majha-portfolio321कर्नाटकातील संदूर येथील संस्थानिक यशवंतराव सर्जेराव घोरपडे यांनी ६० वर्षांपूर्वी स्थापन केलेली ही संदूर समूहातील प्रमुख कंपनी. सरकारी कंपनी मोईलनंतर भारतातील मॅगनीजचे उत्पादन करणारी संदूर मॅगनीज ही खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी आहे. १४ वर्षांपूर्वी आजारी कंपनी म्हणून जाहीर झाल्यानंतरही, गेल्या दहा वर्षांत उत्तम प्रगती करून कंपनी पुन्हा नफ्यात आली आहे. यंदाच्या पहिल्या तिमाहीतही कंपनीने उत्तम आíथक कामगिरी करून ८५.६ कोटीच्या उलाढालीवर २१.४६ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. कंपनीवर av-04कुठलेही कर्ज नसल्याने कर्ज-भांडवल (डेट/इक्विटी) गुणोत्तरदेखील शून्य आहे. गेली दोन वर्षे शेअर बाजारात खाणकाम क्षेत्रातील कंपन्यांनी विशेष असा प्रभाव दाखविलेला नाही. त्यामुळे तेजीचा असर आता या क्षेत्रातील कंपन्यांवर व्हायला हवा. या कंपनीचा बीटादेखील जास्त आहे. त्यामुळेच गेल्या महिन्याभरात शेअरच्या भावात २०% वाढ झालेली असली तरीही सध्याच्या तेजीच्या माहोलमध्येही मध्यमकालीन गुंतवणुकीसाठी हा शेअर तुम्हाला फायदा मिळवून देऊ शकेल.