एरवी मोठमोठे बांधकाम व्यावसायिक ‘स्वस्तात आणि परवडणाऱ्या दरात घरे खरेदी करण्याची सुवर्णसंधी’ अशा जाहिराती करत असतात. पण अनेकदा अशा ठिकाणी गेल्यानंतर आपला भ्रमनिरास होण्याची शक्यता असते. शिवाय अशा व्यवहारांमध्ये विश्वासार्हता देखील महत्त्वाची असते. आता सार्वजनिक क्षेत्रातील बँक एसबीआय अर्थात स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बीओबी अर्थात बँक ऑफ बरोडा या दोन बँकांनी आपल्याकडील घरांचा ऑनलाईन लिलाव करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. येत्या २२ आणि २५ ऑक्टोबर रोजी या दोन्ही बँकांचे लिलाव होणार असून त्यासाठी त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्वीट करत ग्राहकांना सहभागी होण्याचं आवाहन देखील केलं आहे.

घरांचा ऑनलाईन लिलाव नेमका काय प्रकार आहे?

आजपर्यंत अनेक दुर्मिळ वस्तूंचा ऑनलाईन लिलाव आपण पाहिला किंवा ऐकला असेल. पण घरांचा ऑनलाई लिलाव म्हणजे काय भानगड असते? असा प्रश्न आपल्याला पडू शकतो. तर बँकांकडून कर्ज घेणाऱ्या व्यक्तींकडून अनेकदा वेगवेगळ्या कारणांमुळे कर्जाची परतफेड केली जात नाही. त्यानंतर या कर्जदारांना बँक डिफॉल्टर लिस्टमध्ये टाकते आणि त्यांच्या तारण ठेवलेल्या मालमत्ता जप्त करते. नंतर आपली कर्जाची रक्कम वसूल करण्यासाठी या मालमत्तांचा लिलाव केला जातो. एसबीआय आणि बीओबी या दोन्ही बँकांनी त्यांच्याकडच्या अशाच जप्त केलेल्या मालमत्तांचा ऑनलाईन लिलाव जाहीर केला आहे.

mumbai metro marathi news, mumbai metro latest marathi news
मेट्रो १ आता लवकरच एमएमआरडीएच्या मालकीची, एमएमओपीएल विरोधातील दिवाळखोरीची याचिका निकाली
two cop suspended over controversy on closing dj
नागपूर: डीजे बंद करण्यावरून वाद, बळाचा वापर करणारे दोन पोलीस निलंबित
Mumbai road mastic, Mumbai potholes road,
मुंबई : खड्ड्यांना ‘मास्टिक’ची मलमपट्टी, प्रयोगांना सोडचिठ्ठी देत नव्या प्रशासनाचे जुन्या पद्धतीलाच प्राधान्य
2008 Malegaon bomb blast case
२००८ मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर खरेच आजारी आहेत का ? प्रकृतीची शहानिशा करण्याचे विशेष न्यायालयाचे आदेश

कधी होणार ई-लिलाव?

SBI आणि BoB या दोन्ही बँकांनी दोन वेगवेगळ्या दिवशी ई-लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये बँक ऑफ बरोडाचा इ-लिलाव २२ ऑक्टोबर रोजी तर स्टेट बँक ऑफ इंडियाचा इ-लिलाव २५ ऑक्टोबर रोजी होणार आहे. यासाठी बँकांच्या संकेतस्थळावरून संबंधित लिंकवर गेल्यास तिथे इ-लिलावात सहभागी होण्याचा पर्याय दिसू शकेल. या लिलावामध्ये व्यावसायिक आणि निवासी अशा दोन्ही प्रकारच्या मालमत्तांची विक्री केली जाणार आहे.

लिलावात सहभागी होताना ‘या’ बाबी लक्षात ठेवा…

दरम्यान, अशा प्रकारच्या ऑनलाईन मालमत्तांच्या लिलावामध्ये सहभागी होण्यापूर्वी ग्राहक म्हणून आपल्याला काही बाबी माहिती असणं आवश्यक आहे. या क्षेत्रातील जाणकारांनी यासंदर्भात काही मुद्दे स्पष्ट केले आहेत.

१. बँका कर्जाच्या वसुलीसाठी हा लिलाव करत असल्यामुळे अशा मालमत्ता बाजारभावापेक्षा फार कमी किंमतीत मिळू शकतात.

२. लिलावात खरेदी होणाऱ्या मालमत्तांची हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण व्हायला जास्त कालावधी लागतो. कधीकधी हा कालावधी १ वर्षाचा देखील असू शकतो.

३. मालमत्ता आपल्या ताब्यात यायला उशीर झाल्यास तोपर्यंत मालमत्तेमध्ये दुरुस्ती-डागडुजीची कामं निघू शकतात. या कामांसाठी आपल्याला नंतर पैसा लावावा लागतो.

४. काही ठिकाणी मालमत्तांवर आधीपासून काही देणी शिल्लक असतात. उदा. मेंटेनन्स, मालमत्ता कर इ. ही देणी नंतर मालमत्ता खरेदी करणाऱ्या ग्राहकाला चुकती करावी लागतात.

५. जर तुम्ही किंमतीवर घासाघीस करायला तयार असाल आणि थोडा संयम ठेवण्याची तयारी असेल, तर अशा व्यवहारांमध्ये चांगली मालमत्ता देखील स्वस्त दरामध्ये मिळू शकते.

६. लिलावातील मालमत्तामध्ये टायटल क्लीअर अर्थात कागदपत्र व्यवस्थित असल्याचा समज ग्राहकांचा होतो. मात्र, अशा व्वहारांत एक कलम बँकांकडून टाकण्यात येतं. यात व्यवहारानंतर त्या मालमत्तेवर इतर कुणी दावा केला तर त्यासाठी बँक जबाबदार राहत नाही. त्यामुळे खरेदीच्या वेळीच या गोष्टींची खातरजमा करणं आवश्यक ठरतं.