श्री. प्रसाद पटवर्धन, मुक्काम – लोटे, तालुका- खेड हे लघू उद्योजक आहेत. स्वत:चा व्यवसाय असल्यावर निवृत्तीचे वय आपण ठरवू शकतो. त्यांनी प्रश्न विचारला आहे त्यांच्यासाठी निवृत्ती नियोजन कसे करावे?
आíथक नियोजन करताना आपण कोणत्या वयोगटात आहोत हे महत्त्वाचे असते. प्रत्येक वयोगटात आपल्या जबाबदाऱ्या बदलत असतात. ३५ ते ४५ वयोगटातील नियोजन व ५५ वयोगटापासून पुढे आíथक नियोजन यात फरक पडतो. तसेच व्यावयसायिक व उद्योजक यांच्या नियोजनात नोकरी करणाऱ्या व्यक्तीपेक्षा फरक असतो.
नोकरी करणाऱ्या माणसाला आपण ५८ किंवा ६० व्या वर्षी निवृत्त होणार व त्या वेळेस प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅच्युइटी किती मिळणार हे माहीत असते. व्यावसायिक व लहान उद्योजकांना आपले निवृत्तीचे वय आपणच ठरवता येते. मग वकील, डॉक्टर या सारखे ७५, ८० वयापर्यंत सहज काम करू शकतात, तसेच उद्योजकांचेही असते.
वकील,डॉक्टर या सारख्या व्यावसायिकास आपल्या कामाचा मोबदला फी स्वरूपात मिळतो. तो व्यवसायात पुन्हा गुंतवण्याची तशी गरज नसते. तो व्यवस्थित गुंतवणूक करून वाढवला जातो. परंतु बहूतेक सर्व उद्योजक आपला धंद्यात येणारा नफा पुन्हा धंद्यात गुंतवत असतात. धंद्यातून दरमहा घरखर्चासाठी थोडीच रक्कम बाजूला काढली जाते. बाकी सर्व खर्च धंद्याच्या खात्यातून. धंद्यातून होणारा नफा धंदावृद्धीसाठी, धंद्याचे कर्ज मुदतीच्या आधी फेडण्यासाठी, स्वस्तात मिळतो म्हणून कच्चा माल जास्त खरेदी करण्यासाठी वापरला जातो. करबचतीसाठी पीपीएफ् किंवा आयुर्वमिा इतकीच रक्कम धंद्यातून बाजूला काढली जाते व १५-२० वर्षांनी मुदत संपल्यावर पुन्हा धंद्याच्या वाढीसाठी वापरली जाते.
हे करण्यात धंदा खूप मोठा होतो. धंद्यातल्या गुंतवणुकीवर परतावा इतर गुंतवणुकीपेक्षा खूप जास्त असतो. सध्या बँका कर्ज देताना ‘त्यांच्या’ सोयीच्या म्युच्युअल फंड योजना किंवा आयुर्वमिा पॉलिसी गळ्यात मारत असतात. फक्त तेवढीच गुंतवणूक अवांतर केली जाते. अगदीच काही नाही तर बँकेत आवर्ती जमा खाते उघडणे भाग पडते, पण धंद्याच्या गरजेच्या वेळेस ते मोडले जाते किंवा त्यावर ओव्हरड्राफ्ट वाढवून घेतला जातो.

या सगळ्या व्यापात मुलांच्या उच्च शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी ३० लाख रु. उभे करायचे झाल्यास धंद्यातून काढा. धंद्यात तरलता (लिक्विडीटी) नसल्यास देणेकरांच्या मागे लागा. आमचे एक परिचित गृहस्थ नेहमी सांगत माझ्या धंद्यात मला प्रचंड फायदा होतो. इतका नफा मला शेअर बाजारातसुद्धा मिळणे अशक्य आहे, मग मी बाहेर गुंतवणूक का करू? मी सहज विचारले पण तुम्ही कधीतरी निवृत्त होणार ना! मग त्यावेळेची सोय काय? एका क्षणांत त्यांनी उत्तर दिले, ‘‘मी मुलाच्या हातात धंदा सोपवणार आणि धंद्यातून पेन्शन घेणार’’ आज परिस्थिती अशी आहे की त्यांच्या मुलास, वडिलांच्या धंद्यात बिलकूल रस नाही. त्याने वडिलांना स्पष्ट सांगितले, ‘‘भारतात मला प्रत्येक सरकारी कचेरीत खेटे घालण्यापेक्षा परदेशांत धंदा करणे सोपे आहे. तुमचा धंदा विकून तुम्ही माझ्याबरोबर चला.’’
