|| अजय वाळिंबे

वर्ष १९९३ मध्ये स्थापन झालेली आर सिस्टीम्स इंटरनॅशनल लिमिटेड ही माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील आऊटसोर्स उत्पादन विकास आणि कस्टमर सपोर्ट सव्‍‌र्हिसेसच्या अग्रगण्य प्रदात्यांपैकी एक लहान पण महत्त्वाची कंपनी आहे. कंपनी माहिती-तंत्रज्ञान उपाययोजना आणि बिझनेस प्रोसेस आऊटसोर्सिग (बीपीओ) सेवा पुरवणारी एक आघाडीची कंपनी आहे. उच्च तंत्रज्ञान क्षेत्रातील स्वतंत्र सॉफ्टवेअर विक्रेते (आयएसव्ही) म्हणून बँक, वित्तीय सेवा कंपन्या, दूरसंचार, रिटेल, विमा आणि आरोग्य सेवा इ. क्षेत्रांत आर सिस्टीम्स संपूर्ण सॉफ्टवेअर अभियांत्रिकी सेवा, तांत्रिक ग्राहक सेवा, डाटा मॅनेजमेंट आणि इतर आयटी सेवा प्रदान करते. तसेच वाढत्या मागणीनुसार कंपनी ई कॉमर्स/ रिटेल कर्ज क्षेत्रासाठी इंडसह्ण या ब्रँडने अ‍ॅप्लिकेशन्सचा एक संच विकसित आणि मार्केटिंग करते. बँकिंग आणि वित्तीय सेवा विभागामध्ये ‘टर्न की सॉफ्टवेअर’ प्रकल्प हाती घेते. यांत मुख्यत्वे ‘आयपीएलएम’ सव्‍‌र्हिसेस इंडस सोल्युशन्स ईजिनेट सोल्युशन्सचा समावेश आहे. या खेरीज कंपनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय), अँडव्हान्स्ड अनॅलिटिक्स, व्हच्र्युअल डिझाइन, इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी) अशा विविध महत्त्वाच्या क्षेत्रात सेवा पुरविते. कंपनीची भारत, अमेरिका, युरोप आणि सिंगापूरमध्ये आठ जागतिक केंद्रे असून ती सहा खंडांमधील ४० पेक्षा जास्त देशांमध्ये सुमारे १२५ कॉर्पोरेट ग्राहकांना सेवा पुरवते. कंपनीची जगभरात २५ हून अधिक कार्यालये/ सेवा केंद्र आहेत.

hotel Solapur district
सोलापूर : हॉटेल व्यवस्थापनाच्या नावाखाली मित्राला ६८ लाखांचा गंडा, अक्कलकोटमध्ये दागिने लंपास
Sandhya Devanathan
व्यवसाय वाढीमध्ये ‘एआयʼची महत्त्वाची भूमिका, मेटाच्या व्यवस्थापकीय संचालक संध्या देवनाथन यांचे मत
Redevelopment of Abhyudaya Nagar Colony through open tender
मुंबई : खुल्या निविदेद्वारे अभ्युदय नगर वसाहतीचा पुनर्विकास
Saima ubaid First female powerlifter from Kashmir
सायमा ओबेद… कश्मिरमधील पहिली महिला पॉवरलिफ्टर

स्थापना १९९३ मध्ये झालेल्या आर सिस्टीम्स इंटरनॅशनलची १५ वर्षांपूर्वी २४० रुपये अधिमूल्याने (१० रुपये दर्शनी किंमत) प्रारंभिक समभाग विक्री (आयपीओ) पार पडली होता. कंपनी लाभांश देत नसली तरीही ज्या भागधारकांनी हे शेअर्स अजून ठेवले असतील त्यांचे २५,००० रुपयांचे आता विभाजनानंतर (१ रुपया दर्शनी मूल्य) रु. ३२५,००० झाले आहेत. गेल्या वर्षभरात शेअरच्या भावात जवळपास ९० टक्के वाढ झाली आहे. मात्र कंपनीचा आतापर्यंतचा प्रगतीचा आलेख पाहता अजूनही ही कंपनी गुंतवणुकीस आकर्षक वाटते. यंदाच्या आर्थिक वर्षांत कंपनीने पहिल्या नऊ महिन्यांत ८२७ कोटी रुपयांच्या उलाढालीवर १०९ कोटी रूपयांचा नक्त नफा (गेल्या नऊ महिन्यांच्या तुलनेत दुपटीहून अधिक) कमावून उत्तम कामगिरी केली आहे. तर सप्टेंबर २०२१ साठी संपलेल्या तिसऱ्या तिमाही करता कंपनीने ३०६ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ३७.६ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत तो ३९ टक्क्यांनी अधिक आहे. कंपनीचे डिसेंबर २०२१ साठी संपलेल्या आर्थिक वर्षांचे निकाल लवकरच जाहीर होतील. कुठलेही कर्ज नसलेली आणि केवळ ०.५ बिटा असलेली आर सिस्टीम्स ही माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील विविध आधुनिक सेवा पुरवणारी कंपनी एक मध्यमकालीन गुंतवणूक म्हणून फायद्याची ठरू शकेल.

आर सिस्टीम्स इंटरनॅशनल लिमिटेड

(बीएसई कोड – ५३२७३५)

शुक्रवारचा बंद भाव : रु. ३२४/-

वर्षभरातील उच्चांक/ नीचांक :

रु. ३५२/१०९

बाजार भांडवल :

रु. ३,८३९ कोटी

भरणा झालेले भागभांडवल : रु. ११.८३ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक         ५१.५८  

परदेशी गुंतवणूकदार  ०.६५   

बँक/ म्यु. फंड/ सरकार        –.–     

इतर/ जनता                         ४७.७७

संक्षिप्त विवरण

शेअर गट       : स्मॉल कॅप

प्रवर्तक             : सितदर सिंह रेखी

व्यवसाय क्षेत्र           :  माहिती तंत्रज्ञान

पुस्तकी मूल्य : रु. ४२.५

दर्शनी मूल्य   : रु. १/-

गतवर्षीचा लाभांश : – %

शेअर शिफारसीचे निकष

प्रति समभाग उत्पन्न :         रु. ११.५३

  पी/ई गुणोत्तर :        २७.५

  समग्र पी/ई गुणोत्तर :         ३८.६

  डेट इक्विटी गुणोत्तर :        ०.००

  इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर :   ३३.९

  रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड :    २६.२

  बीटा :        ०.५

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.