डॉ. आशीष थत्ते

देखभाल करणे म्हणजे दुरुस्तीला पुढे ढकलणे असे म्हटले जाते. कंपन्यांमध्ये फार पूर्वीपासून मोठी यंत्रे किंवा छोटी उपकरणे यांची विविध पद्धतीने देखभाल आणि निगा राखली जाते. मोठय़ा कंपन्यांमध्ये त्यासाठी वेगळा विभाग देखील कार्यरत असतो. मोठी यंत्रे किंवा उपकरणे वारंवार वापरली जात असल्याने त्याची झीज होत राहते आणि म्हणून पुन्हापुन्हा त्यांच्या देखभालीची गरज भासते. सुधारात्मक, प्रतिबंधात्मक आणि भविष्यात्मक असे देखभालीचे तीन प्रमुख प्रकार आहेत.

Can eggs help diabetic patient to control blood sugar
मधुमेही व्यक्तींनी अंडी खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते का? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
deep learning definition
कुतूहल : डीप लर्निग – सखोल शिक्षण म्हणजे काय?
Mahanirmiti Koradi Bharti 2024
Nagpur Jobs : महानिर्मिती कोराडी येथे १९६ पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू, आजच अर्ज करा
Inheritance of girls and women Two main types of property ownership
मुली आणि महिलांचा वारसाहक्क

कुठलाही मोठा कारखाना उभारला की, त्यातील यत्रांना प्रतिबंधात्मक देखभालीची गरज भासते आणि वेळोवेळी कंपन्या मोठय़ा यंत्रे (मशीन) काम करायचे थांबवून त्याची प्रतिबंधात्मक देखभाल करतात. यातून एखादा भाग खराब झाला आहे आणि बदलण्याची नितांत गरज आहे, असे लक्षात येते. तेव्हा यंत्रातील तो भाग बदलला जातो, म्हणजे त्याची सुधारात्मक देखभाल केली जाते. भविष्यात यंत्राचा कुठला भाग खराब होईल हे आत्ताच समजून त्याचा रखरखाव करणे म्हणजे भविष्यात्मक देखभाल. कंपन्या आपल्या कारखान्यात हे सगळे नियम फार काटेकोरपणे पाळतात. एवढे करून देखील मशीन बंद पडले की मग मात्र त्याची दुरुस्ती करणे किंवा शेवटी नवीन घेणे असे पर्याय असतात. मुंबई रेल्वेच्या रविवारचा मेगा ब्लॉक म्हणजे देखभालच.

हल्ली आपण देखील हे नियम चांगलेच अमलात आणले आहेत. हल्ली घराघरांत वेगवेगळी यंत्रे पोहोचली आहेत आणि त्यांची देखभाल करणे हा एक मोठा व्यवसाय झाला आहे. सोपे यंत्र म्हणजे वातानुकूलन यंत्रणा. नवीन वातानुकूलित यंत्र घेतले की, त्याची देखभाल ही ओघाने आलीच पाहिजे. आपण महागडे टीव्ही, वॉशिंग मशीन, फ्रिज वगैरे घेतो. त्यावर देखभालीचा खर्च करत नाही किंवा फारसे त्यात करण्याची गरज पडत नाही. पण पुढे जाऊन त्यांची देखभाल करावी लागणार नाही असे नाही. पाण्याचे शुद्धीकरण करणारे छोटेसे मशीन देखभालीपासून अजिबात दूर नसते कारण ते आपण अगदी रोज वापरतो. त्यामधील शुद्धीकरणाची यंत्रणा स्वच्छ ठेवावी लागते आणि काही गरज पडल्यास त्यातील सुटे भाग देखील बदलावे लागतात. गाडी म्हणजे मोठे मशीनच. त्याची देखभाल आपण अगदी निगुतीने करतो. म्हणजे कंपन्यांमध्ये वापरले जाणारे देखभालीचे नियम आपण सहज आत्मसात केले आहेत.

जगभरातील डॉक्टरांनी आपल्या शरीराला देखील मशीनची उपमा दिली आहे. त्याची वेळोवेळी देखभाल करणे गरजेचे आहे. त्यामुळे दुरुस्तीची गरज पडणार नाही असे सांगितले आहे. कंपन्यांमध्ये देखभालीचे काम करणारे कधी कधी आपल्या शरीराची देखभाल विसरून जातात. आपण देखील सुधारात्मक, प्रतिबंधात्मक आणि भविष्यात्मक देखभाल करत असतो. ज्या घरात काही रोग आनुवंशिकतेने येतात त्यांच्यासाठी वैद्यकीय जगताने वेगवेगळय़ा चाचण्या देखील शोधून काढल्या आहेत. तुम्ही थोडासा विचार केलात तर वरील सगळय़ा देखभालीचे उपाय शरीर नावाच्या मशीनवर आपण करत असतो. मनाची देखभाल करावी लागते म्हणजे दुरुस्तीची गरज भासत नाही. देखभालीची ही तत्त्वे दैनंदिन जीवनात वापरल्यास नक्की फायदा होईल, अगदी कंपन्यांप्रमाणेच. तेव्हा कधीतरी एखादी सुटी टाकून घरी शांत बसावेसे वाटले तर शरीराने देखभालीची आज्ञा केली आहे असे समजावे.

लेखक कॉस्ट अँड मॅनेजमेण्ट अकाउंटंट म्हणून कार्यरत / ashishpthatte@gmail. com, @AshishThatte