port-philioकाही कंपन्या जास्त गाजावाजा न करता, कुठलीही जाहिरातबाजी न करता शांतपणे खूप चांगली कामगिरी करत असतात. बोरोसिल ग्लास वर्क्‍स ही अशाच कंपन्यांपकी एक आहे असे मला वाटते. १९६२ मध्ये कॉìनग या अमेरिकन कंपंनीच्या सहकार्याने बोरोसिलची स्थापना झाली. त्यानंतर १९८८ मध्ये कॉìनगने आपला हिस्सा सध्याच्या प्रवर्तकांना विकून टाकला. घरगुती ग्लासवेअरखेरीज लॅबोरेटरी आणि इंडस्ट्रियल ग्लासवेअर आपल्या १५० वितरकांमार्फत विकणाऱ्या बोरोसिलची उत्पादने विविध क्षेत्रात २०० पेक्षा जास्त उत्पादनांमध्ये वापरली जातात. यात प्रामुख्याने मायक्रो बायोलॉजी, बायो टेक्नॉलॉजी, फोटो िपट्रिंग, प्रोसेस सिस्टीम्स आणि लाइटिंग अशा अनेक क्षेत्रांचा समावेश होतो. गृहिणींसाठी तर बोरोसिल हे नाव अजिबात नवीन नाही. मायक्रोवेव्हसाठी लागणारी सर्व प्रकारची भांडी आणि बाऊल यासाठी बोरोसिल ब्रॅंड प्रसिद्ध आहे. कुठलेही कर्ज नसलेल्या या कंपनीने गेल्या आíथक वर्षांकरिता १७५ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ५२.५ कोटींचा नक्त नफा कमावला आहे. केवळ ३ कोटींचे भागभांडवल असलेल्या या कंपनीची रियल इस्टेट, शेअर्स, रोखे आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक २६० कोटीवर असून त्याचे बाजारमूल्य वाढतच राहणार आहे. गेल्याच वर्षांत दुबईला कंप
नीने आपली उपकंपनी स्थापन केली असून यंदा देखील कंपनीकडून भरीव कामगिरी अपेक्षित आहे. कंपनीने २०१४-१५ च्या पहिल्याच तिमाहीत ४०.१७८ कोटी रुपयांच्या उलाढालीवर १४.५७ कोटींचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत ही वाढ २७२% आहे. फक्त बीएसईवर नोंदणी असल्याने तसेच केवळ ३ कोटींच भागभांडवल असलेल्या या कंपनीच्या शेअर्सची द्रवणीयता कमी आहे. हा लेख लिहितानाच गेल्या दोन दिवसांत हा शेअर जवळपास २७% वर गेला आहे. भरणा झालेल्या भागभांडवलापकी ७४% पेक्षा जास्त शेअर्स प्रवर्तकांकडे असल्याने अतिशय कमी शेअर्स बाजारात उपलब्ध आहेत. त्यामुळे सतत अप्पर/ लोअर सíकट लागण्याचा प्रकार होऊ शकतो. ज्या गुंतवणूकदारांना हा धोका पत्करायची तयारी असेल त्यांनीच गुंतवणूक करावी.
nstocksandwealth@gmail.com

port3