिटिज फंड

वसंत माधव कुळकर्णी

IITM Pune Bharti 2024
Pune Jobs : IITM पुणे येथे नोकरीची संधी, आजच अर्ज करा, एवढा मिळणार पगार
Investment Opportunities in the Capital Goods Sector Top Companies
गुंतवणूक संधीचे क्षेत्र आणि न दिसणारे व्यवसाय: भांडवली वस्तू
enforcement directorate contact with apple to check kejriwal s mobile
केजरीवाल यांचा मोबाइल तपासण्यासाठी ‘अ‍ॅपल’शी संपर्क; मद्यधोरण गैरव्यवहारप्रकरणी ईडीचे पुढचे पाऊल  
Transfer of a railway official for answering RTI queries Mumbai
माहिती अधिकाराचे उत्तर दिल्याने, रेल्वे अधिकाऱ्याची बदली

म्युच्युअल फंड गुंतवणुकीसंबंधित माहिती देणारे साप्ताहिक सदर

भारतीय गुंतवणूकदारांना उपलब्ध असलेल्या फंडांची त्यांच्या एका वर्षांच्या कामगिरीनुसार क्रमवारी लावली तर त्या वैश्विक गुंतवणूक करणाऱ्या फंडाची कामगिरी अव्वल दिसते. मागील महिन्याभरात रुपयाचे अवमूल्यन झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय गुंतवणूक करणाऱ्या फंडांची कामगिरी भारतात गुंतवणूक करणाऱ्या फंडांच्या तुलनेत अव्वल असलेली दिसते. या फंड गटातील फंडानी २४ एप्रिल रोजीच्या ‘एनएव्ही’नुसार फंडांनी वर्षभराच्या गुंतवणुकीवर किमान १२ टक्के नफा नोंदविला आहे. तुलनेने ‘सेन्सेक्स’ किंवा ‘निफ्टी’वर आधारित ‘एक्सचेंज – ट्रेडेड फंड’ आणि ‘इंडेक्स फंडां’नी एक वर्ष गुंतवणुकीवर उणे १५ टक्के नफा नोंदविला आहे.

आंतरराष्ट्रीय गुंतवणूक करणाऱ्या फंडातील गुंतवणुकीवर होणारा भांडवली लाभ गुंतवणूक कालावधी तीन वर्षांंपेक्षा अधिक असल्यास दीर्घकालीन समजला जातो हे लक्षात घेतले पाहिजे. साहजिकच किमान पाच वर्षांंपेक्षा अधिक गुंतवणूक कालावधीसाठी हा फंड योग्य ठरेल.

फंड व्यवस्थापक किंवा अनुभवी सल्लागार एकमेकांचे कमी किंवा नकारात्मक सहसंबंध (को-रिलेशन) असलेल्या मालमत्तांच्या शोधात असतात. विविध कारणांनी गुंतवणूकदार यासाठी ‘ईटीएफ’ पर्याय  स्वीकारतात. एक्सचेंज – ट्रेडेड फंड (ईटीएफ) हे ‘डाऊ जोन्स’, ‘एस अ‍ॅण्ड पी ५००’ ‘नॅसडॅक १००’ या सारख्या निर्देशांकांवर आधारित असतात. ‘एमएससीआय ऑल कंट्री वर्ल्ड इंडेक्स’ हा असा एक निर्देशांक आहे जो २३ विकसित आणि २४ उदयोन्मुख देशांच्या भांडवली बाजारांचे प्रतिनिधित्त्व करतो.

या निर्देशांकात या ४७ देशांतील २,७०० समभागांचा समावेश आहे. निर्देशांकावर अमेरिका (५४.४१%), जपान (७.५८%), ब्रिटन (५.२१%), चीन (३.६%) आणि फ्रान्स (३.४२%) हे देश सर्वाधिक प्रभाव असेलेले देश आहेत. पेन्शन फंड आणि हेज फंड यासारखे संस्थात्मक गुंतवणूकदार तसेच एकाहून अधिक देशात गुंतवणूक करणारे निधी व्यवस्थापक त्यांच्या पोर्टफोलियोच्या कामगिरीचे आणि भौगोलिक वैविध्याची सापेक्षता मोजण्यासाठी ‘एमएससीआय ऑल कंट्री वर्ल्ड इंडेक्स’चा मानदंड म्हणून वापर करतात.

भारतीय गुंतवणूकदारांना या निर्देशांकावर आधारित गुंतवणुकीसाठी ‘पीजीआयएम इंडिया ग्लोबल इक्विटी अपॉच्र्युनिटिज फंड’ या ‘फंड ऑफ फंड्स’ची निवड करता येईल. हा फंड पिजीआयएम जेनिसन ग्लोबल इक्विटी ऑपोरच्युनीटीज फंडात गुंतवणूक करतो. पिजीआयएम जेनिसन ग्लोबल इक्विटी ऑपोरच्युनीटीज फंड हा ५० वर्षांची यशस्वी कारकीर्द असलेला फंड आहे. या फंडाची मालमत्ता १,७३,२०० दशलक्ष अमेरिकी डॉलर्सची आहे.

जेनिसन ग्लोबल इक्विटी अपॉच्र्युनिटिज फंड समभाग निवडीसाठी कठोर निकष लावून गुंतवणुकीच्या परिघात उपलब्ध असलेल्या कंपन्यांमधून ध्रुवीकरण साधणारा पोर्टफोलियो तयार केला जातो. यात प्रामुख्याने नवीन बाजारपेठ तयार करणाऱ्या नेटफ्लिक्ससारख्या कंपन्या, शाश्वत स्पर्धात्मक फायदे असलेल्या मास्टर कार्ड्स आणि सुदृढ ताळेबंद असलेल्या मायक्रोसॉफ्टसारख्या आणि उत्पादन भिन्नत्वाच्या यशस्वी रणनीतीमुळे स्वत:ची बाजारपेठ स्वत: निर्माण करणाऱ्या अ‍ॅपलसारख्या कंपन्यांचा समावेश आहे.

