एरवी मोठमोठे बांधकाम व्यावसायिक ‘स्वस्तात आणि परवडणाऱ्या दरात घरे खरेदी करण्याची सुवर्णसंधी’ अशा जाहिराती करत असतात. पण अनेकदा अशा ठिकाणी गेल्यानंतर आपला भ्रमनिरास होण्याची शक्यता असते. शिवाय अशा व्यवहारांमध्ये विश्वासार्हता देखील महत्त्वाची असते. आता सार्वजनिक क्षेत्रातील बँक एसबीआय अर्थात स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बीओबी अर्थात बँक ऑफ बरोडा या दोन बँकांनी आपल्याकडील घरांचा ऑनलाईन लिलाव करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. येत्या २२ आणि २५ ऑक्टोबर रोजी या दोन्ही बँकांचे लिलाव होणार असून त्यासाठी त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्वीट करत ग्राहकांना सहभागी होण्याचं आवाहन देखील केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

घरांचा ऑनलाईन लिलाव नेमका काय प्रकार आहे?

आजपर्यंत अनेक दुर्मिळ वस्तूंचा ऑनलाईन लिलाव आपण पाहिला किंवा ऐकला असेल. पण घरांचा ऑनलाई लिलाव म्हणजे काय भानगड असते? असा प्रश्न आपल्याला पडू शकतो. तर बँकांकडून कर्ज घेणाऱ्या व्यक्तींकडून अनेकदा वेगवेगळ्या कारणांमुळे कर्जाची परतफेड केली जात नाही. त्यानंतर या कर्जदारांना बँक डिफॉल्टर लिस्टमध्ये टाकते आणि त्यांच्या तारण ठेवलेल्या मालमत्ता जप्त करते. नंतर आपली कर्जाची रक्कम वसूल करण्यासाठी या मालमत्तांचा लिलाव केला जातो. एसबीआय आणि बीओबी या दोन्ही बँकांनी त्यांच्याकडच्या अशाच जप्त केलेल्या मालमत्तांचा ऑनलाईन लिलाव जाहीर केला आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sbi bank of baroda e auction for mortgage properties in lesser price pmw
First published on: 20-10-2021 at 11:08 IST