धंदा विकताना, ऑफिस म्हणून दाखवलेला राहता बंगला, धंद्यातून वेगळा करावा लागला. त्याच सुमारास चीनमधून माल अध्र्या किमतीस मिळू लागल्याने धंदा खरेदी करण्यास कोणी पुढे येईनात. शेवटी मशिनरी बाजूला काढून धंद्याची जमीन व बििल्डग विकून पसे उभे केले.
याला उपाय काय?
प्रत्येक उद्योजक आपल्या मुख्य व्यवसायाबरोबर दुसरा जोडधंदा करीत असतो. जोडधंद्यात फायदा कमी झाला तरी चालतो. तसेच गुंतवणूक हा जोडधंदा समजून करावा. निवृत्त होतांना आपल्या मागे कोणत्याही विवंचना राहणार नाहीत ही आपण काळजी घेत असतो. त्याच वेळेस आपली आíथक सक्षमता फार महत्त्वाची असते. अनपेक्षित अडचणी, आजारपण याची तरतूद व्यवस्थित करावी लागते.
व्यवसायातून दरमहा खर्चाबरोबर गुंतवणुकीसाठी रक्कम बाजूला काढावी. आपली उद्दिष्टे निश्चित करावी व त्यासाठी दरमहा रक्कम धंद्यातून बाजूला काढावी. मुलांचे उच्च शिक्षण, मुलांची लग्ने, इ. पुढील काळात येणारे मोठे खर्च यांचा अंदाज घ्यावा व त्या प्रत्येकासाठी स्वतंत्र एसआयपी चालू करावी म्हणजे त्या गरजेच्या वेळेस लागणारी रक्कम तयार असेल.
‘कॅश इज किंग’ या न्यायाने आपल्या धंद्यासाठी व वैयक्तिक गरजांसाठी सहा महिने ते आठ महिने मुदतीची तरलता (लिक्विडीटी) रक्कम बाजूला काढावी. सर्व उद्योजक संपत्ती निर्माण करत असतात. ती निर्माण करताना त्याचा उपभोग घेणे विसरून जातात. आपले काम, आपला व्यवसाय यातच मश्गूल होऊन इतर आनंदाचे क्षण निसटून जातात. म्हणून आíथक नियोजनात ‘वर्क-लाइफ बॅलन्स’ला खूप महत्व आहे.
आपण निवृत्त कधी होणार ते वय निश्चित करा. ते ७०, ७५, ८० काहीही असू शकते. शक्य तो ते कमी असवे. नियोजन करताना सत्तराव्या वर्षी निवृत्त होणार असे ठरवून नंतर शारिरीकदृष्ट्या सक्षम असल्यास अधिक काम करता येते. निवृत्तीचे वय ७० ठरल्यास आपल्याला गुंतवणूक करण्याचा अवधी कमी होतो. सत्तराव्या वर्षी मुदत संपेल अशी एसआयपी चालू करावी. माझ्या पूर्वीच्या लेखात मी २० वर्ष चांगला परतावा देणाऱ्या योजना सुचवल्या होत्या. त्या योजनांची संकल्पना व पद्धत इतकी चांगली आहे की मला खात्री आहे या योजना पुढील २५ ते ३० वर्ष चांगला परतावा देऊ शकतील. या योजनी २० ते २४ टक्के परतावा देत आहेत. थोडा कमी १५ ते १८ टक्के परतावा अपेक्षित धरून, आपणास सत्तराव्या वर्षी अपेक्षित असलेली पुंजी उभी करण्यासाठी दरमहा एसआयपी चालू करा. सत्तराव्या वर्षी आपल्याजवळ मोठी रक्कम असेल. ७० ते ८० (किंवा त्या पुढे) या संक्रमण काळात आपण आपला व्यवसाय आपल्या वारसाकडे सोपवू शकता. हा अवधी खूपच मोठा आहे. आज आपल्या मनावर संध्याछाया किंवा नटसम्राट नाटकांचे इतके खोल परिणाम झाले आहेत की आपली निवृत्ती ही आता आíथकदृष्ट्या दु:खकारक नसते.

sebiregisteredadvisor@gmail.com
(लेखक सेबीद्वारा नोंदणीकृत सल्लागार आहेत)