फंडाच्या गुंतवणुकीत व्यापार चक्राच्या वेगवेगळ्या टप्प्यावर असलेल्या आणि भौगोलिक वैविध्य साधणाऱ्या ३५ ते ४० कंपन्यांचे समभाग आणि अमेरिकन डिपॉझिटरी रिसीट्स (एडीआर) चा गुंतवणुकीत समावेश असतो.

फंडाचे प्रवर्तक प्रुडेन्शियल फायनान्शियल, आयएनसी ही अमेरिकेत १८७५ मध्ये स्थापन झालेली कंपनी असून या कंपनीचा फॉच्र्युन ग्लोबल ५०० आणि फॉच्र्युन ५०० यादीत समावेश आहे. कंपनी आपल्या सहयोगी कंपन्यांच्यामार्फत अमेरिकेतील संयुक्त राष्ट्रे आणि इतर ४० देशांत किरकोळ आणि संस्थात्मक गुंतवणूकदारांना विमा, गुंतवणूक व्यवस्थापन आणि इतर वित्तीय उत्पादने आणि सेवा देण्याच्या व्यवसायात आहे.

कंपनीचा मुख्य व्यवसाय जीवन विमा, वार्षिकी, म्युच्युअल फंड, पेन्शन आणि सेवानिवृत्तीशी संबंधित गुंतवणूक आणि मालमत्ता व्यवस्थापन इत्यादींचा समावेश आहे. भारतात ही कंपनी प्रुडेन्शियल ग्लोबल इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्स (पीजीआयएम) इंडिया म्युच्युअल फंड या नावाने अस्तित्वात आहे. भारतात अस्तित्वात असलेल्या डीएचएफएल प्रायमेरिका म्युच्युअल फंडाचे अधिग्रहण करून कंपनीने भारतात व्यवसायास सुरुवात केली. ही नाममुद्रा भारतीय गुंतवणूकदारांना फार परिचित नसली तरी अमेरिका आणि युरोप खंडात या कंपनीचे अस्तित्व खूप वर्षांपासून आहे.

करोना विषाणू उद्रेकाचा विकसित अर्थव्यवस्थांवर मोठा परिणाम झाल्याने त्यांच्या वृद्धीदारांच्या अंदाजात मोठय़ा प्रमाणात कपात केली गेली असली तरी स्तंभित अर्थव्यवस्था सामान्य रूपात आल्यानंतर भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था म्हणून स्थान राखून असेल असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणे निधी अर्थात आएमएफने व्यक्त केला आहे.

समभागातून संपत्ती निर्मिती करणे म्हणजे फायदेशीर व्यवसायात भागीदारी स्वीकारणे. भांडवली गुंतवणूक आणि वित्तीय सेवांमध्ये जगभरात भारतीय कंपन्या (त्यांच्या सर्व जलद वाढीसाठी) ओळखल्या जात असल्या तरी भारताचा वाटा जगाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात केवळ तीन टक्के आहे. म्हणूनच, जर एखाद्या गुंतवणूकदाराने भारतामध्ये सूचिबद्ध असलेल्या समभागांपुरता गुंतवणुकीचा परीघ आक्रसला तर उर्वरित ९७ टक्के विकल्पांकडे तो गुंतवणूकदार पाठ करत असतो. या फंडाच्या गुंतवणूकदाराला ५० टक्के अमेरिकेतील आणि ४० टक्के उर्वरित जगाच्या नफा कमावणाऱ्या कंपन्यांच्या व्यवसायात भागीदारी स्वीकारण्याची संधी असते. भारताचा वृद्धीदर सर्वाधिक असूनही जेव्हा जगभरात आणीबाणीची स्थिती निर्माण होते तेव्हा जागतिक गुंतवणूकदार इतर सर्व उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये विक्री करून पैसे काढतात.

जागतिक बाजारपेठेतील आणीबाणीच्या स्थितीत भारतीय बाजारपेठ सर्वात वाईट कामगिरी करणाऱ्यांपैकी एक असते. कारण रुपयाच्या घसरणीने परिस्थती अधिक गंभीर होत असते. ज्यांची गुंतवणूक भारतीय समभागांपुरती मर्यादित आहे त्यांच्या गुंतवणुकीला अशा घसरणीची सर्वाधिक झळ पोहचते.

भारतात तेल शुद्धीकरण, ऊर्जा, सॉफ्टवेअर आणि ग्राहकपयोगी वस्तू, अभियांत्रिकी कंपन्यांचा सुकाळ असला तरी तंत्रज्ञानाशी संबिंधत अ‍ॅमेझॉन, उबर, स्विगी, फेसबुक, गुगल, नेटफ्लिक्स यासारख्या कंपन्यांची वानवा आहे. या कंपन्यांना त्यांच्या व्यवसायात असलेल्या संधींचे सोने करण्यासाठी भारतीय गुंतवणूकदारांना वैश्विक गुंतवणूक करणाऱ्या फंडाकडे जायला लागेल.

थोडक्यात सांगायचे तर मुंबईतल्या गिरगावांत विनय हेल्थ होममध्ये मिसळ, पोहे, कोथिंबीर वडी स्वादिष्ट मिळते; पण खिमा पॅटीसची चव चाखायला कयानीकडेच जायला हवे!

shreeyachebaba@gmail.com