अजय वाळिंबे

वर्ष १९९२ मध्ये स्थापना झालेल्या हेरंबा इंडस्ट्रीजचे अधिग्रहण सध्याचे प्रवर्तक सदाशिव के शेट्टी आणि रघुराम के शेट्टी यांनी ११९४ मध्ये केले. अलिकडेच म्हणजे मार्च २०२१ मध्ये मुंबई शेअर बाजारात नोंदणी झालेली ही कंपनी पीक संरक्षण रसायनांची उत्पादक, निर्यातदार आणि विपणन कंपनी आहे. कंपनीचा मुख्य उत्पादन प्रकल्प गुजरातेत वापी येथे असून, ती इंटरमिडिएट्स, तांत्रिक आणि फॉम्र्युलेशन तयार करते. सिंथेटिक पायरेथ्रॉइड्सच्या देशांतर्गत प्रमुख उत्पादकांपैकी ही एक कंपनी असून, कंपनीच्या उत्पादनांमध्ये सायपरमेथ्रिन, अल्फासायपरमेथ्रिन, डेल्टामेथ्रिन, परमिथेरिन, लॅम्बडा सायहॅलोथ्रीन इत्यादींचा समावेश आहे. हेरंबाच्या कीटकनाशकांच्या श्रेणीमध्ये कीटकनाशके, तणनाशके, बुरशीनाशके आणि कीटक नियंत्रणासाठी सार्वजनिक आरोग्य उत्पादने समाविष्ट आहेत. कंपनीकडे वापी, गुजरातच्या औद्योगिक पट्टय़ात आणि त्याच्या आसपास तीन उत्पादन प्रकल्प आणि पॅकेजिंग सुविधा आहेत

Accused who absconded after killing arrested after 34 years
हत्या करून फरार झालेल्या आरोपीला ३४ वर्षांनी अटक; गुन्हे शाखा १ ची कारवाई
Piyush Goyal on Elon Musk Tesla
टेस्लाचा प्रकल्प महाराष्ट्रात की गुजरातमध्ये? पियुष गोयल यांचं ‘मनोज कुमार’ स्टाइल हटके उत्तर
NIA action in Bangalore blast case two arrested from Kolkata
कोलकात्यातून दोघांना अटक; बंगळूरु बॉम्बस्फोटप्रकरणी ‘एनआयए’ची कारवाई
Pune Rainwater Harvesting Project lead by retired colonel shashikant Dallvi
गोष्ट असामान्यांची Video: पुण्यातील निवृत्त कर्नल शशिकांत दळवींचं ‘मिशन पाणी वाचवा!’

कंपनी अॅयग्रोकेमिकल्स उद्योगाच्या संपूर्ण शृंखलेचे म्हणजे इंटरमीडिएटच्या निर्मिती आणि विक्रीपासून तांत्रिक आणि फॉम्र्युलेशनच्या निर्मिती तसेच विपणनात कार्यरत आहे. भारतातील आपल्या टेक्निकल (तांत्रिक) उत्पादन आणि विक्रीसाठी कंपनीची १८ तांत्रिकांसाठी नोंदणी असून, तांत्रिक आणि फॉम्र्युलेशन आणि निर्यात बाजारातील उत्पादन आणि विक्रीसाठी १०३ तर  भारतातील फॉम्र्युलेशन उत्पादन आणि विक्रीसाठी १६९ नोंदणीकृत आहे.

कंपनीने केंद्रीय कीटकनाशक मंडळ आणि नोंदणी समितीकडे (सीआयबी अॅण्ड आरसी)  भारतात उत्पादन आणि विक्रीसाठी १४ तांत्रिक आणि फॉम्र्युलेशन आणि निर्यात बाजारासाठी उत्पादनासाठी सात तांत्रिक आणि फॉम्र्युलेशनच्या नोंदणीसाठी अर्ज दाखल केले आहेत आणि ते मूल्यांकनाच्या प्रक्रियेत आहेत. कंपनीचे सध्याचे बहुतांश मध्यवर्ती उत्पादन तिच्या तांत्रिक उत्पादनांच्या निर्मितीसाठी (कॅप्टिव्ह) वापरले जाते.

कंपनीकडे उत्पादन विकास आणि सुधारणेसाठी उमदा आर अॅीण्ड डी संघ आहे. युनिट एक आणि दोनमधील आर अॅशण्ड डी सुविधा वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन विभाग, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार (डीएसआरआय) द्वारे मान्यताप्राप्त आहेत. सारीगम येथील तिसऱ्या युनिटमध्ये नवीन आर अॅरण्ड डी सुविधा ऑक्टोबर, २०२० पासून कार्यान्वित झाली आहे.

हेरंबा इंडस्ट्रीजचे आपल्या उत्पादनांसाठी विस्तृत वितरण जाळे असून तिचे भारतातील १६ राज्यांत २१ डेपो असून ९,४०० हून अधिक वितरक आहेत. तसेच कंपनी लॅटिन अमेरिका, आखाती देश, आफ्रिका, आशिया आणि दक्षिण पूर्व आशियातील ६० पेक्षा जास्त देशांमध्ये आपली उत्पादने निर्यात करते.

कंपनीचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर झाले असून कंपनीने सप्टेंबर २०२१ साठी संपलेल्या तिमाहीसाठी ७०५ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ९३ कोटीचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या तिमाहीच्या तुलनेत तो ४० टक्क्य़ांनी अधिक आहे. फेब्रुवारी २०२१ मध्ये  आपल्या प्रारंभिक भागविक्रीद्वारे ६२७ रुपयांना दिला गेलेला शेअर सध्या ७०० रुपयांच्या आसपास उपलब्ध आहे. भारतातील अॅनग्रोकेमिकल्स क्षेत्राला सध्या सुगीचे दिवस आहेत. आगामी दोन वर्षांत कंपनीचा प्रगतीचा आलेख अजून चढता असेल अशी अपेक्षा आहे. एक दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून हेरंबा इंडस्ट्रीजचा जरूर विचार करा.

हेरंबा इंडस्ट्रीज लिमिटेड

(बीएसई कोड – ५४३२६६)

शुक्रवारचा बंद भाव : रु. ६७१/-

वर्षांतील उच्चांक/ नीचांक : रु. ९४५/६०२

बाजार भांडवल :

रु. २,६८४ कोटी

भरणा झालेले भागभांडवल :

रु. ४०.०१ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक  ७४.६१

परदेशी गुंतवणूकदार  २.६४

बँक/ म्यु. फंड/ सरकार १.५८

इतर/ जनता २१.१७

संक्षिप्त विवरण

* शेअर गट : स्मॉल कॅप

* प्रवर्तक   :  सदाशिव शेट्टी/ रघुराम शेट्टी

* व्यवसाय क्षेत्र  : कृषी रसायने

* पुस्तकी मूल्य : रु. १५५

* दर्शनी मूल्य   : रु. १०/-

* गतवर्षीचा लाभांश : १७ %

शेअर शिफारशीचे निकष

*  प्रति समभाग उत्पन्न :    रु. ४५.६

*  पी/ई गुणोत्तर :          १४.८

*  समग्र पी/ई गुणोत्तर :     २६.२

*  डेट इक्विटी गुणोत्तर :     ०.०७

*  इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर :     ५७.५

*  रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड :    ४५.३

*  बीटा :             ०.९

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.