अ‍ॅपल, फेसबुकच्या शेअरमध्ये गुंतवणुकीची संधी!    
मागील वर्षी अमेरिका व जपानमधील वित्तीय बाजारांचा परतावा अर्धशतकातील सर्वोत्तम राहिल्याचे चाणाक्ष वाचकांना ठाऊक असेलच. ‘पाइनब्रिज इन्व्हेस्टमेंट असेट मॅनेजमेंट कंपनी’ ही जागतिक स्तरावर ६० वर्षांची समृद्ध परंपरा असलेली नामांकित गुंतवणूक सल्लागार कंपनी आहे.
ठल्ल
पाइनब्रिज म्युच्युअल फंडाने गुंतवणूकदारांसाठी आणलेली पाइनब्रिज इंडिया यूएस इक्विटी फंड ही नवीन योजना आहे. ही योजना २९ नोव्हेंबर ते १३ डिसेंबर  २०१३ या दरम्यान प्रारंभिक गुंतवणुकीसाठी खुली होती. २३ डिसेंबरपासून ही योजना पुनर्खरेदीकरिता / एनएव्हीनुसार नियमित गुंतवणुकीकरिता खुली झाली आहे. ही ‘फंड ऑफ फंडस’ प्रकारची योजना असून याअंतर्गत जमविलेला निधी ‘पाइनब्रिज यूएस लार्ज कॅप रिसर्च एन्हान्सड फंड’ या फंडाच्या युनिटमध्ये गुंतविला जाणार आहे.
‘पाइनब्रिज यूएस लार्ज कॅप रिसर्च एन्हान्सड फंड’ ही योजना अमेरिकेतील लार्ज कॅप कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक करते. मागील वर्षी अमेरिका व जपानमधील वित्तीय बाजारांचा परतावा अर्धशतकातील सर्वोत्तम राहिल्याचे ‘लोकसत्ता’च्या चाणाक्ष वाचकांना ठाऊक आहेच. ‘पाइनब्रिज इन्व्हेस्टमेंट असेट मॅनेजमेंट कंपनी’ ही एक जगातील नामांकित गुंतवणूक सल्लागार आहे. या कंपनीला जागतिक स्तरावर ६० वर्षांची गुंतवणुकीची समृद्ध परंपरा आहे.
‘पाइनब्रिज यूएस लार्ज कॅप रिसर्च एन्हान्सड फंड’ या योजनेच्या परताव्याच्या तुलनेसाठी एसएनपी ५०० हा निर्देशांक वापरला जातो. गुंतवणुकीसाठी एसएनपी ५०० या निर्देशांकातील कंपन्या निवडल्या जातात. हा इंडेक्स फंड नसला तरी अ‍ॅक्टिव्ह व पॅसिव्ह अशी दोन्ही प्रकारची गुंतवणूकनीती अवलंबिली जाते. अ‍ॅक्टिव्ह प्रकारात ट्रॅकिंग एरर १% च्या आत, तर पॅसिव्ह प्रकारात ट्रॅकिंग एरर २%च्या आत असते. जोखीम व परतावा यांचा समतोल या दोन पर्यायांत साधला जातो. ‘पाइनब्रिज यूएस लार्ज कॅप रिसर्च एन्हान्सड फंडा’चा २६ डिसेंबर २०१३ रोजी संपलेल्या मागील तीन वर्षांचा परतावा १८.६६% व पाच वर्षांसाठी १६.४३% आहे, तर एसएनपी ५०० चा परतावा अनुक्रमे १५.८१% व १४.४०% आहे.  
भारतातील ४४ मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांपकी (एएमसी) या ‘पाइनब्रिज म्युच्युअल फंडा’चा ३३ वा क्रमांक लागतो. एआयजी या बलाढय़ आíथक सेवा कंपनीकडून पाइनब्रिजने ही त्यांची भारतातील उपकंपनी विकत घेतली. इतर फंड घराण्यांच्या गोंगाटात संथ, पण ठामपणे वाटचाल करणारे हे फंड घराणे फारसे परिचित नसले तरी भारतात १,१०० कोटी निधीचे व्यवस्थापन करते.
तुलनेने लहान व अपरिचित म्हणून कोणी म्युच्युअल फंड विक्रेता अथवा वित्तीय सल्लागार या कंपनीच्या योजनेची कोणतीही शिफारस करताना दिसत नाही. गुणवत्तेनुसार जे अव्वल ते देण्याचा प्रयत्न या स्तंभातून करणार असल्यामुळे तुलनेने लहान, अपरिचित, परंतु अव्वल अशा या योजनेची शिफारस करावीशी वाटली.